Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Thursday, 6 December 2012

भाग ~ ~ ४१ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~ ४१

आजचा सुविचार: - गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !

घटनेच्या पुढे.... 
शर्वरी... "आत्ता पर्यंतची तुम्ही पडताळणी कोणत्या निष्कर्षावर पोहोचली आहे.. काय वाटतं तुम्हाला असं काय झालं असेल ज्यामुळे गोष्ट इथपर्यंत पोहोचली..."

एस.एच.ओ... "हा तर एकदम स्पष्ट ओपन आणि शूट केस आहे म्याडम... नवीन सुनेने त्या दोघांना रेड ह्यांडेड (red handed) पकडलं असणार आणि आपली उद्दुंडता हरवून तिने दोघांवरती गोळ्या झाडल्या असतील... वहिनी ऑन द स्पॉट मरण पावल्या आणि जो भावजी आहे म्हणजेच गुन्हेगाराचा नवरा तो जखमी आहे... गोळी त्याच्या खांद्याला लागली आहे त्यामुळे तो जास्त जखमी तर नाही पण रक्त जास्त वाहून गेल्यामुळे बेशुद्ध झाला आहे..."

शर्वरी... "ह्या सर्व गोष्टी तर तुमच्या तर्कावर आधारित गोष्टी वाटतात... तुमची विचारपूस कुठपर्यंत पोहोचली... घरातील नोकरांची साक्ष्य घेतली का तुम्ही... आरोपी किंवा गुरव साहेब कुठे आहेत आत्ता.."

एस.एच.ओ... "म्याडम...! आरोपी आत्ता अचेतन अवस्थेमध्ये आहे आणि गुरव साहेब झटक्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत... दोघांनाही त्यांच्या डॉक्टर्सने सेडटीवचे इंजेक्शन लावले आहेत... तरी पण सुरुवातीला तर आपण तर्कच लावतो ना... तेच काम आत्तापर्यंतची हालत पाहून केलं आहे... बाकी कोणत्या ठोस निष्कर्षावर तर तेव्हाच पोहोचणार ना जेव्हा पडताळणी संपेल... मी बस आत्ताच तुमच्या जरा पुढे इथे पोहोचलो आहे... मला थोडा वेळ द्या मी आत्ता खरी बातमी तुमच्या समोर घेवून येतो..."

शर्वरी... "त्याची काहीच गरज नाही आहे... आत्ता जे काही करणार मी स्वतः करेन... तुम्ही फक्त माझ्या सोबत राहा... चला जरा मला त्या जागेवर घेवून चला जिथे हे सगळं झालं आहे..."

एस.एच.ओ. तिला त्या रूममध्ये घेवून गेला जिथे हि घटना घडली होती... रूममध्ये फरशीवर रक्तच रक्त पसरलेलं होतं... रूमच्या फरशीवरती एका जागेवर पोलिसांनी खडूने कोणाच्या तरी शरीराचा आकार बनवला होता... जो शर्वरीने खूप लक्षपूर्वक पाहिला... आणि मृत शरीराविषयी विचारल्यावर तो पोस्ट मॉंर्टमसाठी पाठवण्यात आला आहे... पोलिसचे एक्स्पर्ट प्रत्येक जागी एक खास केमिकल झाडून जाग्याजाग्यावरून फिंगर प्रिंटचे स्याम्पल्स उचलत होते... आणि फोटोग्राफर्स विभिन्न प्रकारे फोटो काढत होते. त्याचवेळी एका हवालदाराने शर्वरीला एका पिशवीत ठेवलेल्या दोन बंदुका  दिल्या. त्या .२२ च्या छोट्याश्या बंदुका होत्या ज्यांची रेंज जास्त नव्हती... शर्वरीने खूप सांभाळून रुमालाने त्यांना बाहेर काढून त्यांचा वास घेतला.. तिला माहिती पडलं कि दोघांमधून गोळ्या निघाल्या आहेत...

शर्वरी खूप बारीकीने त्या रूमची पडताळणी करत राहिली आणि आपल्या सोबत असणाऱ्या एस.एच.ओ.ला काही काही इंसट्रक्शन पण देत होती ज्यांची तालीम तो कठोरपणे करत जात होता. रूममधून बाहेर निघून शर्वरीने आपली वाट गुरव साहेबांच्या रूमकडे पकडली. गुरव साहेब आपल्याच रूममध्ये कोणा थकलेल्या सैनिकावानी बसलेले होते... दरवेळी हसरा ठेवणाऱ्या चेहऱ्यावर आज निराशा दिसत होती... त्यांच्या जवळ पोहोचून शर्वरीने आपला गळा साफ करून त्यांचं लक्ष आपल्या कडे केंद्रित करण्याचा प्रयत्न केलं पण गुरव साहेबांनी ह्या गोष्टीवर काहीच लक्ष दिलं नाही...

