Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Tuesday, 22 January 2013

भाग ~ ~ १ ~ ~ अधीर मन ~~ देव-उपासनादेव-उपासना

भाग ~ ~ १  ~ ~ अधीर मन


पौर्णिमेची रात्र होती, चंद्राचं रुपेरी चांदणं अंगणात पसरलं आहे. संगीता आपल्या बाल्कनीत उभी राहून चांदण्या रात्री वाऱ्यावर डोलणाऱ्या शेताला पाहत आहे. पण तिचं मन खूप अधीर आहे.


"उफ़्फ़ हि चांदणी रात्र पण आजच उगवायची होती, आता मी कशी बाहेर जाणार, कोणी पाहिलं तर पंचाईत होईल. काळोख असता तर आरामात निघून गेले असते. आता काय करू...? संतोष माझी वाट पाहत असणार, कशी जाऊ मी आत्ता... तरी पण मला विश्वास आहे कि तो नक्कीच मला समजून घेईल.." संगीता पुष्कळ वेळ मनातल्या मनात हाच विचार करत आहे... तिचं मन अधीर झालं होतं... कधी एकदा ती इथून बाहेर पडते...


-----------------------------------


इथे संतोष पण चांदण्या रात्री वाऱ्यावर डोलणाऱ्या शेताला पाहतो आहे. असं वाटत होतं चांदण्या रात्री शेत जणू काही गात आहे. खूप सुंदर दृश्य आहे. पण संतोष जास्त वेळ ह्या दृश्यात रमून गेला नाही कारण तो खूप  व्याकुळतेने संगीताची वाट पाहतो आहे.... त्याचे मनही अधीर झाले होते...तो विचार करत आहे कि जर संगीता कोणत्याही प्रकारे इथे आली तर दोघंही पहिल्यांदाच असल्या एकाकीपणाच्या विरहात भेटणार.आज सकाळी संगीता मंदिराच्या बाहेर संतोषला बोलली होती, "संतोष माझे वडील माझ्यासाठी मुलगा शोधत आहेत, मला खूप भीती वाटते""तू चिंता नको करूस... असं कर आज रात्री तुझ्या बंगल्याच्या मागे शेतात भेट... आपण आरामात बसून बोलूयात" संतोष तिला धीर देत बोलला."मी तिथे कशी येणार संतोष, मला भीती वाटते..." आपल्या ओढणीशी बोटांनी चाळे करत ती बोलली.."मला एवढं प्रेम करतेस, मग मला एकट भेटायला का घाबरतेस...!!" संतोष थोडा नाराजीने बोलला."तशी गोष्ट नाही आहे संतोष, मी तर हे बोलत होती कि रात्री त्या निर्जन शेतात मी कशी येणार, कोणी पाहिलं तर..!!" संगीता पुन्हा तशाच तोऱ्यात बोलली..."त्या शेताची जवाबदारी माझी आहे, मीच त्या शेताची रात्रभर देखरेख करतो, तिथे घाबरण्यासारखी काहीच गोष्ट नाही आहे, तू ये तरी आपण खूप गोष्टी करू..." संतोष तिला समजावत बोलला.."अच्छा ठीक आहे मी प्रयत्न करेन, माझ्यासाठी घरातून निघणं खूप कठीण असणार, पण तरीही मी पूर्ण प्रयत्न करते..." संगीता बोलली.मंदिराच्या बाहेर सकाळी त्या दोघांमध्ये असला संवाद घडला होता.इथे संगीता अजूनही दुविधेत होती कि काय करू वा काय न करू. ती हिम्मत करून निघण्याचा निर्णय घेते.ती चुपचाप शिड्या उतरून दबलेल्या पावलांनी खाली उतरते आणि घराच्या पाठी मागच्या भिंतीवर चढून शेतात उतरते. पण दरवेळी प्रमाणे तिचं हृदय भीतीने धडधडते आहे."कुठे आहे हा संतोष, त्याला यावेळी इथे उभं असायला हवं होतं ना, मी एकटी कशी त्याला शोधणार...!!" संगीता मनातल्या मनात बडबडत होती.इथे संतोषलाही जाणीव होते कि त्यालासुद्धा संगीताच्या बंगल्याच्या मागे जायला हवं होतं...


