Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Thursday, 31 January 2013

भाग ~ ~ २ ~~ किंकाळी ~~ देव-उपासना


देव-उपासना

भाग ~~२ ~~किंकाळी

शेताच्या दुसऱ्या कोपऱ्यात ३ तास आधीचे दृश्य....

"आदित्य हे सर्व काय आहे...?" सई संतापून म्हणाली...

"काय झालं आता..!!" आदित्यने विचारले....

"मला हे पटत नाही, एवढं लवकर काय आहे, तू केव्हा माझ्या वडिलांना भेटून आपल्या लग्नाविषयी चर्चा कधी करणार...?" सईने विचारले...

"अरे लग्नही करू सई, एवढी पण काय घाई आहे, मला जरा तुला मिठीत घेवू दे ना...?" आदित्य बोलला...

"माझं लग्न जेव्हा दुसऱ्या बरोबर होईल ना तेव्हा तुला कळेल... घाई काय आहे... हुंह..., लांब ठेव आपले हात..." सईने आदित्यचा हात जवळपास झटकलाच...

"अशी रुसू नकोस ना गं सई... आपण आज भांडण करण्यासाठी भेटलो आहोत काय...?, बघ किती सुंदर चांदणी रात्र आहे, चल काही तरी धमाल करूया..." आदित्य बोलला...

"काही करूयात बिरुयात नाही….!, लग्नापूर्वी मी तुझं काही एक चालू देणार नाही समजलास..." सई संतापून बोलली...

"अशी चीड-चीड का करतेस सई... जर आपल्याला लग्न करायचेच आहे तर लग्नाच्या आधी काय आणि लग्नाच्या नंतर काय आणि नाही तरी तुला स्पर्श करण्याशिवाय मी असं केलंय तरी काय आजवर, नाही म्हणायला तेवढे ३-४ वेळाच तर तुझ्या ओठांचे चुंबन घेतले असतील, आता तूच सांग असं काय झालं आहे आपल्यामध्ये कि तू मला अशी टाळतेस..." आदित्य पण आत्ता संतापून बोलला.

"मला काहीच माहित नाही, तू लवकरात लवकर बाबांशी भेटून आपल्या लग्नाविषयी बोल नाहीतर...!!" सई बोलली...

"नाही तर काय सई...?" आदित्यने विचारले...

"नाही तर मी तुला भेटणं बंद करेन..." सई उत्तरली...

"अशी कशी गं बोलतेस तू, सोड ना हे सगळं, मी काय लग्नाला नकार देत आहे काय, बघ आज कित्ती प्रयत्नाने एकांत मिळाला आहे तो पण ह्यासाठी कि आज तो मूर्ख संतोष शेताची देखरेख करत आहे, जर त्याचे वडील असते तर आज हा एकांत आपल्या नशिबी कधीच आला नसता, तो तर रात्रभर शेतात फिरत असतो..." आदित्य समजावत बोलला...

"तुला हे सर्व कसं माहिती, तू पहिले पण इथे आला होतास काय...?" सईने विचारले...

" नाही नाही, मी तर आज पहिल्यांदाच इथे आलो, लोकांकडून ऐकलं आहे कि संतोषचे बाबा शेताची देखरेख चांगल्याप्रकारे करतात..म्हणून, …" आदित्य बोलला.

"पण आदित्य, कोणास ठावूक का आज मला काहीतरी विचित्र वाटत आहे..."… सई.

"पहिल्यांदा रात्री शेतात आली आहेस ना त्यामुळे, अजून काहीच नाही... अच्छा सोड हे सर्व, मला तुझ्या नर्म गुलाबी ओठांना स्पर्श करू दे ना..." आदित्य तिला मिठीत घेत बोलला...

"गप्प बस मी बोलले ना आता हे सर्व लग्नाच्या नंतर..." सई त्याला धक्का देत बोलली...

"सोड हि मस्करी, ये ना असा हट्ट नको करूस..." एवढं बोलून तो तिला पुन्हा बिलगतो आणि तिच्या ओठांवरती आपले ओठ ठेवून त्याचं रसपान करायला लागतो... आणि सई पण त्याला साथ देते... ते दोघे एकमेकांत खोलवर गुंतायला आतुर होऊ पाहतात, त्या दोघांमधला वस्त्रांचा अवसानही क्षणात गळून पडतो... आणि ते दोघे एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करायला लागतात...


तेव्हा अचानक एक जोरदार किंकाळी त्यांना ऐकायला येते.., जी ऐकून ते दोघेही घाबरतात...

"आदित्य हि भयान किंकाळी कुणाची आहे, माझा तर जीवच जायचा राहिला...!!!"… सई.

"गप्प बस..." आदित्य आपल्या तोंडावर बोट ठेवून तिला गप्प राहायला सांगतो...त्या किंकाळीचा आवाज त्यांना आता आपल्या खूप जवळून येत असल्याची जाणीव होते आणि ते दोघे शहारून थरथर कापायला लागतात...

