Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Wednesday, 10 December 2014

~ ~ हत्यारा ~ ~ भाग दुसरा

~ ~ हत्यारा ~ ~ एक चित्तथरारक कथा

भाग दुसरा

भ्रमणध्वनीवर त्याचा जिवश्च-कंठश्च, बालपणापासुनचा मित्र आकाश उर्फ 'अक्की' चा नंबर बघुन संतोषला रहावले नाही... संत्या आणि अक्की लहानपणापासुनचे एकमेकांचे मित्र, एकाच शाळेत, एकाच कॉलेजातुन त्यांनी शिक्षण पुर्ण केले.... संत्या पोलिस मध्ये उतरला तर अक्की एका कंपनीत अकाउंटंट होता...

"हेल्लो, बोला राजे... कशी काय आठवण काढलीत...??" संत्या म्हणाला...


"नाही साहेब, जरा इअर एंडिंग मध्ये व्यस्त होतो... तू सध्या कुठे आहेस..??" अक्की म्हणाला...


"मी सध्या पोलिस स्टेशन मध्ये आहे... का...??" संत्या ने विचारले...


"अरे यार, खूप दिवस झालेत आपल्यांना भेटून, तर विचार केला कि आज कुठे तरी भेटूयात..." अक्की म्हणाला...


"ठीकाय, चल आज रात्री ८ वाजता मी तुझ्या घरून तुला पिक-अप करतो..." संत्या ने सांगितले...


"ओके, दोस्ता..." एवढं बोलून त्याने फोन ठेवून दिला...


+++++++++++++++++++++++++++++


संत्या सरळ चौकीत घुसून आपल्या कॅबीन मध्ये जावून बसतो... आणि एका हवालदाराला एक सपेशल चहा आणायला सांगतो... चहा ची सिप घेत असतानाचा त्याच्या कॅबिनच्या दारावर टक टक होते... समोर कदम उभा असतो... संत्या त्याला आत येण्याचा इशारा करतो...


"बोला... कदम काय माहिती आणलीत...??" संत्या चहा अर्धवटच सोडून सगळी माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो...


"सर, हत्यारा ने हा खून खूप चलाखीने केला आहे... खून गळा दाबून करण्यात आला आहे... आणि हत्यारा बाल्कनी मधून आला होता... त्याने ज्या दोरीचा उपयोग बाल्कनी मध्ये चढण्यासाठी केला होता त्याच दोरी ने त्याने तिचा गळा आवळून खून केला... आणि त्याच दोरीच्या सहाय्याने तो पुन्हा त्याच बाल्कनी तून बाहेर गेला... कारण जी दोरी आम्हाला बाल्कनी मध्ये लटकलेली सापडली तिचा आणि बॉडी च्या गळया वरील निशाण एकदम सेम आहे..."


"हम्म... आणखीन काही माहित पडलं...??" संत्या ने प्रश्न केला...


"नाही सर, सध्या तरी बॉडी ला पोस्टमार्टम साठी पाठवले आहे..." कदम म्हणाला...


+++++++++++++++++++++++++++++


संत्या ठीक रात्री ८ वाजता अक्की च्या घरी पोहोचतो...


"यार चल, आज डिस्को ला जावू... जेव्हा पासून कॉलेज संपलं आहे तेव्हा पासून डिस्को ला गेलो नाही..." अक्की उत्सुक होत बोलला...


"आँ...? काय राजे, आज खूप खुश आहात..." संत्या त्याला छेडत बोलला...


"छे... काहीच नाही यार... काय पण तुझं... बस आज खूप मस्ती करायचा मूड आहे..." अक्की म्हणाला...


"ह्या ह्या ह्या... चल ठीक आहे... ह्या दुनियेत तूच एक मित्र आहेस जो माझी एवढी काळजी करतो... आणि ज्याला मी आपला मानतो..." संत्या भावुक होत बोलला...


"चला, राजे सेंटी होवून मूड नका खराब करू.. चल सोड हे सगळं यार..." अक्की त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाला...


संत्या आणि अक्की एका डिस्को मध्ये पोहोचतात...


"संत्या तू काय घेणारेस...?" वेटर ला इशारा करत अक्कीने संत्याला विचारले...


"मी तर फक्त कॉल्ड ड्रिंक घेणार..." संत्या म्हणाला...


"तू तर छोटा मुलगा तर मुलगाच राहशील... ह्या ह्या ह्या..." हसत हसत अक्की ने वेटरला एक कॉल्ड ड्रिंक आणि एक चिल्ड बियर आणायला सांगितली...


संत्या आणि अक्की सिप घेत घेत बोलण्यात गुंतले होते, तेवढ्यात त्यांना एका मुलीच्या किंचाळण्याचा आवाज येतो... ते दोघं जेव्हा किंचाळण्याच्या दिशेकडे पाहतात तर, काही टपोरी मुलं एका तरुणीला छेडत होते...


