Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Thursday, 11 December 2014

~ ~ हत्यारा ~ ~ भाग तिसरा

~ ~ हत्यारा ~ ~ एक चित्तथरारक कथा

भाग तिसरासंत्या आणि अक्की त्याच ठिकाणी होते... "अक्की.... चल लवकर..."  गाडीच्या दिशेने झपाझप पावले टाकीत संत्या उद्गारला...


सगळ्यांचे लक्ष वेधत, आपल्या कर्कश सायरनच्या आवाजात कोकलत पोलासांची एक गाडी समता नगर कार्टर रोड पासून काही अंतरावर थांबली... तशा सर्व प्रेस रिपोर्टरस् च्या नजरा त्या गाडीकडे वळल्या... गाडीतून इन्स्पेक्टर संत्या आणि अक्की ला उतरताना पाहतच सर्व
प्रेसवाल्यांचे लोंबाळे त्यांच्या दिशेने धावले; क्षणार्धात संत्याला प्रेसवाल्यांनी घेरले आणि त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू केला..

"पवार सर, हा खून कोणी केला आहे...? यामागे कोणाचा हात आहे...? हा कुणी माथेफिरू तर नाही...?..."


"प्रेसवाल्यांनासुद्धा आतमध्ये प्रवेश का दिला जात नाही?...या प्रकरणातील अशा कोणत्या घटना लोकांपासून लपविल्या जात आहेत...? "


याच वेळी संत्याने
एक जळजळीत कटाक्ष तो प्रश्न विचारणार्या प्रेस रिपोर्टरकडे टाकला पण त्याचवेळी त्याच्या पाठोपाठच अनेक प्रश्नाचा सुरपाठ सुरु झाला....

"...आज सुबहि एक खून हो गया और अभी एक रात को... पुलिस क्या कर रही है..???.."


"...व्हॉट यु से अबाऊट धिस मर्डर?.... अॅन्ड हाऊ कॅन पब्लिक ट्रस्ट ऑन पोलिस आफ्टर धिस इन्सिडेन्ट?"


".... यात समता नगरवासीयांच्या जिवाला काही धोका आहे का...??"


"....आमच्या माहिती नुसार आम्हाला कळलं आहे कि मृतदेहाचा एक हात गायब आहे... !! इज इट ट्रू??


"....सारे पुलिस वाले इस तरह से चुप्पी क्यो साधे हुए हैं...?"


"...शेवटी पोलिसवालेच जर असे वागु लागले तर लो़कांनी त्यांच्यावर विश्वास तरी का आणि कसा ठेवावा.....??"


ज्या गोष्टीची भिती होती तीच झाली होती. सर्व पत्रकार आणि न्युज चॅनेलवाल्यांनी या प्रकरणाला ब्रेकिंग न्युज म्हणुन चांगलेच हायलाईट केले होते..., कित्येक दिवसांनंतर त्यांना आता अशी झणझणीत, मसालेदार बातमी मिळाली होती; ही संधी ते कसे सोडु शकतील..?


"प्लिज,... लेट अस इन्वेस्टीगेइट् केस -फर्स्ट!!!...." त्रासिक चेहर्याने पत्रकार आणि न्युजचॅनेलच्या प्रतिनिधींना बोलत संत्या तड़क घटनास्थळी जाऊ लागला...

त्यांचे सहकारी कदम आणि कुलकर्णी लगेच धावत येत पत्रकारांना बाजुला सारत पवारांना वाट मोकळी करून देऊ लागले.

"होय कदम, खून कुठे झाला आहे...!!" संत्याने प्रश्न केला...


एव्हाना घटनास्थळी आधीच पोहोचून  कदम ने मृतदेहाचा पंचनामा सुरू केला होता..... दोन पोलिस फोटोग्राफर पैकी एकजण प्रेताचे विविध बाजुने फोटो काढण्यात व्यस्त होता..... तर त्याचा दुसरा सहकारी ज्या ठिकाणी प्रेत होते, त्या जागेचे तसेच त्याच्या नजिकचे फोटो घेण्यात व्यस्त होता..... एकीकडे फिंगर प्रिंट ब्युरो एक्सपर्टस् ची टीम खोलीमध्ये काहीतरी डिवचत त्यामध्ये हाताचे किंवा इतर कुठले ठसे भेटतात का, याचे निष्फळ प्रयत्न करत होती..... तर दुसरीकडे डॉग मास्टर आपल्या कुत्र्यांना सांभाळत फिंगर प्रिंट ब्युरोचे काम होईपर्यंत एका बाजुला थांबले होते....


"सर, खून त्या खोलीत झाला आहे.. आणि सर एक गोष्ट म्हणजे खून त्याच प्रकारे झाला आहे जसा खून सकाळी झाला होता..." कदम त्यांना मृतदेहाचा तपशील देत होते...


