Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Thursday, 18 December 2014

~ ~ हत्यारा ~ ~ भाग चौथा

~ ~ हत्यारा ~ ~ एक चित्तथरारक कथा

भाग चौथा

जीप मध्ये संत्या आणि मेघना एकदम शांत बसले होते... कोणीच बोलण्याचा पुढाकार घेत नव्हतं.... शेवटी न राहवून संत्यानेच तिला प्रश्न केला...

"तुमच्या घरात कोण कोण आहे...??" संत्याने तिला प्रश्न केला...

"आमच्या घरात मी एकटीच राहते... तीन वर्षांपूर्वी एक कार दुर्घटनेत माझ्या आई बाबांचा मृत्यू झाला होता..." हे बोलतांना मेघना चा आवाज जड झाला होता...

"ओह्ह... सॉरी... मी हा प्रश्न विचारायला नाही पाहिजे..." संत्या क्षमा मांगत म्हणाला...

"ठीक आहे... आता तर मला एकट राहण्याची सवयच पडली आहे... त्यामुळे असं वाटून घेणं कधीच वाटलं नाही..." मेघना म्हणाली...

"आपण मित्र बनू शकतो का...!!" शेवटी संत्याने मित्रत्वाचा हात पुढे केलाच...

"हो... का नाही..." मेघना थोडी अचंबित होवून म्हणाली...

"बस... इथेच माझं घर आलं..." मेघना त्याला थांबवत बोलली...

"हे घे हा माझा नंबर आहे... कधीही गरज पडली कि मला फोन कर... ओके बाय..." संत्या आपला कार्ड तिला देत म्हणाला....

"अरे... आत तर ये... चहा / कॉफी घेवून जा..." मेघना म्हणाली...

"नको... आता नको... नंतर कधी तरी..." संत्या म्हणाला...

"ओके देन... बाय..." मेघना...

संत्या लगेच आपली जीप आपल्या घराकडे वळवतो...

घरी पोचल्यावर संत्या मेघना विषयीच विचार करत असतो... मेघना विषयी विचार करता करता त्याला सुचिता ची आठवण येते आणि अचानक लगेच त्याचे डोळे पाणावले जातात... आणि तो भूतकाळात कुठे तरी हरवला जातो... इथे संत्या आपल्या विचारांमध्ये हरवलेला आहे... तर दुसरीकडे एक व्यक्ती काळ्या कपड्यांमध्ये तोंडावर मुखवटा लावून, हातात दोरी घेवून आपल्या घरातून निघून आणि घराला कुलूप लावून रस्त्यावर चालायला लागतो... आपल्या नवीन सावजाला संपवण्यासाठी... कोण असेल ती व्यक्ती...??? का करतो आहे तो किंवा ती हे सगळं...? सर्वच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या कथेत मिळत राहतील...

+++++++++++++++++++++++++++++

दुसर्या दिवशी....

संत्या पोलिस स्टेशन मध्ये बसला होता तेव्हा त्याच्या जवळ कदम येतो...

"शुभ प्रभात सर..." कदम म्हणाला...

"शुभ प्रभात कदम... बोला काय माहिती आणलीत..." संत्या म्हणाला...

"सर, प्रेमनगर मध्ये एक मर्डर झाला आहे..." कदम...

कदमांच हे वाक्य ऐकून संत्या ताडकन उठून उभा राहिला आणि म्हणाला, "काय...??? एक काम करा तुम्ही जीप काढा आणि लवकर निघायची तैय्यारी करा..."

संत्या, कदम आणि त्याची टीम प्रेम नगरला जायला निघते... आणि काही वेळात त्यांची जीप रस्त्यावर भरधाव धावायला लागते... आणि थोड्याच वेळात मर्डरवाल्या जागी त्यांची टीम उतरते... संत्याने एक सुटकेचा श्वास टाकला कारण इथे अजूनही पत्रकार आणि न्यूजवाले तिथे पोहोचलेले नव्हते... पटापट सगळे घरात घुसले... पण बेडरूम मध्येच एक विदारक दृष्य त्यांच्यासाठी वाढून ठेवले होते. जसे त्यांनी ते दृष्य बघितले, त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. त्यांच्यासमोर सोफ्यावर एक व्यक्ती मृतावस्थेत पडलेली होती, गळा कापलेला, सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त झालेल्या, डोळे बाहेर आलेले, आणि डोकं एका बाजूला लूढकलेलं. त्याचाही खुन अगदी त्याच पध्दतीने झालेला होता. वस्तू अस्ताव्यस्त विखूरलेल्या होत्या त्यावरुन असे जाणवत होते की त्यानेही मरायच्या आधी बरीच तडफड केली असली पाहिजे.

आपल्या टीम ला पटापट कामाला लावून संत्या त्या घरातील मालकीण बरोबर बोलत होता, "तुम्ही कुठे होता, जेव्हा हा खून झाला होता तेव्हा...???"

