Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Saturday, 23 November 2013

भाग २५ देव उपासना

देव उपासना

भाग २५

"राहुल सर्व गाववाल्यांना मंदिराच्या बाहेर जमा व्हायला सांग... मला सर्वांशी खूप जरुरी गोष्ट करायची आहे..."

"होय स्वामीजी..."

देव मंदिराच्या बाहेर उभा राहून गाववाल्यांची वाट पाहत राहिला होता... पण त्याला दूर-दूर पर्यंत कोणीच येतांना दिसलं नाही...

"कुठे राहिले सर्व लोकं... राहुलने सर्व लोकांना सांगितले आहे कि नाही..." तेव्हा देवला राहुल येतांना दिसला...

"काय झालं... सर्व लोकं कुठे आहेत...?" देवने विचारले...

"कोणी पण यायला तैय्यार झालं नाही स्वामीजी... गावातील लोकांना वाटतंय कि कोणती तरी वाईट शक्ती तुमच्या येण्याने इथे गावात घुसली आहे आणि ती तुमच्या इथून जाण्यानेच निघून जाईल... असं वाटतंय भाऊ साहेबांच्या माणसांनीच हि अफवाह पसरवली आहे..." राहुल बोलला...

"थोडं आपलं पण डोकं वापरायचं असतं... काय झालं आहे ह्या लोकांना... मी तर ह्यांच्यासोबत ह्याच अडचणी विषयी वार्ता करणार होतो... असो सोड मला एकट्यालाच काहीतरी केले पाहिजे..."

"मी तुमच्या सोबत आहे स्वामीजी..." राहुल बोलला...

"ते तू बघ अजूनही आपल्यांना माहिती नाही कि आपल्यांना कोणाचा सामना करायचा आहे ते... तो जे कोणी आहे खूप भयानक आणि भयंकर वस्तू आहे... कारण जो भूतांची पण किंकाळी काढू शकतो ती कोणी साधारण वस्तू नसू शकते..."

"भूतांची किंकाळी...!! काही समजलो नाही स्वामीजी..."

"जी आगतिक किंकाळी शेतात घुमते... ती कोणत्या मानवाची किंकाळी नाही आहे भूतांची आहे..."

"भ..भ..भूतांची..."

"काय झालं आत्ता पासूनच घाबरलास...?" देवने विचारले...

"छे. नाही स्वामीजी अशी गोष्ट नाही आहे... तुम्ही असतांना कसली भीती... हो मला भूतांची गोष्ट ऐकून थोडी भीती जरूर वाटली होती..."

"आपला सामना बहुतांशी नाही उलट कोणत्यातरी दुसयाच वस्तूशी होणार आहे..."

"वाघ भूतांपेक्षा भयंकर असतात काय...?"

"हे वाघाचं काम नाही आहे राहुल... हि दुसरीच शक्ती आहे..."

"तो जो कोणी असो स्वामीजी मी तुमच्या सोबत आहे..."

---------------

"दादा आपला डाव बरोबर पडला आहे... ऐकलं आहे कोणीही गावातला माणूस देवकडे नाही गेला..." पुरुषोत्तम बोलला...

"ते तर ठीक आहे पण हे जे काही झालं ते ठीक नाही झालं... जरूर कुठला ना कुठला तरी धोका ह्या गावावर आला आहे..." भाऊ साहेब बोलले...

"आपल्यांना काय घेणं देणं दादा... आपला वाडा तर सुरक्षित आहे... कोणीच इथे घुसू नाही शकत..."

"वाड्यातूनच खेचून घेवून गेले विश्रामला ते भूत... अजून पर्यंत माहित नाही पडलं कि तो कुठे आणि कसा आहे ते... संगीताचा पण थांग पत्ता नाही... चहुबाजूला काहीतरी विचित्रच वातावरण पसरलं आहे..."

"दादा आता जे झाले ते झाले... नंतर तर कोणताच भूत दिसला नाही इथे..."

"तरी पण काहीतरी विचित्रच वाटतंय इथे..."

तेव्हा पल्लवी तिथे येते...

"बाबा मी आपल्या घरी जाते... आता जर विश्रामच इथे राहिला नाही तर मी इथे राहून काय करणार..."

"हरामखोर तू विश्रामला आत्ता पासून मेलेला मानलास... खूप सारे माणसं पाठवले आहेत मी जंगलात विश्रामला शोधण्यासाठी... आणि तू त्याला आत्तापासून मेलेला मानतेस..."

"दादा हिची पण अक्कल ठीकाण्यावर आणायची आहे... राहुल सोबत मिळून हिनेच इथून पळवल होतं त्या मुलीला..." पुरुषोत्तम बोलला...

पुरुषोत्तमने पल्लवीचा हात पकडला आणि बोलला, "चल तुला चांगलं वागणं शिकवतो..."

"काका सोडा माझा हात... मी आत्ता इथे नाही थांबणार..."

"तुला आता इथे ठेवणार तरी कोण... चल आज तुझा मृतदेह इथे गाडतो... खूप बोलतेस..." पुरुषोत्तम बोलला...

"पुरुषोत्तम हिला वाड्यापासून लांब घेवून जा... इथे काहीच नको करूस..."

"बाबा तुम्ही हे काय करत आहात... थांबवा काकांना..."

"खूप झालीत तुझी नाटकं... पुरुषोत्तम घेवून जा हिला..."

"तुम्ही चिंता नका करू दादा... मी हीच अक्कल ठीकाण्यावर आणतो..."

