Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Friday, 7 December 2012

भाग ~ ~ ४२ Illusion .... एक भास..????

Illusion .... एक भास..????
भाग  ~ ~ ४२ 

आजचा सुविचार: - या ह्रदयीचे त्या ह्रदयी देता येते तोच खरा शिक्षक.

घटनेच्या पुढे.... 
अनघा… “(स्फुंदत)… रात्री तुमच्या लोकांसोबत वार्ता करून मी आपल्या रूममध्ये येवून झोपली… सकाळी उठताच आधी मी राहुलच्या रूममध्ये गेली… तर तिथे पाहते तर काय कि सोनाली… सोनालीजी राहुलवर बंदुक ताणून उभी राहिली आहे… मला बघताच त्यांचं लक्ष माझ्यावर गेलं हे पाहून त्याच क्षणी लगेच राहुलने त्यांच्या हातून बंदुक हिसकावून घेण्यासाठी त्यांच्यावर उडी मारली पण यशस्वी झाला नाही त्यामुळे त्याने मला ओरडून दरवाजाच्या जवळ लागलेल्या शेल्फच्या खाली पडलेल्या एका दुसऱ्या बंदुकीला उचलण्यास सांगितले… जेव्हा मी ती बंदुक उचलली तेव्हा सोनालीने माझ्यावर पण बंदुक ताणली आणि मला ह्यामधून बाजूला होण्यासाठी सांगितले आणि हळू हळू राहुलकडे जायला लागली… ती खूप रागात होती… मला खूप भीती वाटत होती… राहुलने सांगितलेली पूर्ण गोष्ट एक एक करून माझ्या डोळ्यासमोरून एका चीत्रावानी फिरायला लागली… राहुल मला बंदुकीचा ट्रिगर दाबण्यासाठी सांगायला लागला… मी आत्ता विचारच करत होती कि त्याने पुन्हा मला ट्रिगर दाबण्यासाठी सांगितलं… ह्या वेळी तो जास्त जोराने बोलला त्यामुळे आपसूकच माझ्या हातून ट्रिगर दाबला गेला आणि बंदुकीतून गोळी निघाली… जसंच मी फायर केलं त्यांनी पण त्यांच्या बंदुकीने राहुलवर एक फायर केला… त्यानंतर मी ट्रिगर दाबतच राहिले जोपर्यंत बंदुकीतून पूर्ण गोळ्या संपून गेल्या नाहीत तोवर मी गोळ्या झाडतच राहिली… मला माहित नाही कि त्या बंदुकीतून किती गोळ्या निघाल्या किंवा सोनालीला किती व कुठे कुठे गोळ्या लागल्या… मला फक्त एवढंच आठवतंय कि त्या दोघांचंही शरीर माझ्या समोर रक्त बंबाळ अवस्थेत पडलेलं होतं… सोनालीच्या डोळ्यात त्यावेळी दुनियाभरच्या द्वेशासोबत माझ्यासाठी एक विचित्र भाव पण होते… त्यांचे शेवटचे उद्गार जे त्यांच्या तोंडून निघाले होते ‘माझ्यासोबत धोका झाला आहे’… त्यानंतर मी आपलं भान हरवून बसले पण मला आठवतंय राहुलला फक्त एकच गोळी लागली होती… तो जरूर वाचेल ना… (गुरव साहेबांकडे पाहत)… वाचेल ना तो…”

गुरव साहेब… “(कठोर शब्दात)… तो वाचेल किंवा नाही वाचेल पण तुझं वाचणं आत्ता त्याच्याच हातात आहे… जोपर्यंत राहुल तुझ्या गोष्टीला खोटं नाही बोलत… तो पर्यंत तू सुरक्षित आहेस…  पण जर त्याने तुझी गोष्ट खोटं आहे असं सांगितलं तर बस तुमचं काय होणार ते तुम्हाला चांगल्याप्रकारे माहिती आहे…”