"संगीता इथे यायला घाबरत असेल..." एकवेळ तो विचार करतो आणि संगीताच्या बंगल्याच्या मागे जायला निघतो.संगीता घाबरत - घाबरत पुढे पुढे जात असते, ती समोर येणाऱ्या एका सावलीला पाहून घाबरते आणि परत मागे वळून पाळायला लागते."अरे थांब संगीता, हा मी आहे तुझा संतोष..." संतोष मागून आवाज देतो.संगीता थांबते आणि मागे वळून पाहिल्यावर तिला संतोष पळत -पळत तिच्याकडे येतांना दिसतो."तुला माझी मुळीच काळजी नाही आहे..., तुला ह्या क्षणी बंगल्याच्या  मागे असायला हवं होतं ना...!!" संगीता त्याच्यावर डाफरून बोलली.."संगीता.... बाबा माझ्यासोबत होते, ते आज मला घरी पाठवून स्वतः शेतात थांबणार होते, मी खूप प्रयत्नाने त्यांना इथून पाठवले आहे..." संतोष तिला समजावत बोलला."तुला माहिती आहे मला किती भीती वाटत होती, मी कधीच अशी रात्री बाहेर निघाले नव्हते, असं वाटत होतं कोणी तरी माझा पाठलाग करत आहे..." संगीता रागाने बोलली."मी समजू शकतो संगीता, जर हे माझ्या हाती असलं असतं तर मी तुला उचलून इथे आणलं असतं..." संतोष बोलला."बस्स-बस्स राहू दे..." अजूनही तिचा राग शांत झाला नव्हता."मी खरं बोलतोय संगीता माझ्यावर विश्वास ठेव.." एवढं बोलून संतोषने तिला आपल्या बाहुपाश्यात घेतलं...ह्या आलिंगनाने संगीता शहारली...., ती पहिल्यांदाच संतोषच्या बाहुपाश्यात होती, ते पण रात्रीच्या विरहात."सोड मला संतोष हे काय करत आहेस...!!" संगीता त्याच्या बहुपाश्यातून सुटण्याचा निरर्थक प्रयत्न करते."संगीता मी खूप खुश आहे... मला विश्वासच नव्हता कि तू येशील म्हणून... मला थोडावेळ तुझ्याजवळ राहू दे ना..." संतोष तिला प्रेमाने विनवणी करत बोलला."मला लाज वाटते संतोष, सोड ना..." तिचा तोच प्रतिकार चालू असतो...संतोष सांगितला सोडून देतो, आणि आपल्या डोळ्यातल्या अश्रूंना पुसायला लागतो."काय झालं संतोष...? माझ्याने काही चूक झाली का..? ठीक आहे घे मला मिठीत, मी तर बस हेच बोलत होती कि मला लाज वाटते, पहिले कधीच तुझ्या एवढ्या जवळ आली नव्हते ना..." संगीता संतोषच्या खांद्यावर हात ठेवून बोलते..."संगीता...! जेव्हा पासून तुझ्याशी प्रेम झालं आहे... मी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता कि तुझ्या एवढ्या जवळ येवू शकेन. डोळे पाणावले तुझ्या एवढ्या जवळ येवून, कुठे तू आणि कुठे मी..." संतोष हताश, निराश आणि भावूक होत बोलला."कुठे तू आणि कुठे मी ह्याचा काय अर्थ आहे...???, आता प्रेमात पण काय हे सर्व विचार करतात.." संगीताने विचारले."ते तर ठीक आहे संगीता पण तुला नाही माहित कि तुझं प्रेम मला एखाद्या स्वप्नाप्रमाणे वाटतं. आपण दोघे दरवेळी डोळ्यातंच बोलत आलो आहोत, खूप कमी आपण दोघांनी एकमेकांशी वार्ता केली आहे, तरी पण इथे भेटण्याची किंवा बोलण्याची संधी तरी कुठे लाभते आपल्याला जे आपण भेटू किंवा काही बोलू शकू. खूप दिवसांनंतर आज मंदिराच्या बाहेर बोलणं झालं होतं आणि आजच पहिल्यांदा आपण इथे विरहात भेटत आहोत... काय हे स्वप्ना सारखं नाही वाटत...??" संतोष शून्यात पाहत बोलला."