Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Saturday, 24 August 2013

भाग १४ देव उपासना

देव उपासना

भाग १४

दुसरीकडे गावात...

अचानक कोणी तुमच्या जवळचा म्हणजे एकदम प्रिय व्यक्ती तुमच्या जीवनातून निघून गेली तर खूप दुखः होतं. उपासना आपल्या आईच्या जळत्या चितेला पाहून जोर जोराने हुंदका देवून स्फुंदत होती आणि उर्मिला अजूनही आपल्यावर झालेल्या अत्याचाराच्या धक्क्यातून पूर्णपणे सावरलेली नव्हती. कुलकर्णी आपलं डोकं पकडून जमिनीवर बसला आहे आणि आपल्या बायकोच्या जळत्या चितेला पाहत आहे... सगळीकडे शोक पसरलेलं होतं...

तिथे गावातील सर्व लोकं उपस्थित होते... देव मनातल्या मनात काहीतरी विचार करत आहे... आणि अचानक तो जोराने ओरडून सर्वांना बोलतो, "आता वेळ आली आहे, आपल्यांना प्रत्येक अत्याचार आणि अन्यायाविरुद्ध एकजूट व्हायला पाहिजे, काल जर गावातील थोड्या लोकांनी जरी हिम्मत केली असती तर हा अन्याय झाला नसता... तुम्हा सर्वांसमोर एका बाई सोबत अत्याचार होत राहिला आणि तुम्ही सर्व तमाशा पाहत राहिलात..."

"बस-बस तू आम्हाला जास्त सांगू नकोस, तुझा बाप स्वतः भाऊ साहेबांसोबत असतो आणि तू आम्हाला ऐकवतो आहेस..." चंदू लोहार बोलला...

"पहिले स्वामीजी काय बोलत आहेत ते तरी ऐका..." अजय बोलला...

"स्वामीजी...!! कोण स्वामीजी...?" चंदू लोहाराने विचारले...

"तुम्ही ज्या व्यक्तीला देव नावाने ओळखता तेच आमचे स्वामीजी आहेत, गेल्या एका वर्षा पासून आपलं सर्व काही सोडून देशाच्या प्रेमापायी सामाज सुधार करत आहेत... कारण त्यामुळे आपण धर्म, जात-पात सर्व काही विसरून इंग्रज लोकांचा मुकाबला करू शकू..." अजय बोलला...

"अरे हि तर चांगली गोष्ट आहे, आम्ही तर विचार करत होतो कि पोरगा इथे काही तरी मस्करी करत आहे, बोल बेटा... आम्ही ऐकत आहोत..." चंदू लोहार बोलला...

"हो तर मी हे बोलत होतो कि आपल्यांना एकजूट व्हायला पाहिजे... गोष्ट फक्त ह्या गावातील भाऊ साहेबांसारख्या लोकांची नाही आहे... भाऊ साहेबांची अक्कल आज पण आपण ठीकाण्यावर आणू शकतो... आपली असली लडाई तर इंग्रज लोकांच्या विरुद्ध आहे... ज्यांनी आपल्यांना गुलाम बनवून ठेवलं आहे... पण त्याआधी आपल्यांना सगळे भेद-भाव विसरून एकजूट व्हायला पाहिजे... जात-पात, धर्मांच्या बेड्या तोडल्याच पाहिजेत... तेव्हाच कुठे जाउन आपण एकजूट होवून विदेशी शक्तीचा मुकाबला करू शकू... आपण १८५७ चा संग्राम हारलो कारण, आपण एकजूट नव्हतो नाहीतर आज इंग्रज ह्या भारताच्या जमिनीवर नसते... आम्ही छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये इथे तिथे लडलो आणि परिणाम हा झाला कि आपण खूप बिकट परीस्थित हरलो..."

असल्या गोष्टी सगळ्यांनाच समजत नाहीत... काही लोकं देवला आश्चर्याने ऐकत होते... असं त्यांनी पहिल्यांदा ऐकलं होतं... १८५७ पर्यंतचं कोणालाच माहिती नव्हतं... पण काही नवयुवक असे होते जे देवची गोष्ट खूप मन लावून ऐकत होते...

देवला गावातील लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत नव्हता... हे सर्व पाहून गोविंद हळूच पुटपुटला, "देव असं वाटतंय ह्यांना ह्या गोष्टींशी काहीच घेणं देणं नाही आहे..."

"असं नाही आहे गोविंद, तू झोपलेल्या माणसाला अचानक उठवून पळायला नाही सांगू शकत... ह्या सर्व गोष्टींसाठी वेळ लागतो... गुलामीने ह्यांना आवळून ठेवलं आहे.. काम खूप मोठं आहे पण ह्याला हळू हळू पुढे ढकललं पाहिजे..." देव

-------------------------

भाऊ साहेबांच्या वाड्यातील दृश्य...

"भाऊ साहेब... भाऊ साहेब..."

"काय झालं घनश्याम..?" भाऊ साहेबांनी विचारले...

"गावात तुमच्या विरुद्ध बंड पुकारण्यात येत आहे..." घनश्याम धापा टाकत बोलला..

विश्राम पण त्यावेळी तिथेच होता, तो हे ऐकून त्वेषात आला आणि बोलला, "कोणामध्ये एवढी हिम्मत आली आज...?"

"छोटे मालक तो आपल्या मंदिरातील पुजारीचा पोरगा परत आला आहे, तोच तुमच्या विरुद्ध सर्वांना भडकवत आहे... तो बोलतो कि भाऊ साहेबांना आपण आज बघून घेवू, आपली असली लडाई तर इंग्रजांच्या विरुद्ध आहे..."

"केशव पंडितचा मुलगा...!! तो तर गेली तीन वर्ष गायब होता...??" भाऊ साहेब बोलले...

"हो मालक तोच... तो कोणता तरी स्वामी बनून आला आहे...??"

"बाबा तुम्ही हे सर्व माझ्यावर सोडून द्या... मी आत्ताच जावून त्याची अक्कल ठीकाण्यावर आणतो..." विश्राम त्वेषात मुठ आवळत बोलला...

"ठीक आहे विश्राम जा, बंडाच्या आगोदर त्यांना संपवून ये..."

"मालक एक गोष्ट अजून माहिती पडली आहे..."

"हो बोल काय गोष्ट आहे..." भाऊ साहेबांनी विचारले...

"बातमी हि आहे कि राहुलने संतोषच्या बहिणीला तिच्या घरी सोडलं होतं.."

"काय...? आता कुठे आहे तो धोकेबाज..." भाऊ साहेबांनी आपली मुठ आवळत विचारले...

"तो देव सोबतच होता मालक..., स्मशानभूमीत त्याच्याच सोबत उभा होता...?"

"बाबा तुम्ही चिंता नका करू मी राहुलची पण अक्कल ठीकाण्यावर आणतो..."

"पण विश्राम, ह्या वाड्याच्या मागल्या शेतातून येणाऱ्या किंकाळी विषयी काय करणार तू...??" भाऊ साहेब गंभीर होत बोलले...

"बाबा ते पण बघून घेईन आज..." विश्राम बोलला

"हे सर्व काम करून सर्व माणसं संगीताला शोधण्यासाठी लावा, मला लवकरात लवकर माझी मुलगी पुन्हा इथे पाहिजे..."

"होय बाबा..." विश्राम बोलला...

क्रमशः


Previous Update                    Next Update

0 comments:

Post a Comment