"आदित्य हे काय आहे, मला खूप भीती वाटते, मी बोलली होती ना कि इथे काही तरी विचित्र वाटत आहे, चल निघूया लवकर इथून..." सई घाबरत बोलली...तेव्हा त्यांना कुणीतरी पळताना होत असणारा पावलांचा झप-झप असा आवाज ऐकायला येतो...

"आदित्य..." सई काही तरी बोलायला पाहते पण आदित्य तिच्या तोंडावरती हात ठेवतो...

"वेडी झालीस काय...? थोडा वेळ शांत नाही बसू शकत, बिलकुल शांत राह..." आदित्य तिच्या तोंडावर हात ठेवून तिच्या कानात कुजबुजतो...पण तेव्हाच त्यांना पुन्हा एक जोरदार किंकाळी ऐकायला येते...

"सई आपले कपडे व्यवस्थित कर, पण आरामात, शांतीने, काहीच आवाज न करता..." आदित्य हळू आवाजात बोलला...

"ठीक आहे..." सई आपली मान होकारार्थी हलवून इशारा करते...तेव्हा त्यांना आपल्या खूप जवळ कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकायला येतो. त्यांना असं वाटतं जणू त्यांच्या जवळ कोणीतरी येत आहे...

"सई माझी गोष्ट लक्षपूर्वक ऐक, काहीही झालं तरी मागे वळून पहायचे नाही आणि जेवढं होवू शकतं तेवढ्या वेगाने पळायचे, ठीक आहे, आणि हो माझा हात सोडू नकोस..." आदित्य सईच्या कानात कुजबुजतो...एवढं बोलून तो सईचा उजवा हात आपल्या डाव्या हाताने पकडून तिला तिथून घेवून पळत सुटतो, दोघेही मागे न पाहता पळत सुटतात...पळता पळता आदित्यच्या पायाच्या अंगठ्याला ठेस लागते आणि तो पडतो, सई पडता पडता स्वतःला सावरते...

"सई तू पळ मी येतोय, माझ्या अंगठ्याला ठेस लागली आहे, हि वाट सरळ शेतातून बाहेर निघते, तू लवकर इथून निघ..." आदित्य वेदनेने कण्हत बोलतो…

"मी तुला सोडून कुठेच जाणार नाही आदित्य, जगेन तर तुझ्या सोबत आणि मरेन तरी तुझ्या सोबतच..." सई त्याच्या जवळ जात बोलली...किंकाळीचा आवाज वाढतच जात होता...आदित्य कश्यातरी प्रकारे सईचा आधार घेवून उभा होतो आणि सईचा हात पकडून पुन्हा पाळायला लागतो...

------------------------------------------------------

इथे संगीता, संतोषला समजावते कि आजची रात्र घरी निघून जा, पण तो तिचे काहीएक ऐकत नाही...

"असं घाबरून पळणं चांगलं नाही संगीता, कोणास ठावूक कोणी तरी थट्टा करत असेल..." संतोष बोलला...

"हि खूप भयानक, भयावह आणि विचित्र किंकाळी आहे संतोष, हि थट्टा नसू शकते..." संगीता भीतीने पटापट बोलते...

"जे पण असो मी इथेच राहणार, चल तुला घरी सोडून येतो..." संतोष बोलला...तेव्हा संगीताला असं काही दिसतं ज्याला पाहून ती पाणी पाणी झाली आपण जिवंत आहोत इतकीच जाणीव उरलेली होती...

"संतोष मागे वळून बघ...!!" संगीता घाबरलेल्या आवाजात बोलली...संतोष मागे वळून पाहतो... त्याला दूरवर दोन सावल्या त्यांच्याकडे येतांना दिसतात...

"संगीता तू ह्या झाडाच्या मागे जावून लप, मी बघतो त्यांना..." संतोष बोलला...

"नको संतोष मला एकटीला सोडून जावू नकोस, मला खूप भीती वाटते..." संगीता त्याचा हात पकडत बोलली...दोघेही झाडाच्या मागे जाउन लपतात, दोन सावल्यांच्या आकृत्या जेव्हा त्यांच्या जवळ येतात... तेव्हा..

"अरे हा तर आदित्य आणि ती सई आहे, हे दोघे ह्यावेळी इथे काय करत आहेत...? ह्या दोघांनीच तर नाही ना इथे हे भयावह वादळ निर्माण केलं आहे...!!" संतोष मनातल्या मनात विचार करतो...
जेव्हा ते दोघे खूप जवळ येतात तेव्हा संतोष संगीताला तिथेच त्या झाडाच्या मागे लपण्याचा इशारा करतो आणि त्या दोघांसमोर येतो...

"आदित्य हे काय करत आहेस तू इथे, आणि सई मला तुझ्याकडून हि अपेक्षा नव्हती कि तू रात्री अश्या प्रकारे शेतात गोंधळ घालत फिरशील..." संतोष रागाने त्यांना दटावून बोलला...

"संतोष माझी गोष्ट ऐक आम्ही काहीच गोंधळ नाही केला, माहिती नाही तिकडे  कोण आहे ते, आम्ही तर घाबरून इथे पळून आलो आहोत..." आदित्य कंपित आवाजात बोलला...

क्रमशः

Previous Update                          Next Update

0 comments:

Post a Comment