Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Tuesday, 9 December 2014

~ ~ हत्यारा ~ ~ भाग पहिला

~ ~ हत्यारा ~ ~ एक चित्तथरारक कथा

 भाग पहिला 

"हेल्लो हेल्लो, पोलिस स्टेशन, मी समता नगर हून बोलतोय... माझ्या शेजारच्या खोलीमध्ये खून झाला आहे... तुम्ही लवकरात लवकर या..." समोरचा जरा गोंधळलेल्या स्थितीत बोलत होता...

"ठीक आहे आम्ही, तिथे लगेच पोहोचतो..." फोन ठेवून इन्स्पेक्टर संतोष पवारने हवालदाराला जीप काढायला सांगितली...

इन्स्पेक्टर संतोष पवार, समता नगर पोलिस स्टेशन मध्ये प्रमुख पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते... ३८ वर्षांचे इन्स्पेक्टर संतोष पवार, स्वभावाने कडक पण प्रामाणिक व्यक्ती होते.... डोक्यावर आपली टोपी चढवत ते चरफडतच सकाळच्या गारठ्यात पोलिस स्टेशन बाहेर पडले... त्यांची जीप कांदिवली च्या वर्दळीला भेदून, सायरन चा कर्ण कर्कश आवाज करत पुढे पुढे जात होती... संतोष साहेबांची जीप समता नगर मध्ये एका दोन मजल्या घरासमोर येवून थांबते... जीप थांबल्याबरोबर इन्स्पेक्टर संतोष पवार च्या नेतृत्वाखाली एक पोलिसांची तुकडी गाडीतून उतरून त्या घराकडे धावली...

समता नगरचा परिसर पोलिसांच्या गाड्या, ऍम्ब्युलन्स, बाईट्स मिळवण्यासाठी आलेले पत्रकारांच्या गर्दीत गजबजून गेला होता... खोलीमध्ये इन्स्पेक्टर पवार पंचनामा करत होते... १० वर्षांच्या कारकिर्दीत इतका क्रूर गुन्हा त्यांनी पहिल्यांदाच पाहिला होता... समोरच्या बेडवर त्या बाईचे प्रेत पडले होते... संतोष साहेबांच्या हुकुमावरून फोटोग्राफर्स गुन्ह्याचे फोटो काढण्यात व्यस्त झाले...

''जरा घराच्या आजुबाजुबाजुलासुध्दा बघा...'' संत्याने त्यातील दोघांना बजावले... ते दोघे बाकी साथीदारांना सोडून एकजण घराच्या डाव्या बाजुने आणि दुसरा उजव्या बाजूने पहाणी करीत घराच्या मागच्या बाजूला धावत जावू लागले.

"कदम, ठसे आणि काही पुरावे मिळतायत का ते पहा...?" कदमला अजून काही किरकोळ इंस्ट्रक्शन देवून संतोष घरातील मोलकरणी कडे वळले, "जेव्हा खून झाला तेव्हा तुम्ही कुठे होता...?"

"साहेब मी किचन मध्ये झोपली होती... जेव्हा मी मालकीण बाईंना सकाळी उठवायला वरच्या मजल्यावर गेले तर मालकीण बाई तिथे बेडवर रक्तबंबाळ अवस्थेत मृत पडल्या होत्या... ते दृश्य पाहताच मी जोरात किंचाळले... माझ्या किंचाळल्याने शेजारील लोकं धावत इथे आले..." मोलकरीण रडत रडत सांगत होती...

"हम्म, बर ह्या घरात कोण कोण राहतं..." संतोष साहेबांनी हवालदाराला पाणी आणायचा इशारा करून तिला पुन्हा प्रश्न केला...

"साहेब ह्या घरात माझे मालक गणेश जे गेल्या तीन दिवसा आधी विदेशात गेले आहेत... ते आणि मालकीण बाई इथे राहतात... आणि त्यांचा मुलगा आदित्य होस्टेल मध्ये राहतो..." पाणी पिउन झाल्यावर मोलकरीण बोलली...

एवढं विचारून संतोष पूर्ण खोली पहायला लागतो... तेव्हा त्याच्या निदर्शनास एक गोष्ट येते कि खोली तर एकदम व्यवस्थित आहे... घरातील सामान पण आपल्या जाग्यावर नीट नेटकं होतं... ह्याचा अर्थ हत्यारा चोरी करण्यासाठी आलेला नव्हता... तेवढ्यात कदम संतोष साहेबांना तो जिथे उभा आहे तिथे बोलावतो...

"सर, हे पहा बॉडीचा डावा हात गायब आहे..." कदम ने त्यांना बॉडीकडे पाहत सांगितले..

"हम्म, ह्याचा अर्थ काय असू शकतो...!!" संतोष साहेब उद्गारले... त्याच्याच काय बाकीच्यांच्याही डोक्यात एकाच वेळी बरेच प्रश्न घोंगावत होते. पण विचारणार कुणाला..?

"माहित नाही सर....!!" कदम बोलले...

कदमला पुन्हा काही इंस्ट्रक्शन देवून संतोष साहेब बाहेर येवून आपल्या जीप मध्ये बसले... आणि जीपला पोलिस स्टेशनकडे वेगाने घेवून जात होते... पोलिस स्टेशन जवळ पोहोचून जेव्हा संतोष साहेब आपल्या जीप मधून उतरतात इतक्यात त्यांचा भ्रमणध्वनी वाजायला लागतो...

क्रमशः....

0 comments:

Post a Comment