Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Friday, 2 January 2015

~ ~ हत्यारा ~ ~ भाग सातवा

~ ~ हत्यारा ~ ~ एक चित्तथरारक कथा
भाग सातवा

"ठीक आहे साहेब..." एवढं बोलून कदम तिथून उठून निघून जातो...


तितक्यात संत्याच्या भ्रमणध्वनीवर मेघनाचा कॉल येतो...


"हेल्लो... मी तुमची माझ्या घरी केंव्हा पासून वाट पाहते पण तुम्ही आला नाहीत... आणि माझा फोन कुठे आहे..?" मेघनाने संत्याच्या फोन उचलल्या उचलल्या त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला...


"सध्या मी थोडा कामात व्यस्त आहे... संध्याकाळी मी तुमचा मोबाईल घेवून येईन..." संत्या म्हणाला...


"ठीक आहे, मी वाट पाहेन..." एवढं बोलून तिने फोन कट केला...


फोन कट झाल्या नंतर संत्या त्या मुलगी विषयी विचार करायला लागतो जी आज त्याला त्या बाजारात दिसली होती.. हि मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून सुचिता होती... आज एवढ्या वर्षानंतर संत्या तिला इथे पाहून दचकला होता... गोडबोलेच्या आवाजाने त्याची तंद्र भंगली...


"काय विचार करतोयस...??"


"काहीच नाही सर..."


"किलर विषयी काही माहित पडलं...??"


"नाही साहेब... त्याच्या विषयी तर काहीच माहिती सापडली नाही... पण कदम एक माहिती जरूर घेवून आला आहे...!!" संत्या गोडबोले साहेबांना पूर्ण माहिती सांगून टाकतो...


"कोण असू शकतो हा शाकाल... ह्याच्या विषयी लवकरात लवकर माहिती मिळवा...?" संत्याची गोष्ट ऐकल्यावर गोडबोलेंनी प्रतिक्रिया दिली...


"साहेब... मी कदमला त्याच विषयी माहिती आणायला पाठवलं आहे... आणि सध्या तो त्याच कामात व्यस्त आहे..." संत्या म्हणाला...


+++++++++++++++++++++


संध्याकाळी संत्या मेघनाच्या घराच्या बाहेर उभा राहून दारावर टकटक करतो...


"ये संतोष मी तुझीच वाट पाहत होते..." दार उघडताच मेघना म्हणाली... दोघेही येवून सोफ्यावर बसले...


"हा घे तुझा मोबाइल..." संत्या


"धन्यवाद संतोष, हा कुठे सापडला तिथेच ना जिथे मी सांगितले होते...??" मेघना


"हो... मोबाईल त्या घटनावाल्या घरात सापडला होता..." संत्या...


"हम्म... म्हणजे त्या काळे कपडे वाल्यानेच हा मोबाईल उचलून तिथे घेवून गेला असेल...!!" मेघना...


"हो... असं असू शकतं..." संत्या...


"तू बस... मी तुझ्यासाठी कॉफी घेवून येते..." मेघना...


"नाही नको... मी सध्या घाईत आहे... नंतर कधी तरी येईन..." संत्या...


"त्या दिवशी पण तू असाच निघून गेला होतास... आज जावू नाही देणार मी तुला..." मेघना त्याला दटावत म्हणाली आणि उठून किचन
मध्ये गेली...

मेघना जाताच संत्याचा मोबाइल वाजायला लागतो... मोबाईल वर अक्कीचं नाव झळकत होतं... तो पटकन तो फोन उचलतो...


"कुठे आहेस यार... फोन बिन काहीच नाही ... कुठे व्यस्त असतोस आजकाल...?" अक्की...


"काहीच नाही यार... त्या सिरिअल किलरच्या केस मध्येच गुंतलेला असतो सध्या मी... आणि त्यात सध्यातरी काहीच मार्ग सापडत नाहीये... त्याच चक्कर मध्ये इथे तिथे फिरतोय मी..." संत्या म्हणाला...


"नाही... अजून कुठली तरी गोष्ट आहे जी तू माझ्या पासून लपवत आहेस... कुठे हरवलेला असतोस, आज दिवसा मी तुला बाजारात पाहिले... आणि तुला मी आवाज पण दिला पण स्वारी दुसऱ्याच दुनियेत हरवलेली होती त्यामुळे आम्हा गरिबांची आठवण कशी येणार..." अक्की...


"नाही यार... मी कोणाचा तरी पाठलाग करत होतो..." संत्या म्हणाला...


"कोणाचा पाठलाग करत होतास...?" अक्की...


"मी थोड्या वेळाने तुझ्या घरी येतो तेव्हा तुला सर्व काही सांगतो..." संत्या...


"आता कुठे आहेस...??" अक्की...


"खूप प्रश्न विचारतोस यार तू... आत्ता मी मेघनाच्या घरी आहे... आणि लगेच जे काही तुझ्या मनात आलं असेल ना तसलं काहीच नाही आहे.. ठीक आहे..." संत्या...


"मी कुठे काय बोललो... ठीक आहे तू ये मी वाट पाहतोय तुझी..." अक्की ने बोलून फोन कट केला...


तेवढ्यात मेघना कॉफी घेवून येते आणि त्याला एक कॉफीचा पेला देवून दुसरा ती घेते आणि सोफ्यावर बसते...


