Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Friday, 21 December 2012

भाग ~ ~ ४६ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~ ४६  

आजचा सुविचार: - जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.

घटनेच्या पुढे.... 
फोन आपल्या खिशात ठेवून राहुल आपल्या रूमकडे वळला. आपल्या रूममध्ये पोहोचल्यावर तिथे डॉ. हेगडे बसलेला भेटला ज्याच्यासोबत राहुलचे फ्यामिली डॉक्टर्स पण होते... त्या दोघांना एकत्र पाहून राहुल हसायला लागतो... 

राहुल... "तुम्हा दोघांना एकत्र पाहून मी अचंबित कमी आणि आनंदी झास्त झालो आहे... तुम्ही लोकांनी आपापलं काम खूप चोख आणि प्रामाणिकपणे बजावलं आहे..." 

डॉ. हेगडे... "(हसत)... प्रामाणीकपणा आमच्या व्यवसायाचा पहिला नियम आहे साहेब... आमचे परम पुज्य गुरुजी श्री. १००८ बाबा अमित सावंत आम्हाला दरवेळी प्रामाणिकपणेच्या रस्त्यावर चालण्यासाठी सांगितलं आहे... आम्ही त्यांचीच शिक्षा फ़ॉलोव करतो... कधी वेळ मिळाला तर आम्ही तुम्हाला पण बाबा श्री. अमित सावंतची आणि त्यांच्या प्रामाणिकपणाची कथा सांगू इच्छितो..." 

राहुल... "(चिडत) मला नाही ऐकायची आहे तुमच्या बाबाची कोणतीच कथा... आणि आता हे सांगा तुम्ही दोघं इथे कशाला आला आहात...??" 

हेगडे... "जी रिपोर्ट तुम्ही बनवायला सांगितली होती... ती तश्याच प्रकारे इथंभूत माहिती आम्ही त्या रिपोर्टमध्ये टाकली आहे... चीफ मेडिकल ऑफिसरने पण ती माहिती कन्फर्म केली आहे... आत्ता तुमचं काम झालंच समझा... आत्ता बस आमचं बाकीचं राहिलेलं पण पेमेंट करून टाका.." 

राहुल... "(दात खात).. तुमचे पैसे कुठे पळून नाही जात आहेत डॉक्टर... अनघाचं काम झालं तर सर्व पेमेंट्स क्लिअर करून टाकेन... समजलात..." 

हेगडे... "हो समजलो.." 
मग दोघेही डॉक्टर्स तिथून निघून जातात... 

*****-----*****-----*****

काही दिवसानंतर... 

आज गुरव साहेबांनी राहुलसोबत सोनालीचं शव विच्छेदन केलं... गुरव साहेबांच्या प्रतिष्ठेमुळे सोनालीच्या शेवटच्या दर्शनासाठी खूप लोकांची गर्दी जमा झाली होती... ती गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना घाम गाळावा लागला... सोनालीचं शव विच्छेदनाचं कार्यक्रम सर्व विधीनुसार पार पाडण्यात आलं... राहुल आणि गुरव साहेबांनी मिळून तिच्या देहाला मुखाग्नी दिली... गर्दीमध्ये काही लोकं अशी पण होती ज्यांच्या कुजबुजण्यामध्ये राहुलवर संशयाची गोष्ट ऐकायला येत होती पण गुरव साहेबांनी त्या लोकांकडे दुर्लक्ष करून आपल्या 'छोट्याला' सर्व क्रिया आणि विधीमध्ये आपल्यासोबत शामिल केलं होतं... काही लोकं ह्या गोष्टीची पण प्रशंषा करत होते कि 'गुरव साहेबांनी आपल्या सावत्र भावाच्या नात्याला सर्वात उंच स्थान दिलं होतं... त्याच्यावर एक क्षण पण त्यांनी संशय घेतला नाही...' डि.एस.पी. शर्वरी पण त्या लोकांमध्ये कोणास ठावूक काय विचार करून आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य घेवून उभी होती... आज जेव्हा पण तिचा सामना गुरव साहेबांशी झाला तेव्हा गुरव साहेबांना तिचं स्मित हास्य बोचतांना जाणीव झाली...


