Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Tuesday, 22 October 2013

भाग ~~ ४ ~~ रक्त ~~ देव-उपासना

देव-उपासना

भाग ~ ~ ४ ~ ~ रक्त 


"ओह... हम्म... हे कोण वात्रट आहे..." चिडलेल्या स्वरात...

"हि मी आहे..." हासत...

"तू... थांब तुला आज चांगलाच इंगा दाखवतो..." संतापलेल्या स्वरात...

"कधी पासून आवाज देत आहे, उठतच नव्हतास, म्हणून मग मी पाणी टाकलं..." हासत...

"पळतेस कुठे, थांब... ह्या शेताचा कोपरांकोपरा मला माहिती आहे बघतो कुठे जाउन लपतेस ती..." त्याच संतापलेल्या स्वरात तिच्या मागे पळत...

"अच्छा... बघूया..." हासत आणि पळत...

ती जाउन शेतात लपली...

संतोष चुपचाप पावलांचा आवाज न करता मागून येवून तिला पकडतो...

"आता माहिती पडेल तुला... आज तुला दिवसा तारे नाही दाखवले तर नावाचा संतोष नाही..." संतोष बोलला...

"अरे, उपासना...!! कुठे आहेस तू...?" तिच्या वडिलांनी तिला हाक मारली...

"मी इथे आहे बाबा.., बघाना दादा मला मारत आहे..." उपासना नाराजीने बोलली...

"तुम्ही दोघं फक्त दंगा-मस्ती करण्यात वेळ घालवा, इथे शेतात काम कोण करणार...?" बाबा बोलले...

"बाबा आज हिने पुन्हा माझ्यावर पाणी टाकलं, हि कधी सुधारणार...!!" संतोषने तिचे कान पकडून तिला शेतातून बाहेर काढत बोलला...

"सोड तिला संतोष आणि चल पटकन आज खूप काम करायचे आहे, उन जास्त झालं तर काम करणं कठीण जाईल..." त्याचे बाबा बोलले...

"हो बाबा हिला समजवा नाही तर मी हिला सोडणार नाही..." संतोष संतापून बोलला...

"माझ्या दादुल्या असं नको बोलूस नाही तर तुझ्या हातावर राखी कोण बांधणार...??" उपासना लडिवाळपणे बोलली...

"अच्छा ठीक आहे, मग मी तुला लग्न करून हाकलून लावतो..." संतोष हसू दाबत बोलला...

"नाही दादा, असं का बोलतोस, मी आज पासून असं नाही करणार..." उपासना संतोषला बिलगत बोलली...

"विचित्र प्रेम आहे तुमच्या दोघांमध्ये, पूर्ण दिवस भांडण करत असता पण एकमेकांशिवाय तुमचं मन पण लागत नाही..." बाबा हासत बोलले...

"बाबा मी हिला एवढं प्रेम करतो त्यामुळेच तर हि मला एवढी त्रास देतेय..." संतोष लाडाने तिचे गाल खेचत बोलला...

-----------------------------------------------------------


हा सर्व काल सकाळचा घडलेला प्रसंग होता…, उपासना ते सोनेरी क्षण आठवून ओठांतल्या ओठांत हासत... आपल्या ताई सोबत पुढे जात आहे…...

"अरे काय विचार करत आहेस उपासना..." तिच्या ताईने  तिला पाहत विचारले...

"काहीच नाही ताई बस असंच कालची गोष्ट आठवली होती..." उपासना हासत बोलली...

"जर आज तू काही खोडी काढलीस तर संतोष तुला सोडणार नाही..." उर्मिला बोलली...

उपासनाने उर्मिलाची गोष्ट ऐकून आपलं तोंड वाकडं केलं...

----------------------------------------------


चारही बाजूने चिमण्यांचा चिव-चीवाहाट ऐकायला येत आहे. सूर्याची पहिली किरणं शेतावर पडत आहे, असं वाटतं प्रकृतीने चारही बाजूने सोनंच सोनं मुक्त हाताने उधळलं आहे. उपासना आणि उर्मिला गप्पा मारत-मारत शेताकडे जात आहेत. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे वडील, अमित कुलकर्णी येत आहेत...

