Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Sunday, 20 October 2013

भाग १८ देव उपासना

देव उपासना

भाग १८


समस्त मायबाप वाचकहो, हा भाग टाकण्यात झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल माफी तरी कशी मागु? काही अपरिहार्य कारणांमुळे हा भाग टाकायला खुपच उशीर झाला.या पुढे अशी चुक होणार नाही याची ग्वाही देत हा भाग टाकतोय.


"साधना तू हे सर्व काय बोलतेस...?"

"अजून काय बोलू देव, तू एवढ्या दिवसानंतर परत आलास आणि आता अशी वार्ता करतोयस..."

"बघ तिथे शेतात तुझं जाणं ठीक नाही आहे... तिथे काहीतरी विचित्र होत आहे... तू सोबत असशील तर मला सारखी तुझीच चिंता राहणार... काल जर तू सोबत नसतीस तर मी कालच माहिती केलं असतं कि लफडा काय आहे..."

"जेव्हा तू मला काही समजतच नाहीस तर मग तुला माझी चिंता का असणार..."

"कोण बोललं कि मी तुला काहीच समजत नाही ते ऑ, माझ्या हृदयात आजही तुझ्या प्रती तोच आदर आणि सम्मान आहे जो पहिले होता..."

"पण... प्रेम नाही आहे... हो ना...?"

"मी तुला पहिले कधी बोललो होतो का, कि मी तुझ्यावर प्रेम करतो ते..." देवने विचारले...

"नाही पण..." उपासना एवढं बोलून गप्प बसली... तिने तोंडावर आलेल्या शब्दांना आतमध्येच दाबून ठेवलं...

"आपण चांगले मित्र होतो उपासना... का ह्या मैत्रीला प्रेमाच्या बेड्यांमध्ये बांधत आहेस... तरी पण माझ्या जिवनाच उद्धिष्ट देशासाठी काही तरी करायचं आहे... तुला तर आनंद व्हायला पाहिजे हे सर्व बघून..."

"मला खूप आनंद होतोय देव... पण मी ह्या हृद्याच काय करू जे फक्त तुझ्यासाठीच धडधडत आहे..."

"ह्या हृदयाला तुला दुसऱ्या कोणासाठी तरी ठेवलं पाहिजे... ह्या मैत्रीला मैत्रीच राहू दे..."

"तू खूप पुढे निघून गेलास देव... मी खूप मागे राहिली... आता मैत्री पण कुठे निभवू शकेन..."

"तू ती उपासना नाही आहेस जिला मी ओळखत होतो... काय झालं आहे तुला...?"

"कदाचित प्रेम असंच असतं... असो जाऊ दे... तू जा मी ठीक आहे..." उपासना आणि देव आपल्या बोलण्यातच हरवले होते कि त्यांना आवाज ऐकायला येतो...

"माझ्या सोबत अन्याय झाला आहे... आणि तू मलाच दोषी ठरवत आहेस..." उपासना मागे वळून घरात घुसते...

देव बघतो कि एक माणूस आतमधून बाहेर पडतो आणि रागा रागाने काहीतरी बडबडत त्याच्या बाजूने निघून जातो... थोड्यावेळाने उपासना बाहेर येते...

"काय झालं...!! कोण होता तो...?" देवने विचारले...

"तो उर्मिलाचा नवरा होता... उर्मिला ताईच्या सोबत जे काही झालं आणि घडलं, त्याच्यासाठी ते तिलाच जबाबदार मानत होते... ते बोलून गेले आहेत कि त्याचं आता ताईशी काहीच घेणं देणं नाही आहे..."

"हा काय वेडेपणा आहे... असं कसं घेणं देणं नाही आहे..."

"ह्या पुरुष प्रधान देशात काही पण होवू शकतं... कोणी पण, कधी पण, कुठे पण, आपली सोबत सोडू शकतो..."

"मी तुझी सोबत कधी सोडली... उपासना असं नको बोलूस..." देव बोलला...

"मी तुला नाही बोलत आहे देव... तू जा मी ताईला संभाळते ती रडत आहे... नाहीतरी मला स्वतःला पण सांभाळायच आहे..." उपासना गळा भरून आलेल्या आवाजाने बोलते...

"ठीक आहे मी निघतो... तू कोणत्याही गोष्टीची काळजी नको करूस... माझा मित्र गोविंद इथेच आहे आणि अजय पण... मी विजयला घेवून जात आहे..." देव उपासनाकडे पाठ वळवून बोलला...

"ठीक आहे जा देव..., आपली काळजी घे.." उपासना दीर्घ श्वास घेत बोलली... देवने विजयला आवाज दिला आणि त्याला घेवून शेताकडे निघाला...

"स्वामीजी तुम्ही चिंतीत दिसत आहात..." विजयने विचारले...

"जीवनात कितीतरी वेळा आपल्यांना, आपल्यांच्या मनाला चिरडून पुढे जायला पडतं..." देव बोलला...

"असं करणं पाप नसेल काय स्वामीजी..." विजयने विचारले...

