Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Wednesday, 4 December 2013

भाग २७ देव उपासना

देव उपासना

भाग २७

देव पूर्ण गावात सर्वीकडे फिरत असतो... पण त्याला कोणीच दिसत नाही... पण राहून राहून त्या किंकाळ्या गावात ऐकायला येत होत्या...

'ह्या किंकाळ्या तर ऐकायला येत आहेत, पण दिसत तर कोणीच नाहीये... जर तो इथे आहे तर दिसत का नाहीये... खरोखर हा पिशाच्च आहे का...? कि कोणी दुसरी दैविक शक्ती...?' देव हे सर्व विचार करत करत रात्रीच्या भयाण काळोखात पुढे जात होता, कि त्याला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज ऐकायला आला... देवने सर्वीकडे पाहिले पण दिसत कोणीच नव्हतं...

"हा मरणार, कोणी तरी ह्याला वाचवा... आला आला... नको वाचवा ह्याला..."

'हा आवाज कुठून येत आहे...' देव गोंधळला... देव आवाजाच्या दिशेचा अंदाज लावत एका दिशेने जायला लागला... पिंपळाच्या झाडाखाली बसून एक माणूस रडत होता...

"आला आला... ह्याला कोणीतरी वाचवा..."

"ए कोण आहेस तू...! आणि रडत का आहेस...?? गावातली सर्व लोकं तर घरात आहेत आणि तू एवढ्या रात्री इथे काय करत आहेस...!!!" देवने खूप सारे एकत्र प्रश्न केले...

"मला खूप दुखः आहे... कोणी तरी वाचवा ह्याला..." तो माणूस स्फुंदत बोलला...

"कोणी अडचणीत आहे काय...!! मला सांग मी त्याची मदत करेन...!"

तो माणूस पुन्हा जोर जोराने रडायला लागला, आणि बोलला, "कोणी तरी वाचवा ह्याला... :'("

"कोणाला वाचवण्यासाठी बोलत आहेस... मला सांग मी तुझी मदत करेन..." देव बोलला...

"तुझा जीव संकटात आहे... त्यामुळे तुझ्या मदतीसाठी कोणाला तरी बोलवतो आहे..." तो माणूस बोलला...

"काय वटवट करतोयस..." देव बोलला...

"असंच काही तरी तुझे सहकारी काल बोलले होते... मी त्यांना बोललो होतो कि तुमचा जीव संकटात आहे कोणाला तरी बोलवा... पण ते लोकं माझ्या बोलण्या वरती वर तोंड करून हसायला लागले आणि हुज्जत घालत होते.... मग काही वेळातच मारले गेले..." एवढं बोलून तो माणूस पुन्हा रडायला लागला...

"काय...? तू त्यावेळी तिथेच होतास...!!"

"हो... मी खूप आवाज दिला मदतीसाठी पण कोणी आलंच नाही..."

"माझ्यासाठी तुला रडण्याची काहीच गरज नाहीये... तू आपली चिंता कर..."

"हा हा हा... खूप चांगलं... तुला खाल्ल्याने खूप मजा येईल... मला हिम्मती लोकांचं मांस खाण्यात खूप मजा आणि आनंद होतो..."

"तू पिशाच्च आहे...!!"

"हा हा हा... पिशाच्चला त्याच्याच विषयी नाही विचारायचं असतं, येड्या आपली चिंता कर... तुला मारण्यात खूप मजा येईल..."

"हा हा हा... मला पण तुला मारण्याने मजा येईल... पिशाच्चला मारण्याने चांगलं वाटेल मला..." देव पण हसायला लागला...

देवची गोष्ट ऐकताच तो माणूस उभा राहिला आणि क्षणाचाही विलंब न करता देववर उडी मारली...

पण देव तिथून लगेच बाजूला झाला आणि आपली मुठ बंद करून काही मंत्र पुटपुटले आणि मुठ खोलून काही तरी त्याच्या डोळ्यात टाकले...

पिशाच्च डोळे चोळायला लागला आणि इकडे तिकडे हात मारून गायब झाला...

"कुठे गायब झालास दोस्ता... ये थोडं अजून खेळुयात... मला पण आता रडायला येत आहे कोणीतरी तुला वाचवायला यायला पाहिजे..."

