Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Wednesday, 10 April 2013

भाग ~~ ६ ~~ सावली कि भास...!! ~~ देव उपासना

देव उपासनाभाग ~~ ६ ~~ सावली कि भास...!!"दादा..., सुप्रभात..." पुरुषोत्तम बोलला...

"सुप्रभात पुरुषोत्तम... ये..., तू संगीताला पाहिलं आहेस का...?" भाऊ साहेबांनी विचारले..

"नाही दादा...? का काय झालं..?" पुरुषोत्तमने विचारले...

"काहीच नाही सून बोलत होती कि संगीता कुठेच दिसत नाही आहे...!!" भाऊ साहेब चिंतीत होत बोलले...

"असेल इथेच कुठे तरी, कुठे जाणार..." पुरुषोत्तम बोलला...

तेव्हा पल्लवी तिथे येते आणि आपल्या सासऱ्याला बोलते, "बाबा मी पुन्हा पूर्ण घर बघितलं पण संगीता घरात नाही आहे..."

"अरे तू तर मंदिरात गेली होतीस ना तिच्यासोबत...!!" पुरुषोत्तमने पल्लवीला विचारले...

"हो काका, जायचे तर संगीता बरोबरच होते पण मी जेव्हा संगीताच्या रूममध्ये गेली होती तेव्हा ती तिथे नव्हती, त्यामुळे मी एकटीच मंदिरात निघून गेली..." पल्लवी हात मळत बोलली...

"म्हणजे काय...!! तुला बोलायचे तरी काय आहे...??" भाऊ साहेब अवाक होवून रागाने बोलले...

"काहीच नाही बाबा... मला तर फक्त हेच बोलायचे आहे कि संगीता कोणास ठावूक सकाळी सकाळी कुठे निघून गेली..." पल्लवी हळू आवाजात बोलली...

"मंदिराच्या शिवाय ती कुठे जाऊ शकते, ती तिथेच असेल..." भाऊ साहेब बोलले...

"हो... पण ती मला मंदिरातही नाही सापडली..." पल्लवी बोलली...

"ठीक आहे... ठीक आहे... जा काम कर आपलं..." भाऊ साहेब चिडत बोलले...

"हो बाबा..." पल्लवी बोलली आणि चुपचाप तिथून निघून गेली.

"खूप वर तोंड करून बोलते हि पोरगी..." भाऊ साहेब रागाने बोलले..

"आता ती नादान आहे दादा हळू हळू सगळं समजेल तिला..." पुरुषोत्तम हासत बोलला..

--------------------------------------------

इथे शेतात उपासना, उर्मिला आणि कुलकर्णी जमिनीवर पडलेल्या रक्ताला पाहून घाबरलेले, भयभीत अवस्थेत उभे आहेत.

अचानक उपासनाला समोरच्या शेतात काहीतरी दिसतं...

"तो... तो कोण आहे तिथे..." उपासना गडबडून बोलते...

"कुठे...???" उर्मिलाने विचारले...

"आता-आता त्या समोरच्या शेतामधून कोणीतरी डोकावून पाहत होतं..." उपासना तिथे बोट दाखवत बोलली...

कुलकर्णी साहेब लगेच त्या दिशेला पळत सुटतात आणि पूर्ण शेत पुन्हा एकदा हुडकून बघतात पण काही फायदा होत नाही.

"तिथे तर कोणीच नव्हतं..." कुलकर्णी धापा टाकत बोलला...

"तुला काहीतरी भास झाला असेल, उपासना..." उर्मिला बोलली...

"नाही ताई मी खूप चांगल्या प्रकारे कोणाला तरी डोकावून पाहतांना बघितलं आहे, पण हे एवढ्या लवकर घडलं कि मी त्याला पाहू शकली नाही कि तो कोण होता..." उपासना आपल्या गोष्टीवर ठाम राहत बोलली...

"अरे कुलकर्णी साहेब आदित्यला कुठे पाहिलं आहे का...??"

कुलकर्णीने मागे वाळू पाहिलं तर त्यांना लांबूनच आदित्य चे वडील धोंडीबा सावरकर लांबून त्यांना आवाज लावून विचारत होते...

"काय झालं धोंडीबा..." कुलकर्णीने विचारले...

"आदित्य काल रात्री पासून गायब आहे, सगळीकडे शोधलं, पण त्याचा काहीच थांग पत्ता लागत नाही आहे, आत्ता आत्ता सईचा भाऊ घरी आला होता, सई विषयी विचारत होता. माहिती नाही काय चक्कर आहे. सई पण गायब आहे आणि आदित्य पण, सईच्या भावाने जीवे मारण्याची धमकी देवून गेला आहे, आता तूच सांग मी काय करू.... ह्या नालायक कार्ट्याने तर आम्हाला नुसता त्रास देवून ठेवला आहे..." धोंडीबा निराश होत बोलला...

"काळजी नको करूस धोंड्या, आदित्य मिळेल, कुठे जाईल, असेल इथेच कुठेतरी..." कुलकर्णी बोलला...

"ते तर ठीक आहे... चिंतेची गोष्ट हि आहे कि सई पण गायब आहे, आता तुला तर माहितीच आहे, सईचा भाऊ पाटील साहेबांचा खास माणूस आहे... सई नाही मिळाली तर तो आमचं जगणं मुश्किल करेल..." धोंडीबा कपाळावर हात मारत बोलले...