"तुझे प्रश्न दरवेळी मला चिंतीत करतात... आता माहिती नाही हे पाप होईल कि पुण्य.. हो पण एवढं जरूर माहिती आहे कि असं करणं गरजेचं आहे... कधी तुझ्या जीवनात अशी संधी आली तर तू स्वतः समजून जाशील..." प्रेमने उत्तर दिलं...

"कसली संधी स्वामीजी...??"

"काहीच नाही... आता थोडा शांतीने चाल..."

"हो स्वामीजी..."

वाड्यात...

"हे विश्रामला काय झालं आहे दादा... आता तर गावात जायची तैयारी करत होता आणि आता बोलतो कि, एक दोन दिवसात वादळ नाही येणार..." पुरुषोत्तम बोलला...

"माहिती नाही काय गोष्ट आहे... हि सुनबाई पण त्याचं डोकं खराब करून ठेवते..." भाऊ साहेब बोलले...

"ते सर्व तर ठीक आहे दादा पण गावातली आपली पकड ढिली नाही पडली पाहिजे..." पुरुषोत्तम बोलला...

"तू चिंता नको करूस पुरुषोत्तम, विश्राम नाही जाणार तर मी स्वतः जाईन ह्या गावातील लोकांची अक्कल ठीकाण्यावर आणण्यासाठी..."

-------------------

इथे विश्राम आपल्या खोलीत पडल्या पडल्या विचार करत असतो... "ती संगीता कदापि नसू शकते... पण ती होती कोण... आणि तो मुलगा कोण होता...? तो संतोष तर नव्हता... काहीच समजत नाही आहे... ते खोलीतून गायब कसे झाले...? ते दोघे भूत होते काय...?" असले खूप सारे प्रश्न विश्रामच्या डोक्यात येत होते... पण त्याच्याजवळ ह्या प्रश्नांचे काहीच उत्तर नव्हते... तेव्हा विश्राम पाहतो कि पल्लवी त्याच्या जवळ येत आहे...

"मला क्षमा करा मी तुम्हाला खूप दुखः देते..."

"ठीक आहे... ठीक आहे... हे नाटक बंद कर आणि निघ इथून... अपशगुनी कुठली..."

"अपशगुनी तर हे घर आहे... मी नाही... पाहिलंत ना..?"

"गप्प बस नाही तर, ती संगीता नव्हती..." विश्राम रागाने बोलला...

"मला पूर्ण विश्वास आहे कि ती संगीताच होती...?"

"गप्प बसवत नाही ना तुला थांब..." एवढं बोलून तो तिच्या केसांना पकडतो...

"आह.. माझे केस सोडा..."

"तू आजकाल जास्तच वटवट करायला लागली आहेस... आज तुझे ते हाल करीन कि तू आठवणीत ठेवशील..."

"मी तुमची बायको आहे जनावर नाही..."

"मग बायको सारखी राह ना... चल कपडे काढ..."

"बघा दरवाजा उघडा आहे... कोणी आलं तर काय विचार करणार..."

विश्राम जाउन दरवाजा बंद करतो आणि मग खेळ सुरु होतो संभोगाचा खेळ... थोड्यावेळाने खेळ संपतो... आणि विश्राम बोलतो... "चल पळ इथून..."

"काय झालं तुमच झालं... मी अजून अतृप्त आहे... माझी संतुष्टी नाही झाली..."

"मग जा आणि पाण्यात डूब... जा"

"ठीक आहे मी जाते... तुम्ही कुठल्याच कामाचे नाही आहात.. षंढ कुठले..."

"साली... हारामी... तुझं काहीच नाही होवू शकत... मी विचार पण केलं नव्हता कि तू अशी निघणार..." विश्राम रागात बोलला...

तेव्हा दरवाजावर ठक-ठक असा आवाज येतो...

"मी बेड खाली लपत आहे..."

"का... हे सर्व काय नाटक लावून ठेवलं आहे..." विश्राम अचंबित होवून विचारतो...

"तुम्ही दरवाजा खोला ना, कोणी मला विचारलं तर सांगा मी इथे नाही आहे..."

"तू वेडी झाली आहेस..." विश्राम एवढं बोलून दरवाजा उघडतो... जसा तो दरवाजा उघडतो त्याच्या पाया खालची वाळूच सरकते... त्याच्या समोर पल्लवी उभी होती हातामध्ये जेवणाचं ताट घेवून...

विश्राम थर-थरायला लागतो... तो लगेच बाहेर येवून खोलीला बाहेरून कडी लावतो...

"काय झालं... हा दरवाजा का बंद केलात... चला मी जेवण इथेच घेवून आली आहे... जेवून घ्या..." पल्लवी बोलली...

"मला तुझ्या हाताचे काहीच जेवायचे नाही आहे.." विश्राम ने ताटाला हात मारून बोलला.. ताट लांब जावून पडलं आणि त्यामध्ये ठेवलेलं जेवण जमिनीवर पडलं...

पल्लवी उभी राहून फक्त तमाशा पाहत राहिली...

विश्रामच्या कपाळावर घामासोबत विचित्र आठ्या पडल्या होत्या... पल्लवी विश्रामला असं पाहून अचंबित होती...

क्रमशः... 


Previous Update                  Next Update

0 comments:

Post a Comment