पिशाच्च डोळे चोळत चोळत जंगलात आपल्या ठीकाण्यावर पोहोचला...

'कोण आहे हा मुलगा ज्याने माझी अशी हालत केली... ह्या मुलाला तर मी त्याचे हाल हाल करून मारणार... ह्याच्या पूर्ण परिवाराला खावून टाकणार... हे हे हा हा हा...' पिशाच्च जोर जोरात हसायला लागला...

त्याचा आवाज ऐकून जनावर पण इथे तिथे पाळायला लागलेत... पिशाच्चने एका हरणावर झडप घातली आणि त्याला फाडून खावून टाकलं, "माणसाच्या मांसात जी चव आहे ती ह्या जनावरांच्यात नाही..." पिशाच्च बोलला...

इथे देव पिशाच्चला सर्वीकडे पाहत फिरला पण तो त्याला कुठेच सापडला नाही....

-------------------------------

बाहेर जेव्हा हालचाल कमी झाली तेव्हा दोघेही आपापल्या बिछान्यावर येवून पहुडले...

"अच्छा राहुल तू अजूनपर्यंत लग्न का नाही केलंस...!!"

"मालकीणबाई उर्मिला शिवाय कोणाशी लग्न करायचं मनच नाही झालं..."

"उर्मिला सारखीच मुलगी पाहिजे तुला..."

"तुमच्या सारखी पण मला चांगली वाटेल..."

"तर मग मी तुला चांगली वाटते..."

"तुम्ही कोणाला चांगल्या नाही वाटणार... तुमच्या सारखी कोणी भेटली तर नाशिबंच उजळेल.." राहुल बोलला...

"मी झोपते आता..."

"ठीक आहे..." राहुल बोलला, 'मालकीणबाई सारखीच कोणी मुलगी माझ्या जीवनात आली पाहिजे...' राहुल आपल्या मनातल्या मनात बोलला...

----------------------------

रात्र उलटून दिवस उजाडलेला असतो... संतोष सकाळीच संगीताकडे आलेला असतो... दुसरीकडे भाऊ साहेब पाटलांची हालत खालावत चाललेली होती... पहिले विश्राम आणि नंतर पुरुषोत्तम... त्याच्या मनात धास्ती घर करून बसली होती... वैद्य बोलतो कि ते आत्ता फक्त काही दिवसांचेच पाहुणे राहिले आहेत...

राहुल सकाळ होताच घरातून बाहेर निघण्याची तैयारी करतो, "मला जावून... स्वामीजींना भेटलं पाहिजे..."

तो पल्लवीला आवाज देतो कारण पल्लवी उठून दरवाजा आतून बंद करून घेवू शकते... पण पल्लवी एकदम गाड झोपेत असते... राहुल पल्लवीच्या खांद्यावर हात ठेवून तिला हलवतो...

"क...क... कोण आहे...?"

"मी आहे मालकीण बाई... राहुल..."

"काय झालं...?"

"तुम्ही उठून आतून कडी लावा... मी बाहेर जातोय... तुम्हाला आंघोळ वैगेरे करायची असेल तर बाहेर व्यवस्था करून ठेवली आहे..." राहुलने बाहेर एक छोटंस स्नानगृह बनवून ठेवलं होतं... ज्याच्यावर फक्त एक परदा लावून ठेवला होता...

"माहिती आहे मला..."

"ठीक आहे मग कडी लावून घ्या..." राहुल निघून जातो...

'कुठे भेटणार स्वामीजी' राहुल विचार करत होता... तो मंदिराकडे जातो... देव राहुलला रस्त्यातच भेटतो...

"सकाळी सकाळी कुठे चालला आहेस..."

"तुमच्या जवळच येत होतो स्वामीजी... तुम्हाला काही माहिती पडलं पंडितजिंकडून..."

"हो माहिती पडलं... आणि माझा काल रात्री पिशाच्चशी सामना पण झाला..."

"मग काय... तो पिशाच्च आहे काय...?"

"हो..."

"अरे परमेश्वरा..." राहुलची तर पिशाच्च नाव ऐकूनच बोबडी वळली होती...

"घाबरू नकोस त्याचं काही ना काहीतरी होवूनच जाइल.."

"काय करणार तुम्ही..."