संत्या हे पाहून त्यांच्या कडे पोहोचतो आणि त्यातल्या एकाचा कॉलर पकडतो...


"काय आहे बे... चल निघ इथून, कन्नी कट, चल बे...?" तो मुलगा संत्याला बोलतो...


"पहिले तू त्या मुलीचा हात सोड..." संत्या त्याला बजावतो..


"नाही सोडणार काय करणार बे तू...?" उलट तो मुलगाच त्याच्यावर चालून येतो, संत्या पण त्याला मारायला लागतो... संत्या त्या मुलाला मारतोय हे पाहून त्याचे बाकीचे मित्र पण संत्या वर धावून सुटतात आणि संत्याला मारायला लागतात... ते पाहून अक्की पण संत्या च्या बचावला मध्ये पडतो... आणि दोघांनी मिळून त्या मुलांना चांगलाच धडा शिकवलेला असतो... थोड्या वेळातच दोघांनी मिळून सर्वांना अर्ध मृत अवस्थेत डान्स फ़्लॉर वर पाडले होते....


ती तरुणी संत्या कडे येते आणि हात मिळवणी साठी हात पुढे करत  बोलते, "धन्यवाद.." तेव्हा कुठे जावून संत्याच लक्ष त्या मुलीवर जातं आणि तो तिला पाहतच राहतो... ती मुलगी जणू स्वर्गातून उतरलेली अप्सराच होती... डार्क निळ्या रंगाचा पंजाबी, केसांचा पोनी बांधलेला, खांद्याला एक पर्स, हातात महागडा मोबाईल, चेहऱ्यावर केसांची एक बट... टिकली नव्हतीच... सुंदर गोरा-मोरा चेहरा... छातीमध्ये कळ येणे काय असते, ते त्या दिवशी संत्याने अनुभवले होते... अक्की ने एक चापट लागल्यावर त्याची तंद्र तुटली...


"अ.. ठीक... ठीक आहे... हे तर माझं कर्तव्य आहे... हेल्लो... मी इन्स्पेक्टर संतोष पवार...?" संत्या ने पण तिच्याशी हात मिळवणी केली... काय हातांचा स्पर्श होता तो... संत्याला तो हात सोडावासाच वाटला नाही...


"हेल्लो.... मी मेघना... खूप उशीर झाला आहे मी निघते..." आपला हात संत्याच्या हातून जबरदस्ती सोडवून घेत मेघना म्हणाली...


"तुम्ही एवढ्या रात्री एकटी कुठे जाल... मी तुम्हाला सोडतो...!" संत्या म्हणाला...


"नाही नको काहीच गरज नाहीये... आधीच तुम्ही माझी एवढी मदत केली आहे... आणि अजून मला तुम्हाला त्रास द्यायचा नाही आहे... ठीक आहे... बाय..." मेघना म्हणाली...


"ठीक आहे जशी तुमची मर्जी... बाय... काळजी घ्या..." हासत संत्या म्हणाला...


ती तरुणी जाताच अक्की, संत्याला थट्टा मस्करी करण्यासाठी वेठीस धरतो...


"क्या बात है... आज तर तू खूप रोम्यांटिक झाला आहेस... पहिले तर तू कधीच मुलींशी अश्या प्रकारे वागला नाहीस... आणि आज हा सुर्य पश्चिमेला कसा काय उगवला... हि हि हि..." संत्या त्याची टेर खेचत बोलला...


"मला कळत नाही तुझं डोकं दरवेळी काय काय विचार करत असतं.. मी तर फक्त एका तरुणीची मदत करत होतो... तुला तर माहितीच आहे कि मी मुलींपासून दोन हात लांबच असतो... जेव्हा पासून त्या सुचिता ने मला..." एवढं बोलून संत्याच्या डोळ्यात पाणी जमा होतं आणि रागाने त्याचे डोळे लाल होतात...


"अरे यार... आपण इथे मस्ती करायला आलो होतो... तू का जुनी गोष्ट आठवत बसला आहेस..." अक्की म्हणाला... आणि त्याने आपल्या साठी आणखीन एक बियर आणि संत्या साठी कॉल्ड-ड्रिंक मांगवली... दोघांनी आपापले पेय संपवून बाहेर आले... बाहेर येताच संत्याचा भ्रमणध्वनी वाजायला लागतो...


"हेल्लो... बोला कदम...?" संत्या फोन कानाला लावून म्हणाला... समोरून काहीतरी बोलण्यात आलं ते ऐकून संत्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत होते... "काय...? मी लगेच आलो तिथे.."


क्रमशः....

0 comments:

Post a Comment