Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Friday, 13 December 2013

पापी... एक गूढ सत्य भाग तिसरा

 पापी... एक गूढ सत्य थरारक आणि रहस्यमयी कथा

अध्याय पहिला पराभव

भाग तिसरा


 
"कम ऑन पप्पा, पकड़ा मला, तुम्ही ह्याहीपेक्षा चांगलं करू शकाल तरच जिंकू शकाल नाही तर तुम्हाला पराभव पत्करावा लागेल..." ती आपल्या पप्पांशी बोलत होती... पण तिचा श्वास आत्ता अडखळत होता...

"टाईम अप प्लीज..." तिच्यासाठी एवढंस वाक्य बोलणं पण कठीण जात होतं... ती थांबून आपल्या श्वासांवर नियंत्रण आणत बोलली...

तिने पुन्हा पाळायला सुरुवात केली, ती मुलगी अजूनही त्याच्या पासून लांब पळत होती, शेवटी त्याने थोड्या श्रमाने तिला पकडले... जसंच त्याने तिला पकडलं आणि तिचा चेहरा आपल्याकडे फिरवला, तिचं एका माणसात रुपांतर झालं होतं... त्या माणसाचा चेहरा पूर्णपणे रक्ताने भरलेला होता आणि काही रक्त त्याच्या तोंडातून स्त्रवत होतं...

डॉक्टर अवधूत कुलकर्णी आपल्या दुस्वप्नातून उठले होते... काही विचित्र गोंधळ त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता... अचानक बेडच्या जवळ ठेवलेल्या फोनची रिंग वाजली... ते विचारात डुबले कि एवढ्या रात्री त्यांना कोण कॉल करू शकतो ते... त्यांनी आपल्यात घड्याळात पाहिले पहाटेचे ४ वाजले होते, त्यांनी रिसीवर उचलला...

"हेल्लो, मी डॉक्टर अवधूत कुलकर्णीशी वार्ता करू शकतो का.." समोरून एका माणसाचा आवाज आला...

"हो बोलतोय... आपण कोण...?"

"मी संतोष पाटील स्पेशल इन्वेस्टीगेशन ब्रांच मुंबई, मला तुमच्याशी खूप जरुरी वार्ता करायची आहे..."

"तुम्हाला आत्ता माहिती आहे, कि सध्या काय वेळ झाली आहे ती...?" डॉ. अवधूत चिडत बोलले...

"होय... पण माझं तुमच्याशी बोलणं खूप जरुरी आहे..."

"तुम्हाला माझा नंबर कसा मिळाला...?" आता डॉ. अवधूत तो काय बोलत आहे त्याकडे दुर्लक्ष करत बोलले...

"मी बोललो होतो ना कि मी स्पेशल ब्रांच मधून आहे... त्यामुळे आम्ही कोणाचाही नंबर आणि पत्ता शोधू शकतो, आमच्याकडे आमचे काही सोर्सेस आहेत..."

"तर मग तुमच्या त्या सोर्सेसने तुम्हाला हे नाही सांगितलं का कि मला मैत्री करणे पसंत नाही आहे आणि खास करून जे पोलीसातून असतील तर..." आता ते जरा चिडून मोठ्याने बोलायला लागले होते...

"होय डॉ. मला माहिती आहे... खरोखर तुमचा पत्ता सापडणं खूप कठीण होतं पण आम्हाला आमच्या गरजेपायी हे करायला लागलं... ह्यावेळी एक तुम्हीच आहात जे आमची मदत करू शकता..."

"मी तुमची मदत जरूर करू शकलो असतो पण क्षमा करा मला आपलं उरलेलं जीवन शांतीपूर्वक व्यतीत करायचं आहे..."

"प्लीज डॉ. मी काय बोलतोय ते एकदा ऐकून घ्या... जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही करण्यासाठी रस वाटत नसेल तर मी तुम्हाला पुन्हा त्रास नाही देणार... ह्यामध्ये खूप साऱ्या लोकांचं जीवन अवलंबून राहिलं आहे..."

"हे जग खूप खराब आहे... इथे प्रत्येकाचं जीवन कोणावर ना कोणावर तरी अवलंबून आहे आणि कोणालाच माहिती नाही कि कधी काय होईल आणि काय नाही ते... आणि जाणाऱ्यांना कोणीच थांबवू शकत नाही..."

"जर तुम्ही आम्हाला सहकार्य कराल तर खूप लोकांचा जीव वाचेल, तुम्ही हे करू शकता हे तुम्हाला पण माहित आहे... माणुसकीच्या नात्याने ह्यांना वाचवा..."

"कोण बोललं तुम्हाला कि मी माणूस आहे, मी तर फक्त एक शरीर आहे जो फक्त श्वासोश्वास करतोय, माझी आत्मा कधीच निघून गेली आहे... माझ्या सोबत तुमचा वेळ नका वाया घालवू, कोणीतरी दुसरा शोधा जो खरोखर तुमची मदत करू शकेल..." एवढं बोलून डॉ. अवधूतने रिसीवर आपटला...

त्याने आपले डोळे बंद करून एक दीर्घश्वस घेतला आणि पुन्हा त्याने त्याच स्वप्ना विषयी विचार करायला सुरुवात केली जी त्याला गेल्या १० वर्षांपासून सतावत होती आणि असंच रात्रीअपरात्री तो चर्फडून जागा व्हायचा... त्याने कपाटातून झोपेच्या गोळ्यांची बाटली काढून ३ गोळ्या खाल्ल्या...

त्याला पूर्ण विश्वास आणि खात्री होती कि पुन्हा तेच स्वप्न पडणार... पण ते काही बहुमोल क्षण जे त्यांनी आपल्या मुलीसोबत घालवले आहेत.... ते पाहण्यासाठी ते पुन्हा त्याच रक्ताने माखलेल्या माणसाचा चेहरा पाहण्यासाठी सज्ज होतात.क्रमशः...

आधीचा भाग                   पुढील भाग

0 comments:

Post a Comment