"बघुयात... तू घरीच थांब माझी चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे..."

"नाही स्वामीजी... मी घाबरलो जरूर आहे पण... मी तुमची संगत कधीच नाही सोडणार..."

"जशी तुझी मर्जी... मी आता घरी जातोय... झोप येत आहे मला... कदाचित तो पिशाच्च रात्रीच येईल... मी थोडं आराम करून घेतो... कोणती पण गोष्ट असेल तर मला सांग..."

"हो स्वामीजी... तुम्ही काळजी नका करू..." राहुल बोलला...

देव आपल्या घराकडे जातो... जेव्हा तो घराकडे पोहोचला तेव्हा बाहेर उपासना उभी होती...

"तू इथे काय करतेस...?" देवने विचारले...

"तू माझ्यावर चिडला आहेस ना..." उपासनाने विचारले...

"मी कोणावरच चिडलो नाही आहे... आता जा मला झोपायचे आहे... खूप थकलो आहे..."

"माझ्याशी मुळीच बोलणार नाही आहेस... प्रेम करणार्यांना एवढं पण नाही सतवायच असतं..."

"तुझं प्रेम माझ्यासाठी विष बनलं आहे... कृपया करून मला एकट सोड..."

"मी तुला शेवटचंच भेटायला आली आहे... आजच्या नंतर तुला कधीच त्रास नाही देणार..." उपसनाचे डोळे पाण्याने भरले...

"हे बघ तू समजण्याचा प्रयत्नच नाही करत आहेस... मी आता तो देव राहिलेलो नाहीये..."

"नाही... मी आता समजून चुकली आहे... आपली काळजी घे..." उपासना आपले अश्रू पुसत बोलली...

"तू अजूनही नाही समजली आहेस... निघ इथून... माझ्यावर ह्या आसवांचा काहीच परिणाम होणार नाहीये..."

"माझ्याकडून ज्या काही चुका झाल्यात त्याच्यासाठी मला क्षमा कर..." एवढं बोलून उपासना तिथून निघून गेली...

देवने आपल्या घराचा दरवाजा उघडला... पण तो आतमध्ये जाण्याच्या उलट हवेत उडून बाहेर आपटला गेला... तो एवढ्या जोराने आपटला गेला कि त्याच्या पडण्याचा आवाज उपसनाला पण ऐकू आला...

"दे$$व..!!" उपासना किंचाळली...

देव एवढ्या जोरात आपटला गेला होता कि त्याच्या डोळ्यांपुढे काळोख पसरत चालला होता...

उपसनाची किंचाळी ऐकून शेजारचे काही लोकं पण बाहेर आलेत... देवच्या घरामधून पिशाच्च बाहेर आला... आणि देवच्या समोर खाली वाकून बोलला, "खेळायचं होतं तुला... चल ये जंगलात जावून खेळुयात..."

"ए कोण आहेस तू... आं..." उपासना किंचाळली...

"पिशाच्चशी त्याच्या विषयी नाही विचारत... स्वतःची चिंता करायची असते... हा हा हा हे हे... आज ह्या हिम्मती मुलाचं मांस खाणार..."

पिशाच्चची गोष्ट ऐकताच सगळे लोक पुन्हा आपापल्या घरात घुसले...

'घाबरगुंडे साले... सर्वे पळाले... मलाच काहीतरी केलं पाहिजे...' उपासना बोलली...

उपसनाने एक दगड उचलला आणि पिशाच्चच्या डोक्याला निशाणा लावून मारला...

"दगड मारतेस थांब जरा पहिले तुलाच खातो..." पिशाच्च बोलला...

देवला सोडून पिशाच्च उपासना जवळ येतो...

"नाही... नाही... मी प्रतिज्ञा घेतली आहे कि रात्र होण्याच्या पहिले ह्या मुलालाच खाणार... आत्ता तुला सोडतो पण पुढच्यावेळेस तुला खाईन... हे हा हा हा .... आज बस ह्याचंच मांस खायचं आहे मला..."

पिशाच्चने देवला आपल्या खांद्यावर घेतलं आणि तिथून गायब झाला... तो देवला आपल्या सोबत घेवून जंगलात आपल्या ठीकाण्यावर पोहोचला...

