Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Saturday, 9 November 2013

भाग २० देव उपासना

 देव उपासना

भाग २०

गावामध्ये...

"स्वामीजी आपण कुठे जात आहोत..?" विजयने विचारले...

"मंदिरात जात आहोत..." देव बोलला...

"मंदिर...! मला वाटलं कि आपण त्या हरामखोर विषयी माहिती काढण्यासाठी जात आहोत..."

"विजय, तू थोडी शांती ठेवशील तर तुझं काय वाईट होईल...?"

"क्षमा करा स्वामीजी... मी तर उत्सुकतेने प्रश्न विचारत होतो..."

"उत्सुकता तर ठीक आहे... पण हि दरवेळी नसली पाहिजे..."

"मी काय करू स्वामीजी... तुम्ही मला काही सांगतच नाही... ह्या प्रकारे माझं ज्ञान कसं वाढणार..."

"ठीक आहे ठीक आहे आता गप्प बस आणि मला बोलू दे..." देव मंदिरा जवळच एका खोलीच्या बाहेर थांबून बोलला...

"हो स्वामीजी..." देव खोलीच दार वाजवतो... आतमधून एक वृद्ध माणूस बाहेर येतो...

"नमस्कार काका.." देव हात जोडत बोलला... त्या वृद्ध माणसाने पण अचंबित होवून देवला नमस्कार केला...

"काका तुम्ही मला ओळखल नाही ना... मी देव आहे, मंदिराच्या पुजारीचा मुलगा..."

"हो ओळखला बेटा... बोल काय गोष्ट आहे... खूप दिवस झाले माझ्या घरी कोणी आलं नाही ना त्यामुळे अचंबित होवून पाहत होतो..."

"काका दत्तू कुठे आहे...?" तो वृद्ध माणूस देवकडे खूप मोठ्या आश्चर्याने पाहतो आणि पाहता पाहता त्याच्या डोळ्यात पाणी यायला लागतं...

"काका तुम्ही रडत का आहात... कुठे आहे दत्तू...?" देवने पुन्हा विचारले...

"हाच प्रश्न तर मी रोज स्वतःला विचरतो बेटा... माझे वृद्ध डोळे थकले आहेत त्याची वाट पाहून पाहून... माहित नाही कुठे निघून गेला माझा मुलगा... तुला माहित नाही काय कि तो गेल्या दोन वर्षांपासून गायब आहे तो...?"

"मला काहीच नाही माहित काका... मी स्वतः गावात नव्हतो..."

"अरे हो तू तर स्वतः गावातून गायब होतास... आज तुला पाहून खूप आनंद होत आहे कि एक ना एक दिवस माझा दत्तू पण परत येईल..."

"स्वामीजी चला इथून मला हे दुखः पाहवत नाही आहे..." विजय देवच्या कानात बोलला...

"काका तुम्हाला काहीही नाही माहित कि तो कुठे गेला...?"

"माहिती असतं तर जावून कधीच परत नाही आणलं असतं बेटा... त्याच्या गेल्यानंतर माझं जीवनच नर्क झालं आहे बेटा..."

"मी समजू शकतो काका... तुम्ही चिंता नका करू सगळं काही व्यवस्थित होईल... मी आता निघतो..." देव हात जोडत बोलला...

"बेटा दत्तूची काही बातमी कळली तर मला लगेच येवून कळव..., त्याच्या आईने खाट पकडली आहे... कोणत्याही क्षणी गतप्राण होवू शकते... दत्तूच्या काळजी मुळेच तिची हि अवस्था झाली आहे... जाता जाता तिला जर दत्तू विषयी काही बातमी कळली कि तिच्या आत्म्याला पण शांती मिळेल..."

"तुम्ही चिंता नका करू काका, दत्तू ची काही ना काही तरी माहिती मिळेलच... मी स्वतःच त्याला शोधून काढेन..." देव त्या म्हातार्याचे हात पकडत बोलला...

"ठीक आहे बेटा... ह्या पूर्ण गावात तुझी खूप स्तुती होत आहे... मला तुझ्यावर पूर्ण विश्वास, भरोसा आहे कि तू माझ्या मुलाला शोधून आणशील..." म्हातारा देव वरती स्तुतीसुमने उधळायला लागला...

"ठीक आहे काका... मी निघतो आता... तुम्ही काळजी नका करू..." एवढं बोलून देव तिथून निघून जातो...

"स्वामीजी माझे तर डोळे भरून आले होते..., तुम्ही कसे एवढे धीरगंभीर बनून उभे राहता..."

"सगळं काही ह्या दुनियादारीने शिकवलं आहे मला..."

"पण स्वामीजी मला काही समजलं नाही, त्या चिमणी मारणाऱ्यासाठी आपण इथे का आलो होतो..."