"घाबरू नकोस धोंड्या, मी स्वतःच इथे चिंतीत आहे, संतोष कोणास ठावूक कुठे गेला आहे...?" कुलकर्णी चिंताक्रांत होत बोलले...

"म्हणजे काय...? संतोष पण गायब आहे काय..., कुठे सई त्याच्यासोबत तर..." धोंडीबा बोलतच होता कि कुलकर्णीने त्याला मध्येच टोकले...

"तोंड सांभाळून बोल धोंड्या, ह्यात संतोषचं सईशी काय घेणं देणं आहे..." कुलकर्णी चिडत बोलला...

"क्षमा कर भाऊ, मी खूप चिंतीत आहे बस असंच तोंडून निघालं. मी तर इथे आदित्यला शोधायला आलो होतो. सगळीकडे पाहिलं, विचार केला तुझ्या शेतात पण एकदा बघून घेवू... अच्छा मी निघतो..." धोंडीबा एवढं बोलून निघून गेला...

उपासना आणि उर्मिला चुपचाप उभ्या राहून त्या दोघांची गोष्ट ऐकत होत्या...

"उपासना सई अजूनही आपल्या घरी ये-जा करत होती...!" उर्मिलाने विचारले...

"नाही ताई, जेव्हा पासून दादा तिच्यावर ओरडले होते तेव्हा पासून तिने आपल्या घरी येणे बंद केलं होतं..." एवढं बोलून उपासना अचानक शेताच्या दिशेने पळायला सुरुवात करते...

"अरे काय झालं, कुठे जात आहेस...?" उर्मिलाने ओरडून तिला विचारले.

"इथे कोणीतरी आहे ताई मी त्याला पुन्हा पाहिलं..." उपासना पळत पळतच ओरडून बोलली... आणि शेतात घुसते...

"अरे थांब मी पण येतोय.." कुलकर्णी पण उपासनच्या मागे मागे पळत बोलले...

"बाबा मी पण येवू काय...??" उर्मिलाने विचारले...

"नको तू इथेच थांब आम्ही बघतो काय आहे ते..." कुलकर्णी पळत पळत ओरडून बोलला...

"ये कोण आहेस तू...! काय करतोयस इथे...!, समोर का नाही येत, लपून-छपून काय पाहतोस, हिम्मत असेल तर समोर ये, मी तुझी अशी हालत करेन कि तुला पाणी पण नशिबी नाही येणार. तुझी हिम्मत कशी झाली आमच्या शेतात घुसण्याची..." उपासना शेताच्या मधोमध येवून डाफरत होती.

उपासना आणि तिचे वडील सारखे सारखे शेतात इथे तिथे पाहत असतात, पण त्यांना पुन्हा कोणीच नाही भेटत..

उपासना धापा टाकत शेतातून बाहेर पडते...

"काय झालं उपासना, कोण होता तो...?" उर्मिलाने प्रश्न केला.

"माहिती नाही ताई आम्ही सर्व बाजूला शोधलं पण तो सापडलाच नाही..." उपासना धापा टाकत बोलली...

"असं कसं असू शकतं जरूर तुला भास झाला असेल..." उर्मिला रागाने बोलली...

"माझा भास असू शकतं... पण हि दुसरी वेळ आहे जे मी कोणाला तरी पाहिलं आहे... माझे डोळे दोन वेळा कसे धोका खाऊ शकतात..., इथे आज काहीतरी विचित्र होत आहे...?" एवढं बोलून ती रडायला लागते.

"अरे काय झालं पागल... रडतेस का, काहीच नाही झालं.... आता संतोष येईल तर सर्व व्यवस्थित होईल..." उर्मिला तिचे अश्रू पुसत बोलली...

"बरोबर अश्याच प्रकारे एक दिवस मी आणि दादाने मिळून देवला इथे शेतात शोधलं होतं, माहिती नाही का सारखे सारखे तेच दिवस आठवत आहेत मला..." उपासना स्फुंदत बोलली...

"अरे पागल आहेस काय... चल थोडा वेळ बसुयात, संतोष जरूर कुठे तरी गेला असेल, येईलच थोड्या वेळाने..." उर्मिला बोलली...

"पण हा कोण आहे शेतात जो एका क्षणी दिसतो पण आणि दुसर्या क्षणी लगेच गायब पण होतो..." उपासना विचार करत बोलली...

"चल सोड हि गोष्ट, काळजी नको करूस... बाबा कुठे आहेत...?" उर्मिलाने विचारले...

"ते अजूनही शेतातच आहेत..." उपासना बोलली...

तेव्हा त्यांचे बाबा शेतातून बाहेर निघतात आणि उर्मिला आणि उपासना जवळ येवून बोलतात,

"माहिती नाही काय होत आहे इथे...?, उपासना बेटा तू खरोखर तिथे कोणाला बघितलं आहेस कि तो तुझा भास होता..." बाबांनी विचारले...

"माहिती नाही बाबा पण एकदम ठीक काही सांगू शकत नाही... पण मला एक सावली शेतातून डोकावून पाहतांना दिसली... असं असू शकतं हा माझा भास असेल... पण माहिती का असं वाटतंय कि आज इथे शेतात काही तरी गडबड जरूर आहे..." उपासना चिंताक्रांत होत बोलली..


क्रमशः....

Previous Update                            Next Update

0 comments:

Post a Comment