"साहेब, मी आणि माझा मुलगा काल रात्री एका लग्नाला गेलो होतो... आणि आज सकाळी जेव्हा आम्ही परतलो तेव्हा घराचा दरवाजा सताड उघडा होता... आणि हे आपल्या बेडरूम मध्ये जमीन वर रक्त बंबाळ अवस्थेत पडले होते..." एवढं बोलून ती बाई हुंदके देत रडायला लागते...

"सर हा खून, पण त्याच प्रकारे झाला आहे जसे आधीचे दोन खून झाले आहेत...!" कदम येवून संत्यावर अजून एक बॉम्ब टाकला...

"साहेब ह्याचा अर्थ असा होतो कि कांदिवली मध्ये कोणीतरी माथेफिरू सिरीयल किलर फिरत आहे...??" कुलकर्णी बोलले...

"मला पण तेच वाटतंय, तुम्ही दोघे एक काम करा देहाला पोस्टमार्टम साठी पाठवून द्या आणि एक गोष्ट लक्षात ठेवा कि हि गोष्ट पत्रकार किंवा न्यूजवाल्यां पर्यंत पोहोचली नाही पाहिजे... नाही तर लोकांच्या मनात दहशत निर्माण होईल..." संत्याने त्यांना आणखीन काही किरकोळ कामाला लावून तो स्वतः जीप मध्ये येवून बसला आणि वेगाने गाडी चालवत तो पुन्हा पोलिस स्टेशन मध्ये परतला...
संत्या आपल्या कॅबीन मध्ये पोहोचून आणि गरम गरम चहा घेवून हाच विचार करत असतो कि, 'कोण हे सर्व करत असेल... जो लोकांना मारून त्यांचा डावा हात कापून आपल्या सोबत घेवून जात आहे... खरंच कोणी माथेफिरू आहे कि भूत पिशाच्च आहे ह्या मागे...??' भूत पिशाच्च आठवताच त्याच्या कपाळावर घर्मबिंदू उमठ्ले... तेवढ्यात त्याच्या टेबलावरील फोन खणखणला, त्यामुळे संत्या आपल्या विचारांच्या तंद्री तून दचकून बाहेर आला... 

"हेल्लो, अक्की बोल..." संत्या म्हणाला... 

"काय गोष्ट आहे यार... आज जरा तू खूपच अपसेट वाटतोय...?" अक्की ने प्रश्न केला... 

संत्या ने त्याला मर्डर ची पूर्ण कथा ऐकवून टाकली... 

"अरे यार... हि तर खूप खळबळ जनक गोष्ट आहे... तो / ती व्यक्ती तर दिवसेंदिवस खून करत चालला / चालली आहे...?" अक्की म्हणाला.... 

"होय यार... माहित नाही कोण आहे हा हरामखोर सिरीयल किलर... जो लोकांना मारतो आणि असा गायब होतो जसं गाढवाच्या डोक्यावरील शिंग... माझ्या एकदा तावाडीला सापडला ना तर त्याचं काय करेल मलाच समजत नाहीये..." संत्या दात खात बोलला...

"चल सोड यार ह्या गोष्टींना... आणि चल कुठे तरी माईंड फ्रेश करायसाठी जावूयात का...?" अक्की म्हणाला...

"आता तर नाही... मी तुला संध्याकाळी सांगतो..." एवढं बोलून त्याने अक्कीचा फोन कट केला... तेवढ्यात त्याचा पुन्हा एकदा फोन वाजायला लागतो... आणि फोन वर कदम असतात...

"साहेब, आत्ता चौकशी करतांना एका माणसाने सांगितले आहे कि, त्याने काल रात्री एका काळे कपडे आणि तोंडावर मुखवटा असलेल्या एका माणसाला घटनास्थळी पाहिलं आहे..." कदम म्हणाला...

"काय...? तुम्ही त्या माणसाची उलट तपासणी करा तेवढ्यात मी तिथे पोहोचतो..." एवढं बोलून संत्याने फोन कट केला आणि झपाझप पावलं टाकत तो पोलिस स्टेशन च्या बाहेर पडला... 
 

++++++++++++++++++++++++++


संत्या आपली जीप घेवून लगेच घटनास्थळी पुन्हा परतला...

"हा कदम... कुठे आहे तो माणूस...??" आल्या आल्या संत्याने प्रश्न केला... कदम ने त्या माणसाची ओळख संत्याशी करून दिली...

"तू त्या हत्याराला कधी पाहिले होते...? आणि तू काय काय पाहिले होते...?" संत्याने त्याच्यावर प्रश्नांची सरबत्तीच लावली...

"साहेब, काल रात्री जेव्हा मला झोप येत नव्हती त्यामुळे मी आपल्या खोलीच्या खिडकी समोर येवून उभा होतो तेव्हा मला ह्या घराच्या समोर एक काळे कपडे वाला माणूस दिसला.... मला वाटलं असेल कोणीतरी..! मला काय माहित तो इथे खून करण्यासाठी आला होता ते..." ती व्यक्ती उत्तरली...

"तू ने त्या माणसाचा चेहरा पाहिलास...?" संत्याने उत्सुकतेने विचारले...