*****------*****-----**** 

राहुल आणि अनघा, दोघांनाही डॉक्टरांनी आपल्या ओब्जर्वेशनमध्ये ठेवून आपापली रिपोर्ट कोर्टात दाखल केली होती... इन्वेस्टीगेटिंग ऑफिसर्सने त्या रिपोर्टचा आधार घेवून केस तैयार करत होते... अनघाला पण आत्ता जनरल हॉस्पिटलमधून काढून 'सिटी मेंटल हॉस्पिटल'च्या बायकांच्या सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं... तिची आई सुद्धा परत आपल्या घरी निघून गेली होती आणि जाताजाता केसच्या तारखेला पुन्हा येण्याचं बोलून गेली... त्यांना गुरव साहेबांनी आपल्याकडून अश्वस्थ करून ठेवलं होतं कि 'जे पण होईल ते एकदम निष्पक्ष आणि आनघच्या डोक्याच्या आजारालाच ध्यानात ठेवून होईल..." राहुलने त्या दिवसानंतर अनघाला पुन्हा भेटला नव्हता... आत्ता सर्वजण फक्त कोर्टाच्या तारखेचीच वाट पाहत होते...

*****-----*****-----*****

आज तो दिवस होता जेव्हा 'सोनाली हत्येवर' सुनावणी होणार होती... पूर्ण शहरात ह्या विषयी चर्चा चालली होती... ह्या केसमध्ये जुडलेल्या लोकांची झोप तर कोणास ठावूक केव्हापासूनच उडालेली आहे... ज्याचा प्रभाव त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसत होता... कारण सगळ्यांचे वेगवेगळे होते पण प्रभाव एक समान होता... शहरातील लोकांमध्ये अनघा आपल्या खरेपणा आणि खोट्याच्या भासामधून बाहेर पडत नव्हती, कोणास ठावूक... राहुलच्या मनात काय आहे... गुरव साहेबांचे डोळे पण लाल झाले होते कारण त्यांची सोनाली त्यांच्या सोबत नव्हती... तिच्या सोनालीला जिने मारला होतं ती डोक्याने आजारी होती ज्यामुळे तिला शिक्षा देणे गुरव साहेबांना कठीण जात होतं... ठरलेल्या वेळेप्रमाणे 'सोनालीच्या हत्येची' सुनावणी सुरु झाली.. सरकारी वकील आपल्या सर्व पुराव्यांनिशी, ज्यामध्ये पोलिसांच्या सर्व रिपोर्ट्स होत्या... न्यायाधीशासमोर केसची विस्त्रित रूप रेखा प्रस्तुत करत होता...

सरकारी वकील... "माय लॉर्ड..!!! (अनाघाकडे इशारा करत)... तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभी असलेल्या मुलीच्या निरागस चेहऱ्यावर न जाता, तुम्ही तिचे कारनामे ऐकाल तर तुम्हाला हे जाणून हैराणी होईल कि ह्या निरागस चेहऱ्यापाठी लपलेला असली चेहरा किती निर्दयी आणि घृणास्पद आहे... हिने आपली कोणती तर इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीची हत्या करण्यासाठी मागे हटली नाही... उलट ज्या घरातील माणसांनी तिला जागा दिली त्या घरातील काही व्यक्तींची हत्या पण हिनेच कोणास ठावूक का केली... हिने...! फक्त सोनालीचाच  खून नाही केला उलट आपल्या समोर येणाऱ्या कुलकर्णीची आणि त्या व्यापाऱ्याची निर्घुण हत्या केली... ज्यांची चुकी फक्त एवढीच होती त्यांनी हिचा असली रंग बघितला होता... त्यामुळे मी न्यायाधीशांकडे विनंती करतो कि आरोपीला कठोर शिक्षा दिली पाहिजे... द्याट्स ऑल माय लॉर्ड..."

न्यायाधीशाने एकदा अनाघाकडे पाहिले जी त्यांच्याकडेच पाहत होती... तिच्या चेहऱ्यावर ह्या वेळी कसलेच भाव नव्हते... एकदम सपाट... कोर्टात ह्यावेळी शांतता पसरली होती एकदम पिन ड्रोप सायलेन्स... त्या शांततेला न्यायाधीशाच्या आवाजाने भंग केलं...

