Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Sunday, 21 December 2014

~ ~ हत्यारा ~ ~ भाग पाचवा

~ ~ हत्यारा ~ ~ एक चित्तथरारक कथा

भाग पाचवा  
"ओक... सर..." एवढं बोलून संत्या ताडताड पावलं टाकत बाहेर येतो... आणि मनातल्या मनात म्हणत असतो, 'साल्या तुला काय माहित आम्ही दिवस रात्र ह्याच केस विषयी बोलत असतो... तू करून बघ कशी हजामत होते ती...' तो येवून आपल्या जीप मध्ये बसतच असतो कि त्याचा भ्रमणध्वनी खणखणला जातो...  
आता पुढे.....


भ्रमणध्वनीवर मेघनाचं नाव झळकत होतं...


"हेल्लो, संतोष कुठे आहेस... मला तुला अर्जंट भेटायचे आहे..." मेघना जरा भीत भीतच बोलल्यासारखी वाटत होती...


"आता तर मी ड्युटी वर आहे... संध्याकाळी भेटतो..." संत्या म्हणाला...


"ठीक आहे..." एवढं बोलून तिने फोन कट केला...


"अरे पण...??" संत्या चं वाक्य तोंडातल्या तोंडातच राहिलं


संत्या आपली जीप चालवत पोलिस स्टेशनला पोहोचतो... तिथे इन्स्पेक्टर गोडबोले त्याची वाट पाहत होते...


"नमस्कार सर..." संत्या म्हणाला...


"नमस्कार... पवार... कसे आहात... खूप दिवसांनी आपल्याला एकाच केस वर काम करण्याची संधी मिळाली आहे... मला ह्या केस संबंधी संपूर्ण माहिती सांगा..." गोडबोले म्हणाले...


संत्या त्यांना पूर्ण केसची सुरवाती पासूनची इथांभूत माहिती सांगून टाकतो...


"खरंच हि केस खूप गुंतागुंतीची आहे... ठीक आहे चांगलंच आहे.. असल्याच केसला सोल्व करण्यातच मजा येते..." गोडबोले म्हणाले...


"ते तर खरंच आहे सर..." संत्या म्हणाला...


"कदम कडून अजून कुठली माहिती मिळाली का...?? आणि हो तो आहे तरी कुठे...?" गोडबोले ने प्रश्न केला...


"सर... तो त्याच खुनाच्या घरी तपास करण्यासाठी गेला आहे..." संत्या...


++++++++++++++++++++++++++


संध्याकाळी थकून माकून संत्या आपल्या घरी पोहोचतो... तेव्हा त्याला आठवतं कि त्याला मेघनाला पण भेटायला जायचे आहे... तो लगेच मेघनाला फोन करतो...


"हेल्लो... मेघना कुठे आहेस...??" संत्या म्हणाला...


"मी घरीच आहे... तू ये..." मेघना...


संत्या लगेच मस्त पैकी नवीन कपडे घालून आणि मस्त नटून थटून मेघनाच्या घरी पोहोचतो आणि दारावरची बेल वाजवतो... दरवाजा मेघना खोलते...


"ये आत ये... संतोष... काय घेणार... चहा किंवा... थंडा गरम..." मेघना हासत म्हणाली...


"नको काहीच नको... तू सांग मला का बोलावलेस ते...?" संत्या ने प्रश्न केला...


"मी तुझ्याशी ना.. तुला ना.. त्या सिरिअल किलर विषयी सांगणार आहे..." हि गोष्ट ऐकून संत्या ताडकन आपल्या जागेवरून उठतो... आणि तिच्या जावून बसून म्हणतो... "सिरिअल किलर विषयी... बोल काय बोलायचे आहे तुला... घाबरू नकोस बिलकुल...!!"


"त्या दिवशी जेव्हा मी डिस्को मधून घरी येत होते... तेव्हा रस्त्यामध्ये कोणीतरी माझा पाठलाग करत होतं... मी खूप वेळा मागे वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं, मग मला वाटलं कि हा माझा भास असेल... पण मी अजून पुढे गेल्यावर मला माझ्या मागे एक सावली दिसली... त्यामुळे मी झपाझप पावलं टाकत पुढे जायला लागली... तो पण माझ्या मागे मागे पटापट येवू लागला... त्यामुळे मी आणखीनच भिवून पाळायला लागले आणि पुढे गेल्यावर एका वळणावर मला एक ट्याक्सि दिसली... मी पटकन त्याच्यात बसली आणि घरी आले... आणि मी ज्या घराच्या इथून ट्याक्सि पकडली होती त्याच घरात खून झाला होता..." मेघनाचा श्वास जड झाला होता... ते सर्व आठवून तिच्या अंगावर शहारे आले होते...


