Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Thursday, 5 December 2013

प्रस्तावना पापी... (एक गूढ सत्य)

नोट: - ह्या कथेचा मूळ लेखक दुसरा आहे... मी फक्त एक अनुवादक आहे, त्यांची परवानगी घेवूनच मी हि कथा मराठीत अनुवाद करत आहे... हे वाचकांनी ध्यानात ठेवावे...

मूळ लेखक: - नाव माहित नाही
अनुवादक: - दत्ता उतेकर - ०८०९७५८१७८८

पापी... (एक गूढ सत्य) (थरारक आणि रहस्यमय कथा)

प्रस्तावना

त्याला ज्वलंतशील मांसाच्या गंधाची जाणीव होत होती आणि त्याला हे हि माहित होतं कि, तो गंध त्याच्याच मांसाचा आहे. त्याने थरकाप उडालेल्या स्थितीत आपल्या समोर उभ्या असलेल्या व्यक्तीकडे भयाने पाहिले.

तो वेदनेने कण्हत हळूच बोलला, "तुला माहिती आहे कि, ती वस्तू माझ्या जवळ नाही आहे...!!"

समोर उभा असलेला व्यक्ती त्याच्यावर डाफरला, "मला चांगलंच ठावूक आहे कि ते पुस्तक तुझ्याच जवळ आहे... ते मला दे नाही तर मी तुझ्या प्रत्येक मांसाच्या तुकड्याला जाळून टाकेन.."

तो समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला पुन्हा विनंती करत बोलला, "मी तुझ्या डोळ्यात क्रोध आणि आपल्या मृत्यूचा चेहरा पाहू शकतो, असल्या क्षणी मी कसा काय खोटं बोलू शकतो...!!"

"मी तुला चांगल्याप्रकारे ओळखतो, तू खूप मोठा नायालक माणूस आहेस, तुझ्या सारखा एक हरलेला माणूस कुठेच नाही आहे. ती वस्तू तुझ्या जवळ असून सुद्धा तू त्याचा वापर करू शकला नाहीस... मला माहिती आहे कि तू ते पुस्तक मला देण्याव्यतिरिक्त मरणंच पसंत करशील..." एवढं बोलून त्या समोर उभ्या असलेल्या व्यक्तीने अजून एसिडचे  काही थेंब त्या माणसाच्या शरीरावर टाकलं.

"मी खोटं नाही बोलत, असं कुठलंही पुस्तक नाही आहे, त्याने आपल्या मरण्याच्या आगोदरच ते पुस्तक जाळून टाकलं होतं..." तो ठो-ठो बोंबलत रडत बोलला... त्याला जाणीव झाली होती कि ह्याहीपेक्षा जास्त आता तो सहन करू शकत नव्हता...

"खूप वाईट गोष्ट आहे कि आता तू माझ्या कोणत्याच कामाचा नाही आहेस..."

"नको.... नको... प्लीज देवापायी असं नका करू..."

"मी देवामध्ये विश्वास नाही ठेवत, कारण मी पापी आहे... हा हा हा हा"


नोट: - देव उपासना संपल्यानंतर लवकरच हि कथा तुम्हा सर्वांसमोर येणार आहे तर वाट पाहत राहा...

0 comments:

Post a Comment