शर्वरी... "क्षमा करा गुरव साहेब असल्या वेळी मला तुम्हाला डिस्टर्ब करायला पडतंय पण जसं कि तुम्ही जाणता हे सगळं करणं पण आमची मजबुरी आहे... जर तुम्हाला जास्त त्रास जाणवत नसेल तर कृपया आम्हाला सहयोग करा... आणि आम्हाला ह्या पूर्ण घटना क्रमाची माहिती द्या..."

गुरव साहेब... "काय सांगू तुम्हाला... काय हे सांगू माझी सोनाली आत्ता ह्या दुनियेत राहिली नाही कि हे सांगू माझा भाऊ ह्या वेळी आपल्या प्राणाशी झडत आहे... वा हे सांगू ज्या मुलीला आत्ता २-३ दिवसा आगोदरच आम्ही आपल्या घरातील अब्रू बनवली होती आज तिने असं काम केलं कि माझं पूर्ण घर उध्वस्त करून टाकलं... बोला... मी ह्यामधून तुम्हाला काय सांगू..."

शर्वरी... "मी तुमची समस्या समजू शकते गुरव साहेब... पण काय करणार... आम्हाला आमची ड्युटी पूर्ण करायची आहे... तुम्हाला जे काही माहिती आहे ते आम्हाला क्रमवारीत सांगा.."

गुरव साहेब... "(हळू आवाजात)... क्रमानुसार काय सांगू... दरवेळी सारखी आजची सकाळ पण तशीच होती जशी असायची... सोनाली माझी आंघोळ करण्याची व्यवस्था करून आपले रोजचे काम करण्यासाठी बाहेर निघून गेली... थोड्यावेळानेच मी गोळ्यांच्या आवाजासोबत राहुल आणि सोनालीची किंकाळी ऐकली जी राहुलच्या रूममधून येत होती... मी आपल्या सामर्थ्यानुसार जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर त्या रूममध्ये पोहोचलो... आणि तिथे जे दृश्य आमच्या डोळ्यासमोर आम्ही बघितलं ते दृश्य बघण्याआधी मी आपला प्राण त्याग करायला पसंत केलं असतं..."

शर्वरी... "काय पाहिलं तुम्ही तिथे...?"

गुरव साहेब... "माझी सोनाली फरशीवर आपल्याच रक्ताने रक्तबंबाळ पडलेली होती आणि राहुल आपल्या बेडवर होता त्याला पण गोळी लागली होती आणि त्याचे डोळे बंद होत जात होते... रूमच्या एका कोपऱ्यात अनघा उभी होती जिच्या हातांमध्ये असलेल्या बंदुकीतून धूर निघत होता... आणि ती चुपचाप उभी राहून शून्यात पाहत होती... घरातील नोकरांनी पळत जाऊन डॉक्टरांना आणि पोलिसांना फोन केला... डॉक्टरांनी आल्या नंतर सोनालीला मृत घोषित केलं... त्याच्या नंतर मला माहित नाही कि केव्हा ह्या रूममध्ये मला आणण्यात आलं आणि कधी आणि कसं माझ्या छोट्याला हॉस्पिटलला घेवून जाण्यात आलं... माझं तर सगळं संपलं डी.एस.पी. म्याडम... सगळं काही..."

आणि एवढं बोलून ते हमसाहमशी रडायला लागले.... त्यांची हि अवस्था पाहून शर्वरीला कळून चुकले कि त्यांच्याकडून अजून काहीच माहिती मिळू शकत नाही... शर्वरीने त्यांना त्याच अवस्थेमध्ये सोडून अनघाला ज्या रूममध्ये ठेवण्यात आलं होतं तिथे गेली... शर्वरीची नजर दरवेळी रम्याला शोधत होती पण तो तिला कुठेच दिसत नव्हता... 'कदाचित राहुल सोबत हॉस्पिटलमध्ये गेला असेल' हा विचार करून ती अनाघाकडे पोहोचली... डॉक्टरांनी दिलेल्या इंजेक्शनच्या प्रभावातून ती आत्ता शुद्धीवर येत होती... शर्वरीने अनघाशी वार्ता करण्यासाठी डॉक्टरांची परवानगी घेवून रूममध्ये प्रवेश केला... ती सध्या खूप चिंताक्रांत दिसत होती... जशीच तिची नजर शर्वरीवर पडली तिची चिंता अजूनच वाढली...

शर्वरी... "(व्यंग करत)... तर इथे पण तू आपला जलवा दाखवलासच..."