"म्हणजे...??" कदम चे वाक्य ऐकून संत्या उडालाच...


"आय मीन सर, हा खून पण दोरी ने गळा आवळून केला गेला आहे... आणि ह्या मृतदेहाचा पण डावा हात गायब आहे..." कदम ने संपूर्ण माहती स्पष्टपणे सांगितली...


"डावा हात गायब होण्याचा अर्थ काय आहे...??" शेवटी न राहवून अक्की ने प्रश्न केला...


"माहित नाही यार... सकाळी पण आम्हाला एक मृतदेह सापडला होता... त्याचा पण डावा हात गायब होता... आणि तिची पण हालत अशीच होती जशी ह्या मृतदेहाची आहे..." संत्या म्हणाला... "कदम, हत्याराचा काही पुरावा किंवा काही माहिती मिळाली का.." संत्याने कदमला प्रश्न केला...


"नाही सर, हत्यारा खूप हुशार आणि चलाख आहे... त्याने आपल्या मागे काहीच पुरावा सोडलेला नाहीये..." कदम म्हणाला...


"ठीक आहे.. मृत देह पोस्टमार्टम साठी पाठवा... आणि एक गोष्ट... प्रेस वाल्यांना हि गोष्ट कशी समजली कि मृतदेहाचा डावा हात गायब आहे ते..." संत्या जवळजवळ ओरडलाच.... तसा तिथे ऊभ्या असणार्या सर्व चाळीच्या बायकांचे आवाज एकदमच बंद झाले.... इन्स्पेक्टर संत्याच्या  या करड्या आवाजाने पुर्ण चाळ हादरुन गेली..., त्या आवाजासरशी तेथिल इतर कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल-कुलकर्णी इतकेच काय पण  असि. कदम व त्याचा मित्र अक्की सुद्धा जाग्यावरच थिजले..... संत्या याआधी असा कधीच तापला नव्हता किंबहुना तो अतिशय शांत स्वभावाचा होता... त्याचे हे भयानक रुप आज प्रथमच सर्वांना दिसत होते.... ते बटाट्यासारखे मोठे आणि लालभडक झालेले डोळे पाहून कदमच्या कपाळावर धर्मबिंदूच जमा झाले...


"माहिती नाही सर..." मघापासुन संत्याच्या रागाच्या भितीने घशात आवंढा गिळत कदमांनी तो शब्द कसाबसा बाहेर काढ़ला....


"ठीक आहे जेवढं सांगितलं आहे तेवढं करा... आणि हो दोन्ही खुनाची फाईल मला उद्या सकाळी माझ्या टेबलावर पाहिजे...मी निघतो.." एवढं बोलून संत्या झपाझप पावले टाकत आणि त्याच्या पाठोपाठ अक्की पण त्याच्या जीप मध्ये जावून बसला... थोड्याच वेळात जीप रस्त्यावर भरधाव धावत होती... आणि दोघेही अक्कीच्या घरी पोहोचले...


घरी आल्यावर संत्या चं लक्ष अक्कीच्या हातावर झालेल्या जखमेच्या निशाणावर जातं...


"अरे... तुझ्या हातावर हे जखमेचं निशाण कसलं आहे...!!" संत्या म्हणाला...


"काहीच नाही यार... थोडंस तर लागलं आहे... तुला तर माहिती आहे ना मी ह्या घरात एकटाच राहतो ते... त्यामुळे सकाळी घराची साफ सफाई करते वेळी हि जखम झाली होती..."


"ठीक आहे चल मी निघतो आता... आणि काळजी घे जरा..." एवढं बोलून संत्या आपल्या घरी निघून येतो...


घरी पोहोचून संत्या सरळ आपल्या बेडवर जावून झोपतो आणि आज झालेल्या दोन्ही खुना विषयी विचार करायला लागतो... 'आपल्या भागात एकाच दिवसात दोन खून काय होतात... आणि ते पण एकाच प्रकारे... कोण असेल हत्यारा...? काय मोटिव्ह असेल त्याचा...? कि कोणी खरंच तो माथेफिरू आहे कि अजून कोणी...? अजून किती खून होणार आहेत...?' हे सर्व विचार करता करता संत्याचं डोकं बधिर झालं होतं आणि त्यामुळेच दिवस भराच्या धावपळी मुळे त्याला कधी झोप लागली त्यालाच कळले नाही... सकाळी थेट त्याचा फोन वाजल्यानेच त्याची झोप मोड होते... फोन वर त्याचा मित्र होता थोडावेळ त्याच्याशी बोलल्या नंतर तो आपल्या रोजच्या रुटीन कामात व्यस्त होतो... आपले सकाळचे सर्व रुटीन काम आटपून तो तैय्यार होवून पोलिस स्टेशनला जायला निघतो...