शर्वरीने पण ह्या गोष्टीची गंभीरता ध्यानात ठेवून सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये घेवून जाणेच ठीक समजलं… थोड्या वेळातच ते लोकं हॉस्पिटलमध्ये उभे होते. ऑपरेशन कक्षात राहुलला लागलेली गोळी काढण्यासाठी ऑपरेशन सुरु होतं… रक्त जास्त वाहून गेल्यामुळे डॉक्टर्स पण थोडे चिंतीत होते… थोड्या वेळाने ऑपरेशन कक्षाच्या बाहेरची लाईट ऑफ झाली आणि डॉक्टरांची टीम बाहेर आली… त्यांनी गुरव साहेब आणि पोलिसांना सांगितले कि राहुल आता मृत्युच्या धोक्यापासून बाहेर आहे… २ ते ३ तासानंतर तो शुद्धीवर येईल…

२ - ३ तासाने राहुल शुद्धीवर आला… सगळेजण त्याच्या रूममध्ये गेले… सगळ्यात पहिले डॉक्टरांनी त्याची काही चाचणी केली आणि मग पोलिसांना त्याच्याशी विचारपूस करण्यासाठी परवानगी दिली…

राहुलने रूममध्ये असलेल्या सर्व लोकांना पाहण्यासाठी जेवढी होवू शकते तेवढी आपली मान फिरवली… जशीच त्याची नजर अनाघावर पडली तो ओरडलाच…

राहुल… “हिला....!!! हिला इथे कशाला आणलं तुम्ही लोकांनी… हि मला मारून टाकेन… (मग जसं काही तरी आठवताच) वहिनी कुठे आहेत… हिने त्यांना पण गोळी मारली होती… मला ह्या मुलीपासून वाचवा… वाचवा मला ह्या मुलीपासून..”

राहुलचं असं वागणं पाहून अनघाच्या पायाखालून जमीनच सरकली…

अनघा… “हे काय बोलतोयस तू राहुल… कशी वार्ता करतोयस… (मग सगळ्यांकडे पाहत)… असं वाटतंय हा पूर्णपणे आपल्या शुद्धीवर नाही आला आहे… सकाळी झालेल्या घटनेमुळे हा घाबरलेला दिसत आहे … तुम्ही लोकं ह्याला नंतर विचारा जे काही विचारायचे आहे ते… हा सगळं नंतर खरं खरं सांगेल…”

राहुल… “नंतर काय तुम्ही कधी पण मला विचारलात तरी पण माझं उत्तर हेच असेल… हि मुलगी पागल आहे… हिने माझ्या आईसमान वहिनीला मारून टाकलं… हि मला पण मारून टाकेल… (गुरव साहेबांना बघत)… दादा हि तुम्हाला पण मारून टाकेल… (रडत)… हिला इथून लांब घेवून जावा… मला हिच्याशी भीती वाटते… तुम्ही लोकांनी पहिले पण माझी गोष्ट ऐकली नाहीत… मला हिच्याशी भीती वाटते … दादा प्लीज…! आत्ता तरी माझी गोष्ट ऐक…”

अनघा… “(हताश होत).. हि कशी वार्ता करतोयस राहुल तू...? काय झालं आहे तुला… (आपले हात चोळत रागात)… आणि तू हे सगळं काय बोलतोयस…”

गुरव साहेब… “गप्प बस अनघा…! आत्ता ह्याच्यापुढे तू एक शब्द पण बोलू नकोस नाहीतर मी विसरून जाईन कि तू एक मुलगी आहेस… तुला मी बोललो होतो ना कि आत्ता जे काही होणार ते राहुलच्या बोलण्याने होणार… तुझी गोष्ट चुकीची ठरली आत्ता आम्ही पोलिसांना पण रोकणार नाही… ते जशी मर्जी तुझ्यासोबत वागू शकतात…”

अनघा आक्रंदून रडायला लागली… तिला काहीच समजत नव्हते… तिला आपलं सर्वस्व लुटतांना दिसत होतं… कोणत्याही प्रकारे तिला आशेची किरणं नजर येत नव्हती… ती एकदम हताश / निराश झाली होती.. लेडी पोलीस कॉन्स्टेबलने पुढे येवून तिला पकडले…

अनघाच्या डोळ्यांसमोर आत्ता काळोख पसरायला लागला होता… बंद होण्याऱ्या डोळ्यांच्यामधून तिला राहुलचा छद्मी हसरा चेहरा दिसतो… ज्याला पाहून तिच्या मनात फक्त एकच गोष्ट येते…

भास तुझा तू असल्याचा !
भास तुझा तू नसल्याचा !!
प्रेमात तुझ्या मी असण्याचा कि !
प्रीतीत माझ्या तू नसण्याचा !!