"हा चिमण्यांचा आवाज सकाळी सकाळी किती गोड वाटतो ना ताई...." उपासना त्या आवाजात गुंतत बोलली...

"हो खूप गोड वाटतो, रोज हेच बोलत असतेस तू, दुसरं काहीच नाही का सकाळी सकाळी बोलण्यासाठी..." उर्मिला तिला दटावत बोलली...

"पण बघ ना हा चिमण्यांचा आवाजच आहे ज्यामुळे आपण सकाळी उठतो नाही तर आपल्यांना वेळेचे भानच नसते..." उपासना बोलली...

"चिमण्यांना फुटाणे टाकतेस, पाणी देतेस, दरवेळी त्यांची प्रशंषा करतेस, माहिती नाही काय आहे ह्या चिमण्यांमध्ये, आमच्यापेक्षा जास्त तू ह्या चिमण्यांनाच प्रेम करतेस... तुला चिमणीच बनवायला पाहिजे होतं देवाने.." उर्मिला बोलली...

उपासना, उर्मिलाची गोष्ट ऐकून खूप उदास होते...

"अरे काय झालं हा चेहरा का लटकवलास, मी तर देवला काहीच नाही बोलली...?" उर्मिला तिची समजूत काढत बोलली...

उपसनाचे डोळे पाणावले जातात...

"ताई चिमण्यांना प्रेम देवून मला स्वतःला देवच्या जवळ असल्याची जाणीव होते, नाहीतरी आता वाचलं काय आहे..." उपासना हताश, निराश होत बोलली...

"हो हो माहिती आहे, इथे शेतात पण तू फक्त देवसाठीच येतेस, शेवटी तू त्याला इथेच पहिले होतेस ना..." उर्मिला बोलली...

"सर्व काही माहिती असूनही तू अशी का वार्ता करतेस ताई, मला दुखः देवून तुला काय मिळतं..." उपासनाच्या डोळ्यातून अश्रुंचे दोन थेंब वाहून तिच्या गालावर येतात...

उर्मिला उपसनाला थांबवून तिला मिठी मारते आणि तिचे अश्रू पुसून, "अरे येडाबाई, मी काय तुझी शत्रू नाही, जाणारे परतून येत नाहीत, कधी पर्यंत देवची आठवण आपल्या काळजात वागवत फिरशील, आता विसरून जा त्याला..." उर्मिला तिला समजावत बोलली...

"ताई काही पण बोल पण मला देवच्या आठवणी पासून वेगळं नको करूस, मी जगू नाही शकत, इथे शेतात पण मी दरवेळी ह्यासाठीच येते कारण शेवटी देवला मी इथेच पाहिले होते, असं वाटतंय कुठून तरी तो येईल आणि..." एवढं बोलून उपासना हमसाहमशी रडायला लागली...

"बस-बस गप्प बस, माझा इरादा तुला दुखी करायचा नव्हता वेडे, मी तर बस हेच बोलत होती कि काळ कोणासाठीच थांबत नाही. कधी पर्यंत देवच्या आठवणीत रडत राहशील, उद्या जर तुझं लग्न झालं तेव्हा तर तुला त्याला विसरावच लागणार आहे..." उर्मिला तिची समजूत काढत बोलली...

"मी लग्न नाही करणार ताई, मी देव शिवाय कोणाबरोबरही लग्न नाही करणार..." उपासना अजूनही स्फुंदत होती...

"कुठे आहे देव...?, कधी येणार देव...?, माहिती नाही तो जिवंत आहे कि नाही, का त्याच्यासाठी एवढी व्याकूळ होत आहेस..., आता मी हा तुझा पागलपणा जास्त दिवस सहन नाही करू शकत..." उर्मिला चिडत बोलली...

"मग मला विष दे ताई, पण मी हा पागलपणा नाही सोडू शकत, आणि हो देव जरी ह्या दुनियात असला किंवा नसला तरी तो माझ्या हृदयात, मनात कायम जिवंत असेल..." उपासना भावुक होत बोलली...

"तू बस संतोषची गोष्ट ऐकतेस, आम्ही तर तुझे कोणीच नाही, आता तोच तुला समजावेल..." उर्मिला बोलली...