'हा तर देवला आपल्या सोबत घेवून गायब झाला... अरे परमेश्वरा आता काय होणार...?" उपासना शहारते...

उपासना मंदिराकडे पळत पळत जाते...

'मला हि गोष्ट देवच्या बाबांना सांगितली पाहिजे...' उपासना पळत पळत विचार करते...

-----------------------------

देवचे बाबा उपसनाला मंदिराच्या जिन्यावरच भेटले...

"बाबा अनर्थ झालं... तो... तो... पिशाच्च देवला उचलून घेवून गेला...?"

"काय...!!" हे ऐकताच देवचे बाबा जिन्यावरच कोसळले...

"बाबा...!!" उपासना किंचाळते... देवचे बाबा जिन्यावरून कोसळत कोसळत खाली जमिनीवर आले...

तोपर्यंत राहुल पण तिथे पोहोचतो...

"काय झालं ह्यांना..." राहुल विचारतो...

"देव विषयी ऐकून खाली पडले..." उपासना बोलली...

राहुल देवच्या बाबांना उठवतो... पण त्याचे बाबा डोकं पकडून तिथेच खाली बसतात...

"काय झालं स्वामीजींना..." राहुलने उपासनाला विचारले...

"माहित नाही कुठे... पिशाच्च त्यांना उचलून घेवून गेला..." उपासना बोलली...

"नाही नाही असं नाही होवू शकत... स्वामीजीं सोबत असं मुळीच होवू शकत नाही..." राहुलला विश्वासच बसेना..

"सर्व काही माझ्या डोळ्या समोर झालं राहुल... मी स्वतः सर्वकाही आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहे..."

"अरे परमेश्वरा हे तर खूप वाईट झालं... आता काय होणार...?" राहुल बोलला...

"शेजारचे लोकं तर घरात घुसून बसले आहेत... आत्ता आपल्यांनाच जे काही करायचे आहे ते करायचे आहे..."

"काही पण करण्यात फायदा नाही आहे... पिशाच्च त्याला नाही सोडणार.." बाबा बोलले... ते जमिनीवर डोकं पकडून बसले होते...

"काल खूप समजावलं होतं मी देवला पण तो ऐकला नाही... पिशाच्चच कोणीच काहीच बिगाडू शकत नाही..."

"तुम्ही देवचे बाबा असून असे बोलत आहात... काही तरी अपेक्षा ठेवली पाहिजे तुम्हाला..."

"जे खरं आहे.. त्याला स्वीकारतोय... तुम्ही दोघं पण स्वीकारा... कदाचित परमेश्वराची हीच इच्छा आहे..."

"असं कसं होवू शकतं... काही तरी पर्याय असेल देवला वाचवण्याचा..." उपासना बोलली...

"एक उपाय आहे पण तो खूप कठीण आहे..." बाबा बोलले...

"काय उपाय आहे...?" उपासनाने विचारले...

"मंदिरात शंकराच्या हातात जो छोटा त्रिशूल आहे... त्याला त्या पिशाच्चच्या बेंबीत घुसवलं पाहिजे... पण तो पिशाच्च असं मुळीच होवू देणार नाही... आणि जो पर्यंत पिशाच्च जिवंत आहे... देवचं वाचणं कठीण आहे... कोणास ठावूक त्याने आत्ता पर्यंत देवला मारलं पण असेल..." बाबा बोलले...

"तो देवला मारण्याच्या घाईत नव्हता... तो त्याला उचलून घेवून गेला आहे... मला आशा आहे कि देव अजूनपर्यंत जिवंत आहे..." उपासना बोलली...

"पण आपल्यांना हे पण तर नाही माहिती कि तो पिशाच्च स्वामीजींना घेवून कुठे गेला आहे..." राहुल बोलला...

"पिशाच्च जंगलात राहणं पसंत करतात... तो पक्का त्याला जंगलात घेवून गेला असेल..." बाबा बोलले...

"आपल्यांना उशीर नाही केला पाहिजे... बाबा मला तो त्रिशूल द्या... मी मारणार त्या पिशाच्चला..." उपासना बोलली...

"त्रिशूल तर घेवून जा... पण मला नाही वाटत कि तुम्ही काही करू शकता..." बाबा निराश होत बोलले...

क्रमशः....


Previous Update                     Next Update

0 comments:

Post a Comment