सरकारी हॉस्पिटलमध्ये एका बेडवर बेशुद्ध पडलेल्या अनघाचे डोळे हळू हळू उघडायला लागतात. तिला जाणीव नव्हती कि ती किती वेळ बेशुद्ध अवस्थेत राहिली होती.. उघडणाऱ्या डोळ्यांच्या सोबत तिचे विचार पण जागे व्हायला लागतात… थोड्या वेळातच तिला खऱ्या वस्तू-स्थितीचा आभास होतो आणि ती उठून बसण्याचा प्रयत्न करत होती पण एक जोडी हात तिचे खांदे दाबून तिला उठण्यापासून रोकतात… ह्या स्पर्शाला भलं ती कशी विसरू शकणार, शेवटी हा स्पर्शच तर तिच्या लहानपणापासून तिच्यासोबत जुडलेला आहे… हो… हि तिची आईच होती … तिची आई तिच्या बेडच्या साईड स्टुलावर बसलेली होती. तिचे डोळे भिजलेले होते… ओठ थरथर कंपन पावत होते… चेहऱ्यावर सर्व दुनियेचे दुखाचे भाव येत होते… का नाही येणार… आत्ता काही दिवसांपूर्वीच जी आई आपल्या मुलीच्या नशिबावर स्तुतीसुमनांचा वर्षाव करायला थकत नव्हती आत्ता तिच्या अश्या हालातीवर सहानुभूती दर्शविण्यापलीकडे ती काहीच करू शकत नव्हती…

आईला पाहताक्षणीच अनघा लगेच हंबरडा फोडून रडायला लागली… तिच्या आईने पण तिला रोकले नाही… अनघा हमसाहमशी रडत होती… खूप रडल्या नंतर जेव्हा तिच्या अश्रुमध्ये कमीपणा यायला लागला तेव्हा ती स्वतःच आपले डोळे पुसते… जेव्हा तिने आपल्या आईला लक्षपूर्वक पाहिले तेव्हा तिला हि जाणीव झाली कि तिची आई पण तिच्यासोबतच रडत होती… तिने हात पुढे करून आपल्या आईचे अश्रू पुसले आणि आपले अश्रू पण पुसत ती उठून बसली…

“आई तू कधी आलीस..??” अनघाने स्फुंदत आपल्या आईला विचारले…

“गुरव साहेबांनी जशीच तुझी बातमी पाठवली, मी भलं इथे येण्यापासून स्वतःला कशी थांबवणार…” आईने पण स्फुंदतच उत्तर दिलं…

“गुरव साहेबांनी तुला बोलावले इथे… काय बोलले ते माझ्या विरुद्ध..” अनघाने हैराणीने विचारलं...

“ते भलं काय बोलणार… खूप संक्षेपमध्ये जे काही सांगू शकत होते, तेवढंच त्यांनी सांगितलं… इथे आल्या नंतर माझी हिम्मत पण होत नव्हती त्यांच्याशी नजरानजर मिळवण्याची… पण ते खरोखरच देव माणूस आहेत… माझ्यासोबत ते पूर्वी सारखेच सन्मानाने वागले… त्यांनी काही पण राग किंवा द्वेष माझ्यावर काढला नाही… आणि तुझ्याविषयी काहीच वाईट बोलले नाही ते... बस एवढंच बोलले कि ‘अनघाला संभाळा जरा … न जाणो तिला काय सुचलं जे ती हे सर्व करून बसली.. राहुलच्या गोष्टीला जर आम्ही पहिलेच लक्षपूर्वक ऐकलं असतं तर कदाचित आज माझी सोनाली जिवंत असती..’.. बस एवढंच बोलले ते.. आणि मला इथे घेवून आले… इथल्या डॉक्टरांना पण त्यांनी तुझी खास देखरेख करण्यासाठी सांगितलं आहे… (दीर्घ श्वास सोडून)… हे सगळं काय झालं अनघा…! काय माहित तुझ्या नशिबात काय लिहिलं आहे ते.... जी तू जुन्या आजारातून अजूनही पूर्णपणे बरी झाली नाहीस..” अनघाची आई थंड श्वास घेत बोलली…