देव कोणत्या तरी गंभीर विचारात बुडालेला असतो, तो विजयच्या त्या प्रश्नांचे उत्तर पण नाही देत...

"स्वामीजी... काय झालं...??"

"काहीच नाही... गोष्ट खूप गुंतागुंतीची आहे... ह्या गावातून मी गेल्यानंतर खूप भारी मोठी गडबड झालेली वाटतेय..."

"म्हणजे... स्वामीजी मला पण काहीतरी सांगत जा... मी दरवेळी विचार करून करून चिंतीत असतो..."

"तुला आता काय सांगू जेव्हा मलाच अजूनपर्यंत व्यवस्थित काहीच कळलं नाही आहे... गोष्ट तीच सांगितली जाते जी तुम्हाला माहिती आहे... मी स्वतः अजूनही अंधारात तीर मारतोय तर तुला काय सांगू..."

"ह्म्म्म... ठीक आहे स्वामीजी... आत्ता पुढे आपल्यांना काय करायचे आहे...?"

"वाड्याकडे जावूयात..."

"काय...!!"

"काय झालं...??" देवने विचारले...

"तिथे असं एकट जाणं बरोबर असेल स्वामीजी..."

"कशाला घाबरतोयस मी आहे तुझ्या सोबत, त्या चिमणी मारणार्याच्या मागे तर खूप लवकर पळत होतास..." देव स्मित हास्य देत बोलला...

"मेलेले, जिवंत लोकांपेक्षा खूप कमी धोकादायक असतात... त्या दिवशी तुम्हीच तर बोललात ना.." विजय बोलला...

"हो बोललो होतो, पण ह्याचा अर्थ असा नाही होत कि जिवंत माणसांना पण घाबरलच पाहिजे..."

"पण स्वामीजी मी ऐकलं आहे कि तो खूप गिड्डा पाटील आहे... पूर्ण गावात त्याचेच साम्राज्य आहे.."

"साम्राज्य होतं... आता नसणार... चल आपल्यांना अजूनही खूप कामं आहेत..."

"स्वामीजी गोविंदला बोलून घेवूया का, तो मारामारीत हुशार आहे..."

"तू येतोयस कि नाही, कि मी एकटा जावू..."

"नाराज कशाला होता स्वामीजी मला तर तुमचीच चिंता आहे..."

"माझी चिंता नको करूस, आणि चुपचाप माझ्या सोबत चल..." देव बोलला

"ठीक आहे स्वामीजी जशी आपली आज्ञा..." एवढं बोलून दोघेही भाऊ साहेबांच्या वाड्याकडे निघतात...

वाड्यात सगळेजण संगीताला घेवून चिंतीत असतात, वरून वाड्याच्या मागील शेतातून येणाऱ्या किंकाळीने सर्वांची झोप उडाली होती... विश्राम आणि पल्लवी खूप मोठ्या धक्क्यात आहेत... पल्लवीपेक्षा विश्रामची हालत खराब होती... त्याला समजतच नव्हते कि शेवटी इथे होतंय तरी काय...

जेव्हा देव वाड्याजवळ पोहोचतो... तेव्हा भाऊ साहेब त्यांना पाहून रागाने...

"तुझी हिम्मतच कशी झाली इथे येण्याची..."

"भाऊ साहेब माझ्या मनात काही प्रश्न आहेत ज्यांनी मला इथपर्यंत खेचून आणलं आहे..." देव बोलला...

"कसले प्रश्न आणि तुझ्या त्या प्रश्नांशी माझं काय घेणं देणं आहे..." भाऊ साहेबांनी विचारले...

"घेणं देणं आहे भाऊ साहेब, तेव्हाच तर मी इथे आलो आहे..." देव गंभीर होत बोलला...

"दादा हा काय वटवट करत आहे, मला वाटतं ह्याची चामडी सोलून गावातील कोणत्यातरी झाडावर लटकवली पाहिजे, म्हणजे त्यामुळे काय होईल लोकं समजून चुकतील कि आमच्या विरुद्ध जाणाऱ्यांचे हाल कसे होतात ते..." पुरुषोत्तम जो आता पर्यंत चुपचाप उभा होता तो अचानक बोलला...

"अबे ओये माझे स्वामीजी तुमच्या सर्वांची चामडी सोलून काढतील, जास्त भुंकू नकोस..." विजय बोलला...

"विजय तू शांत राह आणि मला बोलू दे..." देव बोलला...

"ठीक आहे स्वामीजी..."

"वाड्यात येवून ह्या प्रकारे बोलण्याची कोणाचीच हिम्मत झालेली नाही आहे, कोण आहे हा मूर्ख..." भाऊ साहेबांनी देवला विचारले...

"हे सर्व सोडा भाऊ साहेब आणि माझ्या प्रश्नांचे उत्तर द्या..." देव बोलला...

