Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Thursday, 9 January 2014

पापी... एक गूढ सत्य भाग पाचवा

पापी... एक गूढ सत्य (थरारक आणि रहस्यमयी कथा)

अध्याय दुसरा नंबर्स आणि चिन्ह

भाग पाचवा

"ह्या महिन्यात झालेली हि दुसरी हत्या आहे, इथे बसून हातावर हात ठेवून विचार करण्यापेक्षा, ते जे कोणी डॉ. अवधूत आहेत त्यांना आग्रह करून, लवकरात लवकर ह्यावर तोडगा काढण्यासाठी सांगायला पाहिजे...?" शिऱ्याच्या आवाजात चिंता साफ दिसत होती...

"मी त्यांना समजावण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे, खरं म्हणजे ते काही ऐकूनच घ्यायला तैयार नाहीत... मी आधी जसं बोललो होतो कि असल्या घटना ह्या आधी पण घडल्या आहेत मी त्या विषयी काही किरकोळ माहिती गोळा केली आहे... ते पाहून तू आश्चर्यचकित होशील..." संत्या बोलला...

"ते काय...?" शिऱ्याने उत्सुकतेने विचारले...

"अज्जूने (अजित गायकवाड) आज काही फाईल्स पाठवल्या आहेत, ज्या मध्ये काही अश्या केसेस आहेत ज्या आपल्या केसशी तंतोतंत जुळतात..." एवढं बोलून संत्याने ती फाईल शिऱ्याच्या पुढे सारली...

"गेल्या १० वर्षात ५ वेळा एकदम अश्याच प्रकारे मुलींची हत्या करण्यात आली आहे, ज्या प्रकारे ह्या २ मुलींची हत्या झाली आहे..." संत्या बोलला...

"तर तुला असं बोलायचे आहे कि ह्या घटना आधी पण झाल्या आहेत..." शिऱ्याने विचारले...

"होय, पण फाईल्स वाचून समजलं कि शिवाय पेपरवर्क सोडून ह्या केसवर काहीच पडताळणी केली गेली नाही आहे, पण ह्यातील रिपोर्ट्स आणि घटनास्थळीचे चित्र पाहून तरी मला असं वाटतंय कि हत्यारा एकच आहे... आणि एक गोष्ट माहिती आहे जेव्हा अशी घटना घडते तेव्हा दरवेळी मुलींची संख्या वाढतच जाते... गेल्यावेळी 4 मुलींची बळी दिली गेली होती..."

"हि तुझी फ़ाइल बोलते कि दरवेळी खुनाची संख्या वाढते त्यामुळे ह्यावेळी ४ पेक्षा जास्त हत्या होणार...?" शिऱ्या आपल्या त्याच चीतपरीचीत चिडचिड्या स्वरात बोलला...

"मी पक्का तर नाही सांगू शकत कि ह्यावेळी ४ किंवा त्याही पेक्षा जास्त हत्या होणार आहे, पण आपल्यांना एका गोष्टीवर दूरदृष्टी टाकली पाहिजे, कि ज्या प्रकारे त्या मुलींची हत्या होत आहे आणि त्यांचे रक्त घेतले जात आहे, ह्या विषयावर मी डॉ. अवधूतचे पुस्तक वाचले आहे... आणि माझा संशय असा आहे कि त्या रक्ताचा आणि काळ्या जादूचा काहीतरी मोठा संबंध आहे..." संत्या बोलला...

"आता तुझं वायफळ बोलणं बंद कर... माणसं चंद्रावर जावून आले आहेत, ह्या वैज्ञानिक युगात ह्या गोष्टींवर कोण विश्वास करणार आणि कोण हे सर्व करणार...? मी तर असल्या गोष्टींवर विश्वास नाही ठेवत... ह्या सर्व हत्या कोणत्या पागलने नाहीतर माथेफिरूने केल्या असतील... आणि आता पुन्हा तो असले गुन्हे करत फिरत आहे, आजचे क्रिमिनल, सायकोलॉजि केस तुला असल्या प्रकारचे खूप सारे उदाहरण देवू शकतात..." शिऱ्या बोलला...

"खरोखर...? शिऱ्या तू आहेस म्हणून सांगतोय माझ्या कारकिर्दीत मी एक गोष्ट शिकली आहे कि जिनिअस आणि इनसानिटी मध्ये एक धुसर रेघ असते... आणि हा माणूस ज्या प्रकारे मुलींची हत्या करून त्यांचं रक्त काढत आहे आणि मग असा गायब होतो कि जसं काही त्याचं काहीच अस्तित्व नव्हतं, हे कुठेही माथेफिरूच्याकडे इशारा नाही करत.. आणि एवढी सारी हत्या एवढ्या चतुराईने केल्या गेल्या आहेत आणि त्याच प्याटर्न नुसार... आणि आजपर्यंत त्याने त्याच्या विरुद्ध एकही पुरावा सोडला नाही, इथे काही न काही तरी असं आहे जे आपल्यांना दिसत नाही आहे एक अशी शक्ती जी ह्या सर्वांच्या मागे आहे आणि त्यांची मदत करत आहे..." संत्या बोलला...

"हे बघ मी पण एकदम पक्का नाही सांगू शकत कि शेवटी हत्यारा हत्या का करत आहे.... तरीपण डॉ. अवधूतशी वार्ता करण्यात समस्या काय आहे... ह्या बाबतीत ते आपल्या पेक्षा जास्त ज्ञान ठेवतात, जर ह्या केस मध्ये काळ्या जादू विषयी काहीच नसेल तर ते एका क्षणात सांगतील आणि जर असेल तर त्यांच्या पेक्षा अधिक चांगला कोणीच नाही जो आपली मदत करू शकेल..."

"बघ जर तुला वाटतंय कि ते ह्या बाबतीत आपली मदत करू शकतात तर ह्यासाठी त्यांना आग्रह करण्यासाठी तुझ्याकडे खूप कमी वेळ आहे..." शिऱ्या शांत स्वरात बोलला...

"मी त्यांना मुलींच्या हत्येचे आणि तिथल्या चिन्हांचे चित्र पाठवले आहेत... आशा आहे कि ते त्यांना पाहून आपल्यांना संपर्क करतील... पण जर असं नाही झालं तर आपल्यांना कोणी दुसरा शोधला पाहिजे जो आपली मदत करू शकेल... पण ह्या वेळी ह्या खुनीला मी जिवंत सोडणार नाही..." संत्या काहीतरी विचार करत बोलला... त्याच्या डोळ्यांपुढे काही नंबर्स आणि चिन्ह आले.. ते अश्या प्रकारे होते...
 

22, 33, Ð, =

तर मित्रांनो काय असेल ह्या चिन्हांचे रहस्य... प्रश्नच प्रश्नच नाही का... त्याची लवकरच तुमच्या समोर उकल होईल...

क्रमशः...

आधीचा भाग                   पुढील भाग

0 comments:

Post a Comment