हो संतोष मला पण हे एका स्वप्ना सारखं वाटत आहे, माहिती नाही, का मी तुझ्यावर प्रेम करून बसले, मला चांगल्यापाकारे माहिती आहे कि ह्या प्रेमाचा अंत भयंकर होणार आहे तरीपण कोणास ठावूक... माझं हृदय फक्त तुझ्यासाठीच धडधडत आहे..." संगीता बोलली."संगीता चल कुठे तरी पळून जावू, इथून खूप लांब जिथे उंच-नीच, जात-पातची भिंत नसेल तिथे..." संतोष आवेशात बोलला."संतोष मी तुझ्यासोबत कुठेही यायला तैयार आहे, पण बाबा आपल्याला शोधून काढतील आणि अशी क्रूर शिक्षा भेटेल ज्याची तू कल्पना पण करू शकत नाही..." संगीता बोलली..."मृत्यू पेक्षा जास्त क्रूर शिक्षा काय असू शकते संगीता...!!" संतोषने विचारले..."तू अजून माझ्या वडिलांना ओळखत नाहीस, ते तुझ्या संपूर्ण कुटुंबाला उध्वस्त करतील, मला हे कदापि सहन होणार नाही..." संगीता त्याला समजावत बोलली."मग ह्याचा काय अर्थ काय कि आपण आपलं प्रेम विसरून जावं आणि ह्या दुनियेच्या पुढे ह्या प्रेमाचं बलिदान करावं..." संतोष बोलला."मी असं तर नाही बोलली संतोष..." संगीता बोलली...."मग तुला बोलायचे तरी काय आहे..." संतोष संतापून बोलला..."आपण एकत्र जगू शकत नाही पण एकत्र  मरू तरी शकतो..." हे बोलता बोलता संगीताचे डोळे पाणावले होते..."ये वेडाबाई... असं मन छोटं करून काय होणार, जर देवाने ह्या प्रेमात आपला मृत्यूच लिहिला आहे तर का नाही आपण एक छोटासा प्रयत्न करून मरू, कोणास ठावूक आपल्या खऱ्या प्रेमाच्या पुढे देवाचं हृदय पाघळेल आणि तो आपल्याला एक आनंदमयी भविष्य देईल.." संतोष तिला समजावत बोलला.."कसला प्रयत्न संतोष, मला समजलं नाही..." संगीताने आपले डोळे पुसत विचारले..."आपण इथून खूप लांब निघून जावू, खूप लांब..... जिथे कोणालाही आपल्या विषयी माहिती नसेल..." संतोष अधीर होत बोलला..."आपण कुठे राहणार संतोष, आपल्यांकडे तर काहीच नाही...!" संगीताने विचारले...."ज्या देवाने प्रेम बनवलं आहे तोच ह्या प्रेमाला शेवट पर्यंत घेवून जाईल, चल खऱ्या मनाने आपल्या प्रेमासाठी एक प्रयत्न करून पाहू, बाकी सर्व देवावर सोडू. प्रयत्न केल्याने काही पण भेटू शकतं, प्रयत्न न करता हार मानणे ह्या प्रेमाचा अपमान होईल..." संतोष बोलला."मी तुझीच आहे संतोष, मला जिथे पाहिजे तिथे घेवून चल, मला माझी चिंता नाही, आपली चिंता असती तर प्रेमच केलं नसतं. मला बस तुझी आणि तुझ्या कुटुंबाची चिंता आहे..." संगीता चिंतीत होत बोलली..."तू कोणाचीही चिंता नको करूस, ज्याने हे जीवन दिलं आहे तोच ह्याची रक्षा करेल, मला पण आपल्या घरच्यांची चिंता आहे, पण मी आपल्या प्रेमासमोर हतबल आहे,, मला विश्वास आहे कि सगळं काही व्यवस्थित होईल..." संतोष बोलला..."ठीक आहे संतोष... जशी तुझी मर्जी.." एवढं बोलून संगीता संतोषला बिलगली...क्रमशः


Next Chapter

0 comments:

Post a Comment