"दादा माझ्या प्रेमाला समजतात, ते कधीच मला कोणत्या गोष्टीसाठी आग्रह नाही करणार..." उपासना बोलली...

"बघ उपासना, मी तर उद्या निघून जाईल, उद्या तुझे भावजी मला घ्यायला येणार आहेत, उद्या पासून मी तुला आग्रह नाही करणार, हो पण एक नक्की सांगेन कि जीवनात पुढे चालायचे असते मागे नाही, बाकी आता तू मोठी झाली आहेस, आपलं वाईट आणि चांगलं समजू शकतेस..." उर्मिला बोलली...

बोलता बोलता ते कधी संतोषच्या खाटेजवळ पोहोचले त्यांनाच कळलं नाही...

"अरे दादा आज कसा उठला, खूप विचित्र गोष्ट आहे...?" उपासना हैराण होत बोलली...

"तू काय संतोषला कुंभकर्ण समजून ठेवलं आहेस...!" उर्मिला बोलली...

"ते तर ठीक आहे पण दादा आहे तरी कुठे...??" उपासना बोलली...

"अरे असेल इथेच कुठेतरी..." उर्मिला बोलली...

"काय झालं उर्मिला...!!" बाबांनी विचारले...

"काहीच नाही बाबा, संतोषला शोधत आहोत, आज तो खूप लवकर उठला..." उर्मिला बोलली...

"खूप विचित्र गोष्ट आहे, त्याला तर रोज उपासना खूप मुश्किलने उठवते, आज तो स्वतःच कसा उठला, चल चांगलंच आहे, लवकर उठणे स्वास्थ्यासाठी चांगलं आहे..." बाबा बोलले...

"पण बाबा दादा आहे तरी कुठे...??" उपासनाने चिंतीत होत विचारले...

"अरे असेल इथेच कुठे तरी, चला शोधूयात..." उर्मिलाने उत्तर दिलं...

तिघेही संतोषला शोधायला निघतात...

"ताई एक गोष्ट विचित्र नाही आहे का..?" उपासनाने विचारले...

"काय झालं आता...?" उर्मिला चिडत बोलली...

"दादाच्या बिछाण्याला पाहून असं नाही वाटत कि तिथे कोणी झोपलं असेल..." उपासना विचार करत बोलली...

"अरे... पागल संतोषने उठून बिछाणा व्यवस्थित केला असेल, तू पण बस बेकारच्या गोष्टी विचार करत असतेस..." उर्मिला तिच्या डोक्यावर टपली देत बोलली...

पण उर्मिलाला हि गोष्ट माहिती नव्हती कि उपासना बेकारची नाही खूप महत्वाची गोष्ट बोलत आहे, ज्याच्यावर लक्ष केंद्रित करण्याची खूप गरज आहे.

"ताई हे बघ...!!" उपासना एकीकडे इशारा करत बोलली...

"अरे हे तर रक्ता सारखं वाटत आहे, एवढं रक्त इथे कसं आलं..." उर्मिला हैराण होत बोलली...

"ताई मला काही विचित्रच वाटत आहे..." उपासना भीत बोलली..

"अरे घाबरू नकोस, संतोषने जरूर कोणत्या तरी जनावराला काठीने मारून इथून पळवलं असेल, हे कोणत्यातरी जनावरच रक्त वाटत आहे..." उर्मिला तिला समजावत बोलली...

तेव्हा त्यांना समोरून त्यांचे बाबा येतांना दिसतात...

"काय झालं, कुठे दिसला काय संतोष ...?" बाबांनी विचारले...

"नाही बाबा, आम्ही इथे चारही बाजूने पाहिलं आहे, पण दादा इथे कुठेच नाही आहे, आणि हे बघा, इथे एवढं रक्त पसरलं आहे, मला तर भीती वाटते..." उपासना विचलित होत बोलली...

घाबरणारी गोष्टच होती ती, त्यांचे बाबा पण पूर्ण शेत आलटून पालटून पाहून आला होता, पण संतोष कुठेच सापडला नव्हता, त्यांना पण एवढं रक्त पाहून मनात भीती वाटायला लागली होती...

क्रमशः

Previous Update                              Next Update

0 comments:

Post a Comment