“काय आजार...! … कोणत्या आजाराची वार्ता करतेस आई…” अनघा जोर जोराने बोलायला लागली… “मला भलं कोणता आजार असणार ज्याविषयी तू बोलत आहेस…” अनघाने तिच्या आईला गदागदा हलवून हैराणीने विचारलं…

“ये चूप बस… हळू बोल… कोणी ऐकलं तर खूप मोठी गडबड होईल…” अनघाची आई तिला धपाटा मारत बोलली…

“तिला गप्प करून आत्ता तुम्ही काहीच करू शकत नाही आई…” शर्वरी रूममध्ये प्रवेश करत बोलली… जिला बघताच अनघा आणि तिच्या आईच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले…

“असं वाटतंय मी तुम्हाला चुकीच्या क्षणी डिस्टर्ब केलं… आत्ता काय करू… आमचं कामच आहे लोकांना डिस्टर्ब करण्याचं…” शर्वरीने आपल्या कठोर अंदाजामध्ये चुटकी वाजवत बोलली ज्यामुळे अनघाचा पारा अजूनच चढला…

“आपली बकवास बंद कर आणि निघून जा इथून… मला माझ्या आईशी वार्ता करायची आहे…” अनघा आवेशाने बोलली…

“अरे वाह..! असं वाटतंय तू विसरलीस कि तू कोणत्या हालातीमध्ये इथे बसली आहेस… म्याडम..! तू एक खुनी आहेस जी एका फुल आणि हाल्फ मर्डर केसमध्ये पोलिसांच्या ताब्यात आहेस… पण अजूनपर्यंत तू एवढ्या लोकांच्या रक्ताने आपले हात रंगवले आहेस कि तुला हि सगळी गोष्ट मामुली वाटत असतील… काय… बरोबर बोलले ना…” शर्वरी आपल्या व्यंगात्मक अंदाजमध्ये बोलली… ज्याने अनघाच्या जखमेवर मीट लावण्याशिवाय काहीच काम केलं नाही…

“आत्ता माझी वेळ खराब आहे डि.एस.पी… जे मनात येईल ते बोल पण मला माहिती आहे कि मी निर्दोष आहे ते… मला फसवलं गेलं आहे… ह्या वेळी माझ्या कोणत्याही गोष्टींवर विश्वास करणारा कोणीच नाही… माझी आई पण काय माहित कोणत्या आजाराची गोष्ट बोलून मला अजूनच त्रास देतेय…” अनघा एकदम रडक्या आवाजात बोलली…

“अरे हो…! हिच्या गोष्टीने मला पण आठवले कि आत्ता थोड्यावेळापूर्वी तुम्ही कोणत्या तरी आजाराची वार्ता करत होत्या… जरा मला पण सांगा… हा आजार तोच तर नाही ज्यामुळे तुम्ही अनघाला लहानपणीच तिच्या आजीकडे पाठवले होते…” शर्वरीने अनघाच्या आईला प्रश्न केला… पुन्हा प्रश्नच प्रश्न... :) पाहूयात पुढच्या भागात पण त्यासाठी थोडीशी कळ सोसावी लागणार... :)
टीप: - जर तुम्हाला हिंदीमधून काही कथा वाचायच्या किंवा लिहायच्या असतील तर कृपया करून www.dreamnfun.com ह्या संकेत स्थळावर भेट द्यावी. 
क्रमशः

Previous Chapter                                        Next Chapter

1 comments:

  1. Very nice but can't wait for tomorrow

    ReplyDelete