पुरुषोत्तम तिला खेचत वाड्याच्या मागल्या शेतात घेवून गेला...

त्याने तिला जमिनीवर आपटले... पल्लवीचं पोट जमिनीवर आपटल गेलं त्यामुळे ती वेदनेने विव्हळलि....

"एवढ्या लवकर नाही मारणार मी तुला .... पहिले भोगणार... आणि मग नंतर तुला मारणार..."

"तुला ह्याची शिक्षा भेटणार..."

"कोण देणार मला शिक्षा... तू देणार... हा हा हा... पहिले आपली अब्रू वाचव..." आणि एवढं बोलून तो तिच्यावर जबरदस्ती करायला लागला... पण अचानक त्याच्या डोक्यावर एका मोठ्या लाकडीने वार होतो तो रक्तबंबाळ होवून दुसरीकडे पडतो...

"हरामखोर तू पुन्हा माझ्या रस्त्यामध्ये येतोयस... मी तुला जिवंत नाही सोडणार..."

राहुलने पल्लवीचे कपडे व्यवस्थित केले आणि तिला जमिनीवरून उठवले...

"आज तर हद्दच केली तू... मला आनंद आहे कि आज मी तुमच्यासाठी काम नाही करत आहे..."

"राहुल मारून टाक ह्याला... माझ्यासाठी मारून टाक ह्याला..." पल्लवी बोलली...

"जशी तुमची आज्ञा..." राहुल बोलला आणि पुरुषोत्तमकडे जायला लागला...

"माझ्यापासून लांब राह... नाहीतर चांगलं नाही होणार.." पुरुषोत्तम विनंती करायला लागला...

"सोडू नकोस ह्या हरामखोरला राहुल मार ह्याला..." पल्लवी बोलली...

राहुलने खूप मोठा एक दगड उचलला आणि पुरुषोत्तमच्या डोक्यावर आपटला... डोकं फाटून तो जागच्या जागी मरण पावला...

"तू इथे कसा आलास राहुल..." पल्लवीने विचारले... आणि बोलता बोलता तिचे डोळे पाणावले आणि तिला कळलंच नाही कि ती केव्हा राहुलला बिलगली ते...

राहुल एका पुतळ्यावाणी उभा राहिला आणि पल्लवी स्फुंदत राहिली...

"मालकीणबाई सांभाळा स्वतःला..." राहुल बोलला... हे ऐकून पल्लवी लगेच राहुलपासून विलग झाली...

"ओह्ह.. मी भावुक झाले होते... पण आज तू नाही आला असतास तर अनर्थ झालं असतं..."

"हि सर्व स्वामीजींची कृपा आहे... त्यांनीच तुमचा आवाज ऐकला होता..."

"कुठे आहेत स्वामीजी..."

"त्या झाडा मागे उभे आहेत..." पल्लवी पळत जावून तिथे पोहोचली...

"स्वामीजी माझ्यासोबत असं का होतंय...?"

"सर्व परमेश्वराची माया आहे... आपण तर फक्त खेळणे आहोत..."

"स्वामीजी मला आपल्या घरी जायचे आहे..." पल्लवी बोलली...

"कशी जाणार...?" देवने विचारले...

"कशी पण जाईन पण जाईन... पण इथे एक क्षण थांबणार नाही..."

"हम्म... बघ आता गावातील वातावरण खराब आहे प्रवास करणे ठीक नाही आहे... इथे काहीतरी विचित्र घडत आहे... आत्ता आत्ता माहिती पडलं आहे कि काही दिवसांपूर्वी पुढच्या गावात पण कोणत्यातरी जनावराने दाम्पत्यांना चीर फाडून खावून टाकलं... आणि असल्या वातावरणात कुठे जाणं ठीक नाही आहे..."

"पण मी पुन्हा वाड्यात नाही जावू शकत..." पल्लवी बोलली...

"तुम्ही माझ्या घरी चला... तिथे आरामात राहा... मी तर जास्त वेळ स्वामीजीं सोबतच असतो.."

"हो हे एकदम बरोबर आहे... तुम्ही राहुलच्या घरी थांबा... वातावरण व्यवस्थित झाल्यावर आपल्या घरी जा..."

राहुल पल्लवीला आपल्या घरी आणतो...

"मालकीणबाई तुम्ही इथे आरामात राहा..."

"राहुल मी तुझे आभार कसे व्यक्त करू काहीच समजत नाही आहे... असो ती मुलगी कशी आहे आता जिला आपण वाड्यातून पळवून लावलं होतं..."

"उर्मिला ठीक आहे... गेली ती आपल्या सासरी... तिचा नवरा पहिले खूप सुनावत होता पण गावातील लोकांनी समजावल्यावर तो तिला घेवून गेला..."

"तू प्रेम करत होता उर्मिलाशी हुंह..."

"हो खूप जुनी गोष्ट झाली मालकीणबाई... तुम्हाला कोणत्या वस्तूची गरज भासली तर मला सांगा मी आणून देईन... बाकी इथे खाण्या पिण्याचं सर्व सामान आहे... तुमच्या वाड्या सारखं तर नाही आहे बस काम पूर्ण होईल एवढं तर आहे..."

"हे सर्व त्या अशुभ वाड्यापेक्षा तरी चांगलं आहे... मी इथे खुश आहे तू काळजी नको करूस..."

"ठीक आहे मालकीणबाई मी निघतो मला पुन्हा स्वामीजींकडे जायचे आहे..." राहुल बोलला आणि निघून गेला...

क्रमशः.... 


Previous Update                    Next Update

0 comments:

Post a Comment