न्यायाधीश... "(अनघाशी...)... तुम्हाला तुमच्या पक्षात काही बोलायचे आहे...??"

अनघा काही बोलणार तेवढ्यात गुरव साहेब आपली व्हील चेयर पुढे घेवून आले आणि...

गुरव साहेब... "माय लॉर्ड..!!! मी आरोपीचा वकील आहे त्यामुळे मला तिच्या तर्फे काही तरी बोलण्याची अनुमती द्यावी..."

न्यायाधीश... "(आपली मान होकारार्थी हलवत)... अनुमती आहे..."

गुरव साहेब... "धन्यवाद माय लॉर्ड...!! माय लॉर्ड..!!! हा केस स्वतःच एक विचित्र आहे सर्व काही समोर असतांना हि सर्व काही खरं नाही आहे... हे खरं आहे कि अनघाच्या हातून त्या हत्त्या झाल्या आहेत पण हे खरं नाही आहे कि त्या हत्या अनाघानेच केल्या आहेत..."

न्यायाधीश... "मला काही समजलं नाही... तुम्ही एकदम साफ साफ बोला... ज्यामुळे केस लवकरात लवकर सोल्व होईल..."

गुरव साहेब... "मी प्रयत्न करेन माय लॉर्ड...!!! पण हा केस आहेच एवढा विचित्र कि सगळं काही साफ साफ सांगणं थोडं कठीण जाईल पण मी प्रयत्न करतो..."

काही वेळ थांबून आणि मग आपली व्हील चेयर अनाघाकडे घेवून जाउन ते पुढे बोलायला लागले...

गुरव साहेब... "माय लॉर्ड...!! लहानपणी पाहिलेल्या एका घृणास्पद घटनेच्यामुळे हि मुलगी एका विचित्र आजाराने ग्रस्त आहे ज्याला मेडिकलमध्ये ‘Schizoid personality disorder’ साधारण बोली भाषेत Personality disorder किंवा split personalit पण बोलतात ज्याची पुष्टी आपल्या देशातील सुप्रसिद्ध मनो-चिकित्सक डॉ. हेगडेची हि रिपोर्ट पण करते... (टेबलावरून एक रिपोर्ट काढून ती न्यायाधीशाच्या सेवकाला देतात...)... ह्या मध्ये अनघाच्या विचित्र आजाराची माहिती लिहिली आहे..."

न्यायाधीशासमोर ती रिपोर्ट हजर होते... 

न्यायाधीश... "(रिपोर्टवर एक नजर मारून ).. तर तुम्हाला बोलायचे आहे कि आरोपीने ह्या सर्व हत्या विचार करून नाही तर उलट आपल्या आजारामुळे केलं आहे..."

गुरव साहेब... "हो माय लॉर्ड...!! ह्या आजाराचा माणूस आपल्या मनात काही विचित्र ओपिनिअन बनवून ठेवतो... ज्यामध्ये काही पण समोर आल्यावर हे खूप हिंसक होतात... असं बघितलं तर हे लोकं सामान्य माणसांसारखेच वागतात पण आपली ओपिनिअन समोर येताच एकदम उग्र होतात... हे लोकं ‘schizophrenia’ च्या पेशंट हून खूप वेगळे असतात... ‘schizophrenia’ चा पेशंट scheming करू शकतो पण ‘Schizoid personality disorder’ चा पेशंट आपल्या आत दबलेल्या भीतीची जाणीव होताच खूप उग्र होतात आणि हिंसा करण्यावर परावृत्त होतात... आपल्या हिंसेचं काम पूर्ण झाल्यावर ते त्या कामाला विसरून जातात... आणि एकदम सामान्य माणसांसारखं व्यवहार करायला लागतात..."

एवढं बोलून गुरव साहेबांनी कोर्टात हजर सर्व लोकांवर एक नजर फिरवली... सर्वजण फक्त त्यांनाच पाहत होते आणि त्यांच्या बोलण्याची प्रतीक्षा करत होते...