"ठीक आहे तू घाबरू नकोस... त्या व्यक्ती विषयी तू आणखीन काही सांगू शकतेस...??" संत्याने विचारले...


"अं..?? च्याक... काहीच सांगू शकत नाही... कारण तिथे खूप अंधार होता..." मेघना म्हणाली...


"तू मला दुसऱ्या दिवशी पण सांगू शकली असतीस... जेव्हा तू पोलिस स्टेशन मध्ये आली होतीस तेव्हा...??" संत्या म्हणाला...


"तेव्हा मला माहित नव्हतं कि तो सिरिअल किलर आहे... ते तर मला मी न्युज पाहिल्या नंतर माहित पडलं..." मेघना


"मग तू हे ठाम पणे कशी सांगू शकतेस कि तोच सिरिअल किलर होता ते...?" संत्या...


"जेव्हा मी ट्याक्सि पकडली तेव्हा मी मागे वळून पाहिले कि कोण आहे ते... तेव्हा मी पाहिलं कि त्याच्या हातात एक दोरी आणि त्याने काळे कपडे घातले होते..." मेघना...


"ठीक आहे चल मी आता निघतो..." संत्या...


"एक गोष्ट तर मी तुला सांगायचं विसरूनच गेले... ट्याक्सि मध्ये बसतेवेळी.. माझा फोन तिथेच पडला होता... कदाचित तो फोन त्यानेच उचलला असेल..." मेघना...


"असू शकतं... एक काम कर तू तुझा मोबाइल नंबर मला दे... मी चेक करतो..." संत्या...


मेघना त्याला आपला नंबर देते... तो नंबर घेवून संत्या डायल करतो...


"नंबर बंद येतोय... मी नंतर पुन्हा प्रयत्न करतो..." एवढं बोलून संत्या तिथून निघतो... तो आपल्या घरी न जाता आपली जीप अक्कीच्या घराकडे वळवतो...


अक्कीच्या घरी पोहोचून संत्या दारावरची बेल वाजवतो... अक्की दरवाजा उघडून दचकून म्हणतो, "अरे संत्या ह्यावेळी तू इथे ये आत ये..."


"का रे दचकलास का...!!" संत्या म्हणाला...


"अरे तू येणार असं मला वाटलं नव्हतं म्हणून... तू बोल काय काम आहे...??" अक्की...


"काहीच नाही यार... मेघनाच्या घरी गेलो होतो..." संत्या म्हणाला...


"क्या बात है... एवढ्या लवकर साहेब तिच्या घरापर्यंत पण पोहोचले... मग तुमची गोष्ट कुठपर्यंत पुढे गेली...!!" अक्की...


"छे छे !!... असं काहीच नाही आहे यार... असंच तिने बोलावले होते म्हणून गेलो होतो..." संत्या म्हणाला...


"चल ठीक आहे... ठीक आहे... तू बस मी तुझ्यासाठी चहा बनवून आणतो..." अक्की म्हणाला आणि किचन मध्ये घुसला...


संत्या सोफ्यावर जावून बसतो, त्याचं लक्ष टीवी कडे जातं आणि तो ती ऑन करून पाहायला लागतो... टीवी पाहता पाहता त्याचं लक्ष अचानक टेबलावर ठेवलेल्या सुर्यावर जातं... तो जवळ जावून पाहतो तर काय... त्या सुर्यावर लाल लाल रंगाचं काही तरी लागलेलं असतं... नीट लक्ष देवून पाहिल्यावर त्याला समजतं कि ते रक्त आहे..


संत्या तो सुरा चुपचाप तिथेच ठेवून देतो... आणि पुन्हा सोफ्यावर जावून बसून तो गपचूप टीवी पाहण्याचं नाटक करतो...


"साहेब तुमच्या समोर चहा ठेवलेली आहे... आणखीन काही पाहिजे आहे का...??" अक्की...


"धन्यवाद यार... आणि हो ह्या सुर्यावर हे रक्ता सारखं काय लागलं आहे...??" संत्याने प्रश्न केला...


अक्की थोडा दचकतो, आणि लगेच स्वतःला सावरून म्हणाला, "अरे यार काहीच नाही... हे रक्त तर कोंबडीचं आहे... आज घरी चिकन केलं होतं... आणि हा सुरा इथून घेवून जायचं विसरूनच गेलो...!!"


संत्याला हि गोष्ट थोडी विचित्र वाटली कारण अक्कीला तर चिकन बनवायला आवडतच नाही... आणि जरी त्याचं खायचं मन झालं असतं तर तो हॉटेल मध्ये जावूनच चिकन खातो, पण तो घरी कधीच नाही बनवत...


"अरे यार... काय विचार करतोयस... तुझा चहा थंड होतोय...!!" अक्की म्हणाला... ह्या गोष्टीने संत्या आपल्या विचारांच्या दुनियेतून बाहेर आला...


"काहीच नाही यार... त्या सिरिअल किलर विषयी विचार करत होतो... खूप शातिर किलर आहे तो... आपल्या मागे काहीच पुरावा सोडत नाही तो..." संत्या म्हणाला...


"तू त्या किलर विषयी विचार करायचं सोडून दे आणि मेघना विषयी विचार कर... पूर्ण तीन वर्षानंतर तुला कोणी युवती पसंत पडली आहे..." अक्की म्हणाला...


"अं..?? छे...?? च्याक... जे तू समजतोय असं काहीच नाही आहे यार..." संत्या म्हणाला...


"यार का नाटक करतोयस... मी तुला चांगल्या प्रकारे ओळखतो... सुचिता नंतर तू ने पहिल्यांदा कोणत्या युवती सोबत फ्रेन्डशिप केली आहे... आणि तू बोलतोयस असं काहीच नाहीये... आणि हो ह्या आधी किती मुलींनी तुझ्याशी फ्रेन्डशिप करायचा विचार केला होता त्या सर्वांना तू नकार दिलास... मग हिच्याशी का फ्रेन्डशिप केलीस..." अक्की म्हणाला...


"मी तुला कितींदा बोललो आहे कि माझ्या समोर त्या सुचिता चं नाव पण घेत जावू नकोस... तुला माहित आहे ना तिने माझ्यासोबत काय केलं आहे ते...!!" संत्या भावुक होत म्हणाला...


"सॉरी यार... तू बोलतोच तसा तर मी काय करणार..." अक्की म्हणाला...


"ठीक आहे यार... चल मी आता निघतो.. खूप कामं पडली आहेत..." संत्या म्हणाला आणि जायला निघाला....


तेवढ्यात अक्की त्याला अडवत म्हणाला... "यार... तू ह्यावेळी कुठे चालला आहेस... आणि बाहेर निघणं पण किती खतरनाक आहे हे तुला तर माहित आहे ना..."


"तू एक गोष्ट विसरतोय... मी एक पोलिस ऑफिसर आहे... आणि माझ्या जवळ माझ्या सेफ्टी साठी माझी बंदूक आहे... सो डोन्ट वोरी..." संत्या म्हणाला... आणि झपाझप पावलं टाकत बाहेर आला आणि आपल्या जीप मध्ये जावून बसला... रात्रीच्या ठीक १० वाजता समता नगर परिसराचे रस्ते खूप चिडीचूप झाले होते... कारण फक्त एकच होतं त्या सिरिअल किलर मुळे...


+++++++++++++++++++++


दुसरी कडे घटना स्थळी


"समता नगर मध्ये पुन्हा एकदा खळबळ जनक घटना घडली आहे... काल पासून मर्डर वर मर्डर होत आहे तरी देखील आपले पोलिस खाते काहीच करू शकले नाहीत..." एक पत्रकार बातमी देत होता...


सकाळी सकाळी गुन्हाची बातमी देणारा कदमचा फोन येतो आणि संत्या ताडकन आपल्या कॅबीन मधून बाहेर पडून कदम ने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचतो... तिथे पोहोचल्याच क्षणी पत्रकारांचा लोंढा त्याच्याजवळ एकच गर्दी करतात... बातमीच्या शोधात आलेले न्युज रिपोर्टरांची गर्दी जमली होती.


‘हे बघा, तुम्ही उगाच इथे गर्दी करु नका, तपास कार्य पुर्ण झाले की तुम्हाला पुर्ण माहीती दिली जाईल’ इ.पवार पत्रकारांना बाहेर लोटत म्हणत होते.


‘कधी होणार तुमचा तपास पुर्ण? आधीच समता नगर मध्ये तीन लोकांचा जिव गेला आहे, अजुन कित्ती लोकांना आपला जिव गमवावा लागेल?’ रिपोर्टर


‘आमचा तपास चालु आहे..अधीक..’


‘काय तपास चालु आहे? काय माहीती लागली तुमच्या हाती?’ रिपोर्टर


‘हे कार्य एखाद्या सिरीयल माथेफिरू खुन्याचेच असले पाहीजे’ इ.पवार


‘कशावरुन?’, रिपोर्टर


‘कश्यावरुन नाही?’, वैतागुन इ. पवार म्हणाले, ‘हे बघा दोन्ही खुनांमध्ये खुनाचा मोटीव्ह काहीच दिसत नाही... हे दोन्ही खुन एकापाठोपाठ घडले आहेत आणि खुनासाठी वापरण्यात आलेला सुरा हा एकाच बनावटीचा असल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिलेला आहे’


‘याशिवाय अधिक माहीती सध्या तरी आमच्याकडे नाही. अधिक तपासांनंतरच अधीक खुलासा होऊ शकेल.’ इ.पवार


‘म्हणजे तुम्हाला म्हणायचे आहे की या शहरात एक माथेफिरु खुनी मोकळा फिरत आहे.... आणि सध्यातरी तुमच्या हातात काहीच सुगावा / पुरावा नाही?.... आणि जोपर्यंत तुमचा तपास पुर्ण होत नाही तो पर्यंत शहरातील लोकांनी त्या खुन्याचे बळी होत रहायचे की काय?...’ संतप्त होत पत्रकार इ.पवारांना प्रश्न विचारत होते.


‘हे बघा, मला असं काहीही म्हणायचं नाही आहे,.... आमचा तपास सुरु आहे, अधीक माहीती मिळाली की तुम्हाला नक्की कळवले जाईल…’ असं म्हणत त्यांनी त्या गलक्याला बाहेर काढायला सुरुवात केली...


पत्रकारांना बाहेर पिटाळून लावून इ. संत्या कदम कडे वळले, "कदम... हि पण हत्या त्याच प्रकारे झाली असेल... नाई का...?  ज्या प्रकारे पहिली झाली होती...??" संत्या म्हणाला...


"होय साहेब, इथे पण तेच झाले आहे...!!" कदम म्हणाले...


"ह्या किलर ला शेवटी पाहिजे तरी काय...?? जो हत्या वर हत्या करत आहे... आणि डावा हात काढून घेवून जात आहे... काहीच कळायला मार्ग नाही... आणि वरून कमिशनर साहेबांचे फोन वर फोन येत आहेत... कि गुन्हेगारला पकडा गुन्हेगाराला पकडा... अरे आम्हाला काहीतरी सुगावा किंवा पुरावा सापडला पाहिजे ना... त्याशिवाय आम्ही हत्याराला कसे पकडणार... आणि आता पत्रकार पण आपल्यांना वेठीस धरणार... जगणं मुश्किल करून टाकतील आपलं.. काही पण करून ह्या हत्याराला लवकर पकडायला पाहिजे नाही तर... आणखीन किती हत्या होतील देवजाणो..." गोडबोले म्हणाले...


"तुम्हाला तर माहितीच आहे आमचे प्रयत्न तर सुरूच आहेत..." संत्या म्हणाला...


कदमला काही तुरळक माहिती आणि कामं देवून इ. गोडबोले आणि संत्या जीप मध्ये येवून बसतात... संत्या अक्कीच्या घरी सापडलेल्या सुर्या विषयी विचार करून चिंतीत होता... कारण त्याला माहित होते कि अक्की एकदा मानसिक रोगी राहिलेला आहे... गोडबोले जेव्हा संत्यला चिंतीत पाहतात तेव्हा बोलतात, "काय झालं पवार चिंतीत दिसतोयस...??"


"नाही साहेब... ह्या सिरिअल किलर ने तर डोक्याचं भजं केलंय...!" संत्या डोकं पकडत म्हणाला...


"ते तर आहे... चल ठीक आहे यार... चिंता सोड आणि माझ्या घरी चलून थोडी ड्रिंक घे म्हणजे थोडं मन फ्रेश होईल..." गोडबोले म्हणाले...


"साहेब... तुम्हाला तर माहिती आहे मी ड्रिंक घेत नाही..." संत्या म्हणाला...


"अरे यार.. कधी कधी घेतलेली चालते..." गोडबोले...


"ठीक आहे साहेब..." एवढं बोलून संत्या त्याची जीप गोडबोले साहेबांच्या गहाराकडे वळवतो... घरी पोहोचल्यावर गोडबोले साहेब म्हणतात, "संत्या तू बस मी आत्ता लगेच दोन ग्लास घेवून येतो..."


संत्याला बसल्या बसल्या मेघनाच्या
फोन विषयी आठवतं आणि तो लगेच आपला मोबाईल काढून तिचा नंबर डायल करतो...

ह्यावेळी नंबर लागताच बेल वाजायला सुरुवात होते... पण त्या बेलचा आवाज समोरच्या टेबलाच्या खणातून यायला लागतो...


क्रमशः....

0 comments:

Post a Comment