"अं...! नाही साहेब... कारण त्या माणसाने चेहऱ्यावर मुखवटा घातला होता..." तो माणूस म्हणाला...

"ठीक आहे... जर तुम्हाला पुन्हा तो माणूस इथे कुठे आसपास दिसला तर आम्हाला जरूर कळव..." एवढं बोलून संत्या पुन्हा पोलिस स्टेशन मध्ये परततो...

++++++++++++++++++++++++++++

संत्या आपल्या कॅबीन मध्ये त्या काळे कपडे वाल्या विषयी विचारच करत असतो कि तिथे कदम आणि कुलकर्णी दोघेही येतात...

"साहेब, हे काय होत आहे ह्या शहरात...?? आता तर लोकांच्या मनात काळे कपडे वाल्या माणसाच्या विषयी अजूनच धसका बसला असेल... आता तर लोकांना रात्री अपरात्री घरातून पण निघायला भीती वाटणार..." कदम ने आपली शंका जाहीर केली... 

ते तिघं बोलतच होते कि एक हवालदार येवून त्यांना सांगतो कि, "सर बाहेर काही पत्रकार आले आहेत...?" 

"चला... आले आपले धिंडवडे काढणारे आलेत... बघुयात काय म्हणतायत ते..." संत्या दात खात म्हणाला आणि बाहेर आला... 

".... पवार साहेब.. मुंबई शहरात एक माथेफिरू सिरिअल किलर मोकाट फिरत आहे... आणि त्याने तीन तीन हत्या केली आहे... आणि तो अजूनही पकडला का नाही गेला...??" पत्रकार... 

"आता आमचा तपास सुरु आहे... जसंच आम्हाला काही माहित पडलं कि आम्ही तुम्हाला जरूर सांगू...?" संत्या म्हणाला... 

"पण इन्स्पेक्टर साहेब हा माथेफिरू आहे तरी कोण...?? आणि ह्याचा उद्देश तरी काय आहे...??" पत्रकार... 

"आता मी काहीच सांगू शकत नाही...??" संत्या म्हणाला... 

"लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे... आणि अजूनही तुम्ही आणि तुमच्या टीम ने काहीच केलं नाहीये..." पत्रकार... 

संत्या तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून.. पुन्हा आपल्या कॅबीन मध्ये परततो... 

"पाहिलंत तुम्ही... आपल्या शहरात एक माथेफिरू मोकाट फिरत आहे आणि आपली पोलिस काहीच करत नाही आहे... आता फक्त आम्ही तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो कि तुम्ही घरातून बाहेर निघतांना जरा सांभाळून निघा... कारण त्या माथेफिरू सिरिअल किलर चा पुढचा निशाणा कोणीही असू शकतो... आणि जरा आपल्या शेजारी-पाजारी पण पहा कि कोणी संशयित व्यक्ती तर राहत नाही आहे ना... एबीसी न्यूज मधून कॅमेरामन रोहित सोबत राणी..." 

++++++++++++++++++++++++++++

काही वेळांनी संत्याला कमिश्नर साहेबांचा फोन येतो आणि ते तातडीने त्याला आपल्या ऑफिस मध्ये बोलावतात... संत्या चिडत, 'आता ह्याला काय काम आलं, बहुतेक सिरिअल किलिंग बद्दलच विचारेल...' संत्या ताडताड पावलं टाकत बाहेर पडला, आणि आपल्या जीप मध्ये जावून बसला... थोड्यावेळातच तो कमिश्नर साहेबांच्या समोर उभा होता...

"इन्स्पेक्टर पवार तुमची त्या सिरिअल किलर चा तपास कसा चालू आहे...? आणि त्यात काय प्रगती आहे...?" कमिश्नर म्हणाले...

"साहेब... अजूनही काहीच कळत नाहीये... तो माथेफिरू लोकांना दोरीने गळा आवळून मारतो आणि त्यांचा डावा हात कापून घेवून जातो..." संत्या म्हणाला...

"डावा हात कापून घेवून जातो म्हणजे त्याला करायचं तरी काय आहे...?" कमिश्नर...

"साहेब... मला असं वाटतं तो माणूस कोणी पागलच असेल..." संत्या

"पण, मला काहीच निमित्त चालणार नाही... काही पण करून लवकरात लवकर ह्या केस चा निकाल लावा... आणि हो आज पासून तुमच्या सोबत ह्या केस मध्ये इन्स्पेक्टर ए.एस.पी. गोडबोले तुमची मदत करतील... आता तुम्ही जावू शकता..." कमिश्नर...

"ओक... सर..." एवढं बोलून संत्या ताडताड पावलं टाकत बाहेर येतो... आणि मनातल्या मनात म्हणत असतो, 'साल्या तुला काय माहित आम्ही दिवस रात्र ह्याच केस विषयी बोलत असतो... तू करून बघ कशी हजामत होते ती...' तो येवून आपल्या जीप मध्ये बसतच असतो कि त्याचा भ्रमणध्वनी खणखणला जातो...

क्रमशः...

0 comments:

Post a Comment