+++++++++++++++++++++++++++++आपल्या केबिनमध्ये, संत्या डोळे मिटून, आपले कपाळ चिमटीत पकडून टेंन्शनमध्ये बसला होता... तो कमालीचा अस्वस्थ दिसत होता... त्याच्या समोरच कदमही बसले होते... ते काहीतरी कागद चाळण्यात गुंतले होते....


इकडे, संत्याच्या डोक्यात मात्र असंख्य विचारांचं काहुर माजल होतं......


'एका दिवसात दोन दोन खून झाले होते आणि अद्याप त्यांचा काहीएक मागमुस लागला नव्हता.'... सर्व प्रकारे प्रयत्न करुनही शेवटी आपल्या हाती आलं होतं ते फक्त आणि फक्त अपयशच..!!' आणि जिवनात त्याला याच गोष्टीची जास्त चिढ़ होती... "अपयश".....!!!!!!


"...कदम..., तुंम्हाला काय वाटतं?"- केबिनमधली शांतता भंग करत संत्याने कदमला प्रश्न विचारला.


"सर, मला तर ही केस सरळ-सरळ सिरिअल किलींगचीच वाटतेय... तो जो कोणी आहे, तो फक्त एक माथेफिरुच असू शकतो..." कदमांनी आपला अंदाज व्यक्त केला.


"नाही भोसले..., मला तर ही केस दिसते तेवढी सोप्पी वाटत नाही..." एक उसासा टाकत संत्या म्हणाला....


"मे बी, पण सर आत्तापर्यंत जे दोन खून करण्यात आलेले आहेत..., म्हणजे ते खून एकाच टेक्निक ने केले गेले आहेत..."


"हो टेक्निक...?? माहिती आहे कदम साहेब..." तेवढ्यात अचानक दारावर टकटक होते... दोघांच्याही नजर दारावर खिळल्या जातात... कारण दारावर एक तरुणी उभी असते आणि तिला पाहून संत्या दचकतो...


"मेघना...!! तू इथे काय करतेस...??" संत्या ने प्रश्न केला...


"हेल्लो, इन्स्पेक्टर संतोष, मी आपल्या मोबाईल फोनच्या चोरीचा रेपोर्ट देण्यासाठी इथे आली आहे..."


संत्या एका कॉन्स्टेबलला तिची रेपोर्ट घ्यायला सांगतो... मेघना आपली रेपोर्ट लिहून आणि संत्याला बाय करून निघून जाते...


"तर मग कदम, केस मध्ये काही प्रगती...???" संत्याने प्रश्न केला...


"नाही सर, अजूनही हत्याराचा काहीच मोटिव्ह समजला नाहीये आणि त्याच्या विरुद्ध काहीच पुरावा पण सापडलेला नाहीये..." कदम म्हणाला...


"असं कसं असू शकतं कदम..., प्रत्येक हत्यारा आपल्या मागे काही ना काहीतरी पुरावा सोडूनच जातो..." संत्या म्हणाला, "मला संध्याकाळ पर्यंत काही ना काही तरी माहिती पाहिजे.. कमिश्नर साहेबांना काय उत्तर देणार मी..."


"ठीक आहे... सर..." कदम म्हणाला...


"मला त्या दोन्ही खुनाच्या फाईल्स आणून द्या..." संत्याने कदमला जायला सांगितलं...


त्या नंतर संत्या त्या फाईल्स वाचण्यामध्ये व्यस्त होतो...


+++++++++++++++++++++++++++++


थकून माकून जेव्हा संध्याकाळी संत्या आपल्या घरी जात असतो तेव्हा रस्त्यात त्याला मेघना दिसते... संत्या मुलींपासून दोन हात लांबच असतो... पण माहित नाही का मेघनाला पाहून त्याला तिच्याशी बोलावसं वाटतं... तिच्याविषयी त्याच्या मनात एक ओढ किंवा एक आकर्षण निर्माण झालेलं असतं... तो आपली जीप मेघना जवळ येवून थांबवतो...


"हेल्लो... मेघना..." संत्या म्हणाला...


"हेल्लो... इन्स्पेक्टर संतोष..." मेघना स्मित हास्य करत म्हणाली..


"कुठे जातेस... चल मी तुला सोडतो..." संत्या


"नाही... नको.. मी जाईन..." मेघना...


"रात्र होत चालली आहे... आणि तुमच्या सारखी सुंदर... म्हणजे एका सुंदर तरुणीने... असं रात्री अपरात्री एकट जाणं बर नव्हं..." संत्या स्मित हास्य करत बोलला...


"ओके.... ठीक आहे..." एवढं बोलून मेघना त्याच्या जीपमध्ये जावून बसते... संत्या मेघनाला तिच्या घराचा पत्ता विचारतो आणि जीप त्या दिशेने वळवून वेगाने घेवून जातो...


क्रमशः....

0 comments:

Post a Comment