गुरव साहेब... "पोलिसांनी माझ्या क्लायंटवर सोनालीच्या हत्येसोबत दुसरे पण आरोप लावले आहेत जसं कि कुलकर्णीची हत्या आणि त्या व्यापाऱ्याची हत्या उगाचच तिच्या कपाळी मारली आहे, कारण त्यांच्या जवळ ह्या विषयी काहीच ठोस पुरावा नाही आहे कि त्या दोघांची हत्या माझ्या क्लायंटने केली आहे... मी मानतो कि सोनालीची हत्या तिच्याच हातून झाली आहे पण ती हत्या पण अनघाच्या निरागसपणाला खोटं ठरवू शकत नाही... माझ्या ह्या गोष्टीच्या पुष्टीसाठी डॉ. हेगडे इथे उपस्थित आहेत त्यांनी अनघाला आपल्या ओब्जर्वेशनमध्ये चांगल्या प्रकारे चौकशी करून अनघाला मानसिक रोगी घोषित केलं आहे... आत्ता ह्या पुराव्याच्या आधारावर माझी न्यायालयाशी विनंती आहे कि ते माझ्या क्लायंटवर जोर जबरदस्ती न करता आणि तिच्या डोक्याच्या आजाराला बघून तिला निर्दोष घोषित करा.... द्याट्स ऑल माय लॉर्ड..."

गुरव साहेबांची गोष्ट संपताच न्यायालयात कुजबुज सुरु झाली... 'टन-टन' तेव्हा कोर्टातील घड्याळाने जेवणाच्या वेळेचा इशारा केला...

न्यायाधीश... "ऑर्डर - ऑर्डर...!!! न्यायालयाने सगळ्यांची गोष्ट ऐकली आणि समजून घेवून... हे न्यायालय ह्या केसचा निर्णय जेवणाच्या नंतर दिला जाईल..."

न्यायालयातील कुजबुज आत्ता बंद झाली आणि न्यायाधीश निघून गेल्यावर सर्वजण बाहेर निघायला लागले... अनघाला लेडी पोलिसांनी आपल्या कस्टडीमध्ये ठेवलं होतं... गुरव साहेब तिच्या जवळ गेले आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून 'सर्व व्यवस्थित होईल'चं आश्वासन दिलं.... अनघाची आई पण तिथेच उभी होती... राहुल आपल्या सीटवर बसलेला होता त्याने अनघाला भेटण्याचा काहीच प्रयत्न केला नाही... पण अनघा त्यालाच पाहत होती... राहुल तिच्या डोळ्यातच पाहत होता आणि डोळ्यानेच तिला सांत्वना देत होता... हे सांगणं कठीण आहे कि त्यांची नजरबंदी कोणी कोणी पाहिली असेल ते...

शर्वरी पण तिथेच होती, ती सर्वांवर आपली नजर ठेवून होती... २ - ३ दिवसा आगोदर तिच्या चेहऱ्यावर जी स्मिता दिसत होती ती आज पण तशीच होती... जेव्हा पण गुरव साहेब तिच्याकडे पहायचे त्यांना तिची ती स्मिता बोचायची... कोणास ठावूक काय विचार करून ती गुरव साहेबांजवळ आली जे आत्ता अनघापासून थोडे लांब आपल्या व्हील चेयरवर बसून काही तरी विचार करत होते... शर्वरी त्यांच्या जवळ पोहोचून काहीही न बोलता आपल्या खिशात ठेवलेल्या एका कागदाला काढून त्यांच्या डोळ्यासमोर केलं... ज्याला बघताच गुरव साहेब दचकले... त्यांच्या तोंडून फक्त एवढंच निघालं ... "कुठे आहे तो...?"....


तर मित्रांनो काय झालं असेल पाहूयात पुढच्या भागात... पण त्यासाठी थोडीशी कळ सोसावी लागणार... :)

टीप: - जर तुम्हाला हिंदीमधून काही कथा वाचायच्या किंवा लिहायच्या असतील तर कृपया करून www.dreamnfun.com ह्या संकेत स्थळावर भेट द्यावी.

 
क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

0 comments:

Post a Comment