"तुझ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देणं मी जरुरी नाही समजत... ह्याच्या पहिले मी तुझी चामडी काढून टाकेन निघून जा इथून..." भाऊ साहेबांची माणसं सावध होवून उभी राहतात...

घनश्याम बोलतो, "मालक तुम्ही फक्त आज्ञा द्या... ह्याचे मी जे हाल करीन कि पूर्ण गाव बघत राहील..."

पण लगेचच देव पुढे होवून भाऊ साहेबांची मान पकडतो... त्याचा उजवा हात त्यांची मान घट्ट पकडतो... आणि डाव्या हाताने एक टोकदार सुई त्याच्या मानेजवळ आणतो...

"कोणीही कसली हि हरकत केली तर आज भाऊ साहेबांच काही खरं नाही... हि छोटीशी सुई ह्यांना एका सेकंदात मृत्यू देवू शकते..." देवने सर्वांना चेतावणी दिली...

"हो हि साधारण सुई नाही आहे... जंगलातील आदिवासी लोकं हिला शिकार करण्यासाठी हिचा वापर करतात..." विजय बोलला...

"तुला पाहिजे तरी काय...?" पुरुषोत्तमने विचारले...

"संतोष आणि संगीता कुठे आहेत...?" देवने विचारले...

"आम्हाला माहिती असतं तर आत्ता पर्यंत संतोषचा मृतदेह तुझ्या समोर असला असता..." भाऊ साहेब दीर्घ श्वास घेत बोलले... ते देवच्या गच्च पकडीत तडफडत होते... भाऊ साहेब खूप शक्तिशाली देहाचे मालक होते पण देवच्या त्या पकडीत त्यांना असं तडफडतांना पाहून सगळेचजण हैराण-चिंतीत होते...

"दत्तू कुठे आहे, भाऊ साहेब...?" देवने पुन्हा विचारले...

"कोण दत्तू, आम्ही कोणत्याच दत्तूला नाही ओळखत..." भाऊ साहेब बोलले..

"विचित्र गोष्ट आहे, शेतात काम करायचा तुमच्या तो..."

"अच्छा तो दत्तू, तो तर कधी पासून गायब आहे, कोणालाच नाही माहिती कि तो कुठे गेला, कदाचित तो हे गाव सोडून कुठे तरी निघून गेला आहे..." पुरुषोत्तम बोलला...

"तुम्ही लोकं खोट बोलत आहात..." देव रागात बोलला... आणि भाऊ साहेबांच्या मानेवरती त्याची पकड अजून जोरात कसली गेली... भाऊ साहेबांचे डोळे बाहेर यायला लागले होते...

"सोडून द्या स्वामीजी हा बेचारा मरून जाईन..." विजयने भाऊ साहेबांची हालत पाहत बोलला...

"मरून जावू दे... नाही तरी इंग्रजांच्या पाळीव कुत्र्याला जिवंत राहण्याचा काहीच अधिकार नाही आहे..." विजयने पहिल्यांदा देवला एवढ्या रागात पाहिले आहे... त्याला काहीच समजत नव्हते कि काय बोलावं...

"बाबा...बाबा..." पल्लवी पळत पळत तिथे येते... ती आतापर्यंत तिथल्या दृश्या पासून अनभिज्ञ होती... सर्वजण तिच्याकडे पाहायला लागतात, देवची पकड भाऊ साहेबांच्या मानेवर ढिली पडते...

"काय झालं ओरडत का आहेस...?" पुरुषोत्तमने विचारले...

पल्लवी भाऊ साहेबांना देवच्या पकडीत पाहून हैराण होते... ती देवला पाहून त्याच्या चरणावर पडते.., "स्वामीजी माझ्या नवऱ्याला वाचवा...!!"

"तू ह्याला कशी ओळखतेस..." पुरुषोत्तमने विचारले...

"गेल्या वर्षी जेव्हा मी माहेरी गेली होती तेव्हा हे आमच्या गावी आले होते..." पल्लवी लगेच बोलली...

"काय झालं तुझ्या नवऱ्याला..." देवने विचारले...

"ते खोलीत बंद आहेत आणि दरवाजा नाही खोलत आहेत... आतमधून विचित्र विचित्र आवाज येत आहेत... आमच्या घरावर कोणत्यातरी भुताचा वावर आहे स्वामीजी... आम्हाला वाचवा... कदाचित संगीताला पण ह्या भूतानेच कुठे तरी घेवून गेला आहे... मला खूप भीती वाटते..."

देव एका झटक्यात भाऊ साहेबांना दूर फेकून देतो... भाऊ साहेब लांब जावून जमिनीवर पडतात...

"तुझी एवढी हिम्मत..." भाऊ साहेब ओरडून बोलतात...

क्रमशः 


Previous Chapter              Next Chapter

0 comments:

Post a Comment