अनघा... "काय बकवास करतेस तू... मी जे काही केलं ते आपल्या नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी केलं... आणि मला त्यावर काहीच पश्चाताप नाही आहे... सध्या तुम्ही मला माझ्या नवऱ्यापाशी जाऊद्या... त्यांना पण गोळी लागली होती... (मग शर्वरीलाच प्रश्न विचारते)... तुम्ही मला सांगू शकता कि आत्ता ते कसे आहेत...? मला त्यांना भेटायचे आहे... मला त्यांच्याशी भेटायला द्या..."

शर्वरी चुपचाप तिला बघत राहते आणि स्मित हास्य देत राहते... तिला हसतांना पाहून अनघा एकदम रागात...

अनघा... "असं हसण्याचा काय अर्थ आहे... जे मी बोलले ते तू ऐकलंस कि नाही..."

शर्वरी... "you know what...???...  ट्रेन मधील मर्डर नंतरच मला तुझ्यावर संशय आला होता पण गुरव साहेबांनी तुला वाचवून ठेवलं होतं... आणि माझ्याही हातामध्ये काहीच ठोस पुरावा नव्हता... ज्यामुळे तू अजूनही ह्या खुल्या वातावरणात श्वास घेत आहेस... पण आत्ता तर तू स्वतःच तुझ्या पायावर कुर्हाड मारली आहेस... आत्ता सरळ सरळ ह्या कारनाम्या मागचा मुख्य हेतू काय ते सांग... नाहीतर आम्हाला आमची पध्दत बदलायला लागणार... (मग हसत) आणि ह्या वेळी तर तुम्हाला कोणाचाही, कसलाही पाठींबा मिळणार नाही..."

अनघा... "(ओरडून)... मला कोणाचाही पाठंबा नको आहे... मी सोनालीला गोळी मारली होती तर फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी... आणि ह्या कामासाठी शासन पण मला काहीच शिक्षा देवू शकत नाही... मी पण शासनाचा थोडाफार अभ्यास केला आहे..."

शर्वरी... "गप्प बस... जास्त वटवट करू नकोस... जे काही विचारलं गेलं आहे त्याचं साफ साफ उत्तर दे... नाहीतर शासनाची अशी दोर तुझ्या गळ्यात टाकेन जो तुझ्या मरण्याच्या पहिले निघू पण शकणार नाही..."

"आम्ही पण पाहतो कि कोणतं शासन आमच्या सुनेला निर्दोष असून सुद्धा शिक्षा देतो ते..." गुरव साहेबांनी आपली व्हील चेयर त्या रूममध्ये घुसवत बोलले... "थोड्या वेळासाठी आमची शुद्ध हरवली होती डी.एस.पी. पण आत्ता आम्ही एवढे पण दुर्बळ झालो नाही आहोत कि खरं आणि खोट्याचा निर्णय करू शकत नाही ..." शर्वरी त्यांना हैराणीने पाहायला लागली...

गुरव साहेब... "एवढ्या हैराणीने नका पाहू डी.एस.पी... जर आमच्या सुनेने हे काम आमच्या छोट्याला वाचवण्यासाठी केलं आहे तर आम्ही तिला काहीच होवू देणार नाही..."

अनघा आपल्या जागेवरून उठून गुरव साहेबांचे पाय पकडून आक्रंदून रडायला लागली... गुरव साहेबांनी तिच्या केसांमध्ये हात फिरवत तिला चुचकारत होते ...

गुरव साहेब... "घाबरू नकोस अनघा... मला पूर्ण गोष्ट एकदम स्पष्ट सांग... जो नुकसान झाला तो झालाच आहे... आत्ता आम्हाला अजून होणाऱ्या नुकसानापासून स्वतःला वाचवायचे आहे... घाबरू नकोस... प्लीज मला संग शेवटी काय झालं होतं...? सोनालीवर तू गोळी चालवण्यासाठी का भाग पडलीस... राहुलला जी गोळी लागली होती ती सोनालीने मारली होती काय... मला पूर्ण गोष्ट सांग... मला पण जाणायचे आहे... कि शेवटी काय झालं होतं ज्यामुळे गोष्ट इथपर्यंत पोहोचली...???" प्रश्नच प्रश्न पाहूयात पुढच्या भागात.... पण त्यासाठी थोडीशी कळ सोसावी लागणार... :)
टीप: - जर तुम्हाला हिंदीमधून काही कथा वाचायच्या किंवा लिहायच्या असतील तर कृपया करून www.dreamnfun.com ह्या संकेत स्थळावर भेट द्यावी. 
क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

1 comments: