Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Thursday, 25 December 2014

~ ~ हत्यारा ~ ~ भाग सहावा

~ ~ हत्यारा ~ ~ एक चित्तथरारक कथा

भाग सहावा

संत्याने उठून टेबलाच्या खणातून तो मोबाईल
बाहेर काढला... मोबाईल मेघनाचा होता... संत्या ने पुन्हा तो मोबाईल त्या टेबलाच्या खणात ठेवला... आणि पुन्हा येवून आपल्या जागेवर बसला... तेवढ्यात गोडबोले पण ड्रिंक घेवून येतात...

"हे घे संत्या..." गोडबोले म्हणाले..


"धन्यवाद साहेब..." संत्या म्हणाला आणि दारूचा एक जळजळीत घोंट त्याने आपल्या पोटात टाकला...


"काय विचार करतोयस संत्या..??" गोडबोले म्हणाले...


"काहीच नाही साहेब... मला फक्त एक विचारायचे आहे कि तुमच्या त्या टेबलाच्या खणात तो मोबाईल कोणाचा आहे... ??" संत्याने प्रश्न केला...


"हा मोबाईल मला खुनवाल्या घरात मिळाला आहे.. मी त्या घरातील सर्वांना विचारले कि हा मोबाईल कोणाचा आहे... तर सर्वांनी तो कोणाचाच नसल्याचा नकार दिला... त्यामुळे दुसऱ्या दिवशी पोलिस स्टेशन मध्ये जमा करेन ह्या उद्देशाने मी ह्या मोबाईलला घरी घेवून आलो आणि आज सकाळी घेवून जायलाच विसरलो... अरे ह्यावर तर मिस कॉल आला आहे...??" गोडबोले म्हणाले...


"होय साहेब... हा मोबाईल माझ्या एका मैत्रिणीचा आहे... आणि तिने मोबाईल हरवल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये देखील केली आहे आणि हा मिस कॉल माझा आहे..." संत्या म्हणाला...


"तुझी मैत्रीण... पण तिचा मोबाईल तिथे कसा पोहोचला....!!" गोडबोलेंनी प्रश्न केला..... त्यामुळे संत्याने त्यांना पूर्ण कहाणी सांगितली...


पूर्ण गोष्ट ऐकल्यानंतर गोडबोले म्हणाले, "संत्या हि गोष्ट मला पचली नाही... कारण ज्या प्रकारे हत्यारा हत्या करत आहे आणि त्या प्रमाणे तो आपल्या शिकारला अश्या प्रकारे सहजासहजी सोडू शकत नाही...??"


"म्हणजे तुम्हाला बोलायचं काय आहे...??" संत्याने प्रश्न केला...


"तू आपल्या त्या मैत्रिणीची काळजी घे कारण... तिच्यावर पुन्हा हल्ला होण्याची शक्यता आहे..." काही वेळ थांबून आणि हळू आवाजात... 'आणि नाही पण...??'


संत्या ने गोडबोलेंनी बोललेल्या हळू आवाजातल्या शब्दाला बरोबर टिपला... पण संत्या बोलला काहीच नाही...


"ठीक आहे साहेब... मी आत्ता निघतो..." संत्या


"ठीक आहे... तू पोलिस स्टेशनला पोहोच... मी थोड्यावेळाने येतो आणि हो हा मोबाईल तू घेवून जा..." गोडबोले...


संत्या बाहेर येतो आणि जीप स्टार्ट करतो... आणि वेगाने गाडी चालवायला लागतो... पूर्ण रस्त्यात तो हाच विचार करत असतो कि काय चुकीचं आहे आणि काय बरोबर...?? पहिले आकीच्या घरी तो सुरा सापडणं आणि आता गोडबोले साहेबांच्या घरी मोबाईल मिळणं आणि गोडबोले साहेब उलट मेघना वरच शंका घेत होते... खरंच गोडबोले साहेब बरोबर बोलत होते का...!! कारण मी स्वतः मेघनाला आता काही दिवसांपूर्वी पासूनच ओळखतो आहे...!! कधी सुटेल हा त्याच्या डोक्यावरचा ससेमिरा...!! विचार करता करता त्याचं डोकं दुखायची पाळी आली होती...


पोलिस स्टेशन समोर आपली गाडी उभी करून... संत्या तडक आतमध्ये घुसतो आणि कदमला त्या मर्डर केसेची फाईल्स आणायला लावतो... कदम त्या फाईल्स त्याला आणून देतो ती घेवून तो वाचायला लागतो... संपूर्ण फाईल्स नीट लक्षपूर्वक वाचल्या नंतर त्याला एक गोष्ट खटकते ज्याला वाचून तू ताडकन उठून उभा राहतो...


त्याला उठलेला पाहून कदम पण उठून म्हणतो... "काय झाले साहेब...??"


संत्या त्याला ती गोष्ट सांगतो आणि ती ऐकून कदमचा पण चेहरा पांढरा फटक पडतो...


"साहेब ह्या मुद्द्यावर तर आपलं लक्षच गेलं नाही..." कदम म्हणाला...


संत्या गोडबोलेला फोन करून ताबडतोब पोलिस स्टेशनला यायला सांगतो... गोडबोले आल्यानंतर संत्या आणि कदम फाईल्स घेवून गोडबोले साहेबांच्या कॅबीनमध्ये घुसतात...


"काय झालं संत्या मला असं लगेच बोलावून घेतलं ते... काय माहिती तुझ्या हाती लागली आहे...?" गोडबोले


"हत्याराने आज पर्यंत जी काही हत्या केली आहे, त्या लोकांनी काही ना काहीतरी गुन्हा केला किंवा त्यांच्यावर केस चालू आहेत...!!" संत्या म्हणाला...


"ह्याचा अर्थ असा आहे कि हा फक्त गुन्हेगारांनाच मारतो आहे... ह्याचा अर्थ असा झाला कि हा सिरिअल किलर गुन्हाच्या विरुद्ध आहे...!!" गोडबोले...


"होय साहेब... पण हे पण तर असू शकतं कि हा पण कोणी गुन्हेगार असेल... आणि आपल्या शत्रूला मारत असेल... किंवा हा फक्त एक योगायोग असेल..." काही वेळ थांबून... "आणि होय साहेब आणखीन एक गोष्ट माहित पडली आहे कि हे सगळे लेफ्टी होते..."


"काही पण असो संत्या... हे न्याया विरुद्ध आहे... आणि आपण त्याला पकडलंच पाहिजे..." गोडबोले...


+++++++++++++++++++++++++++++++++++


रात्री घरी आपल्या बेडवर संत्या हाच विचार करत असतो कि हा हत्यारा जो रोज हत्या करत आहे ते चुकीचं आहे कि बरोबर...?? हा न्याया सोबत आहे कि विरुद्ध...?? हे सर्व विचार करता करता त्याचं आणखीन डोकं दुखायला लागतं... अक्की पण क्राईम विरुद्ध आहे आणि तो पण क्राईम संपवण्याच्या विचारात आहे... कारण त्याच्या गर्लफ्रेंडला एका चोराने तिचा बलात्कार करून तिची हत्या केली होती... आणि गोडबोले पण क्राईमच्या विरुद्ध आहे... त्यांना असं वाटतं कि गुन्हेगाराला सरळ फाशी व्हायला पाहिजे...


विचार करता करता संत्याला डोळा लागला आणि तो झोपी गेला...


सकाळी उठल्यावर तो फ्रेश होवून पोलिस स्टेशनला पोहोचतो आणि तडक आपल्या कॅबीनमध्ये जावून बसतो... आणि एका हवालदाराला कदमला बोलवायला सांगतो...


"कदम... हत्यारा विषयी आणखीन काही माहिती मिळाली का..??" संत्याने कदमला विचारले...


"साहेब, मी आतापर्यंत जेवढे पण गुन्हे झालेत त्यांच्या घरांच्या शेजारी-पाजारी पण चौकशी केली.... पण लोकांनी असल्या माणसाला (हत्याराला) पाहिलं असल्याचा नकार दिला आहे...!!" कदम म्हणाले...


"कदम, तुम्ही सध्या हि माहिती काढा कि आता पर्यंत ज्यांचे ज्यांचे खून झाले आहेत त्यांची कोणा कोणाशी शत्रुता होती का..?? असं असू शकतं कि त्यांचा एकच शत्रू असू शकतो...!!" संत्या


"साहेब, जेवढे पण खून झाले आहेत त्यानुसार त्यांचे शत्रू पण खूप असतील...!!" कदम


"काही पण असो... आपल्यांना हत्याराला पकडण्यासाठी कोणती ना कोणती दिशा तरी शोधलीच पाहिजे... आपण असे हातावर हात ठेवून असे गप्प बसू शकत नाही..." संत्या डाफरत म्हणाला, "आणि हो एक गोष्ट लक्षात ठेव हि माहिती पत्रकारांना कळता काम नये कि हत्यारा फक्त गुन्हेगारांनाच मारतोय ते...!!" संत्या


"का साहेब... उलट हि गोष्ट कळल्यावर लोकं थोडं शांत होतील आणि पत्रकारांची तोंडं पण बंद होतील...??" कदम...


"तुझं म्हणणं पण बरोबर आहे... पण हा पण विचार कर ना कि जर ह्याचा परिणाम उलटा झाला तर...!!" संत्या म्हणाला...


"म्हणजे काय साहेब...?" कदम...


"असं असू शकतं कि जेव्हा त्याला हि गोष्ट माहित पडणार तेव्हा तो आपल्यांना भ्रमित करण्यासाठी निरपराध लोकांना पण मारायला सुरुवात करेल...!!" संत्या...


"हम्म.. हे होवू शकतं..." एवढं बोलून तो तिथून निघून जातो...


संत्या पण बाहेर निघून जीपमध्ये बसतो आणि रस्त्यात तो मेघनाला फोन लावतो...


"हेल्लो, मेघना तुझा मोबाईल मिळाला आहे आणि तो माझ्याकडे आहे...??" संत्या...


"धन्यवाद संतोष, माझा मोबाईल माझ्या साठी खूप महत्वाचा आहे कारण त्यात माझे काही जरुरी नंबर्स होते, तू माझा तो मोबाईल आता आणून देवू शकतो का...?? प्लीज....!!" मेघना विनवणी करत बोलली...


"ठीक आहे, मी आत्ता येतो तुझ्या घरी..." संत्या...


"नाही, नको नको... मी आत्ता घरी नाही आहे.. तू एक काम कर एका तसा नंतर घरी ये..." मेघना जरा चाचरत बोलत होती...


"मग आत्ता कुठे आहेस...??" संत्याने विचारले...


"आता मी ऑफिस मध्ये आहे...?" काहीवेळ विचार करून मेघना म्हणते...


"ठीक आहे मी तुझ्या ऑफिसच्या इथे येतो तुझ्या ऑफिसचा पत्ता मला म्यासेज कर..." संत्या...


"नाही... नको... माझे बॉस खूप रागीष्ट आहेत... तू ऑफिस मध्ये नको येवूस... मी तुला एका तासा नंतर माझ्या घरी भेटते... ठीक आहे बाय माझा बॉस येतोय मी फोन ठेवते..." संत्या ची गोष्ट ऐकून आणखीन दचकत मेघना म्हणाली आणि लगेच फोन कट केला...


संत्याला काहीतरी विचित्र वाटत होतं, तो मनातल्या मनात म्हणतो... 'काही ना काही तरी गडबड आहे... मेघना सांगत होती कि ती ऑफिस मध्ये आहे पण फोन मधून तर ट्राफिक चा आवाज येत होता...??' संत्या जीपला थोडं पुढे जावून एका वळणावर आपल्या जीपला वळवतो आणि एका बाजारात पोहोचतो जिथे खूप वर्दळ असते... त्या वर्दळीत त्याला एक तरुणी दिसते, तिला पाहून संत्या दचकतो... ती तरुणी संत्या पासून खूप लांब पाठमोरी उभी होती... पाठमोरी उभी असल्याने आणि एवढ्या लांब उभी असली तरी संत्या तिला ओळखतो... 'हे कसं होवू शकतं....!! हि इथे नाही येवू शकत... हि तर...??' संत्या आपल्या मनात विचारच करत असतो कि... तेवढ्यात ती तरुणी बाजारातून निघून एका रिक्षामध्ये जावून बसते... लगेच संत्या आपली जीप त्या रिक्षाच्या मागे लावून तिचा पाठलाग करतो... तो जीप रिक्षा पासून काही अंतरावरच ठेवतो जेणे करून तिला असं वाटलं नाही पाहिजे कि कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे... कारण ती तरुणी संत्याला चांगल्या प्रकारे ओळखते... थोडं पुढे गेल्यावर एका सिग्नल वर संत्याची जीप येवून फसते आणि ती रिक्षा पुढे निघून जाते... सिग्नल संपल्यावर जेव्हा संत्या पुढे जातो तेव्हा त्याला ती रिक्षा कुठेच दिसत नाही... हि तीच होती कि हा माझा भास होता...!! हे तर देव जाणो...?? संत्या पुन्हा जीपला पोलिस स्टेशनच्या दिशेने वळवतो...


++++++++++++++++++++++++


संत्या पोलिस स्टेशनमध्ये आपल्या कॅबीनमध्ये परततो तेव्हा कदम त्याच्या जवळ येतो...


"साहेब,... आपण जी माहिती मला आणायला सांगितली होती ती मी आणली आहे...??" कदम...


"गुड... तर लवकर सांग काय माहिती आणली आहेस...??" संत्या ती गोष्ट ऐकण्यासाठी अधीर झाला होता...


"साहेब, काही खास गोष्ट नाही आहे.. कारण सर्वांच्या शत्रूंची लिस्ट खूप लांब लचक आहे... आणि ज्यांची हत्या झाली आहे ते पण एकमेकांचे शत्रू होते... पण ह्यांच्यामधून एक गोष्ट महत्वाची माहित पडली आहे कि एक व्यक्ती अशी आहे ज्याचं नाव ह्या सर्वांच्या लिस्टमध्ये सर्वात वरती आहे... आणि ते नाव आहे 'शाकाल'... पण सर त्याच्या विषयी आपल्याकडच्या रेकॉर्ड मध्ये काहीच माहिती नाही आहे... आणि त्या शाकाल नावाच्या व्यक्तीला आज पर्यंत कोणी पाहिलेच नाही... आणि त्याचा ठाव ठिकाण कोणालाच माहित नाही...??" कदम...


"तर लवकरात लवकर हे माहित करा कि हि व्यक्ती कोण आहे, काय करते आणि कुठे राहते...??" संत्या म्हणाला...


क्रमशः.... 

MERRY CHRISTMAS TO ALL MY FRIENDS

0 comments:

Post a Comment