"त्या सिरिअल किलर विषयी काही माहित पडलं कि नाही...??" मेघनाने प्रश्न केला...


"नाही सध्या तरी तपास सुरु आहे... फक्त एवढंच माहित पडलं आहे कि तो फक्त गुन्हेगारांनाच मारतोय..." संत्या म्हणाला..


"मग तर हि चांगली गोष्ट आहे... कमीत कमी सर्वसामान्य माणसांच्या जीवाला तरी त्याच्यापासून धोका नाही आहे..." मेघना...


"नाही असं नाही आहे... असली लोकं विश्वास करायच्या लायकीची नाहीत... ते कोणावरही हल्ला करू शकतात... आणि हा फक्त एक योगायोग असू शकतो कि त्याने ज्यांना ज्यांना मारलं आहे ती लोकं गुन्हेगार होते..." संत्या आपली कॉफी संपवत म्हणतो... "ठीक आहे... धन्यवाद मी आता निघतो मला एका मित्राच्या घरी जायचे आहे..."


"ठीक आहे बाय..." मेघना...


"बाय... टेक काळजी..." संत्या म्हणतो आणि बाहेर निघून आपल्या जीपमध्ये जावून बसतो... जीप चालू करून तो जीप अक्कीच्या घराकडे वळवतो... थोडं पुढे गेल्यावर त्याला कदमचा फोन येतो...


"बोल कदम..." संत्या म्हणतो...


"......................................" कदम


"काय...???? मी आता इस्पितळात पोहोचतो..." जीपला करकचून ब्रेक लावून संत्या आश्चर्याने म्हणतो... आणि जीप इस्पितळा कडे वळवतो... आणि लगेच तो अक्कीला फोन लावतो हे कळवण्यासाठी कि आज तो येवू शकत नाही... पण त्याचा फोन बंद दाखवत होता... त्यानंतर लगेच तो त्याच्या घराचा नंबर लावून प्रयत्न करतो... पण तिथेही कोणी फोन उचलत नाही... तो इस्पितळात पोहोचून थेट कदमकडे जातो...


"हे सर्व कसं झालं... आणि आता विजय हवालदार कसा आहे...??" संत्या...


"सर मला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता कि, कोणीतरी रस्त्यावर रक्तामध्ये तळमळत आहे... जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा तो दुसरा तिसरा कोणी नसून विजय होता... कोणी तरी त्याला खूप क्रूर पणे मारलं आहे... जीव तर वाचला आहे पण सध्या तरी तो कोमामध्ये आहे..." कदम म्हणाला...


"काही माहित पडलं हे कोणी केलं असेल ते...??" संत्याने पुन्हा प्रश्न केला....


"अद्याप तरी नाही सर, पण नक्कीच हे काम त्या सिरिअल किलरचं असणार...!!" कदम...


"जरुरी नाही आहे कि हे काम त्यानेच केलं असावं कारण सिरिअल किलर आपल्या सावजाला सहजासहजी सोडत नाही... आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तो फक्त गुन्हेगारांवरच हल्ला करतो..." संत्या म्हणाला...


"पण साहेब, आणखीन हे सर्व कोण करू शकतो...!! आणि हो हा सुरा तिथे सापडला आहे... मला असं वाटतंय कि ह्याच हत्याराने विजयवर हल्ला झाला आहे...?" कदम...


संत्या सुरा पाहून दचकतो... 'हा सुर तर मी अक्कीच्या घरी पाहिला होता...??' तो मनातल्या मनात विचार करत असतो...


"ठीक आहे तू ह्या सुऱ्यावर हाताचे ठसे मिळत आहेत का ते बघ आणि मला सकाळी रेपोर्ट दे... आता तर पूर्ण गोष्ट तेव्हाच माहित पडणार जेव्हा विजय शुद्धीत येईल...!" संत्या...


संत्या पुन्हा झपाझप आपल्या जीपकडे येतो आणि आपल्या घराकडे निघतो... घरी पोहोचून जेवण वैगेरे जेवून तो निवांत टीवी पाहत असतो... पाहता पाहता तो च्यानल बदलतो आणि न्यूज च्यानल लावतो... न्यूज च्यानल लावल्यावर त्यातील बातमी पाहून तो आणखीनच क्रोधीत होतो... आणि विचार करत असतो, 'आता हि गोष्ट कोणी पत्रकारांना सांगितली कि हत्यारा फक्त गुन्हेगारांनाच मारतो ते...??' तो रागाने टीवी बंद करून आपल्या बेडरूममध्ये जावून पहुडतो... आणि विचार करत असतो, 'फक्त एका सुऱ्या ने हे सिद्ध होत नाही कि अक्कीच तो सिरिअल किलर आहे...!! असा सुरा तर खूप लोकांकडे असू शकतो...!! त्याला मी लहानपणासून ओळखतो... तो असं कधीच करू शकत नाही... आता त्या सिरिअल किलरला लवकरात लवकर पकडले पाहिजे... कारण आता तर त्याने सर्वसामान्य लोकांना पण मारण्याची सुरुवात केली आहे...' हाच विचार करता करता तो झोपी गेला...


-------------------------------------------


मेघना आपल्या बेडरूममध्ये झोपलेली आहे... तेव्हा एक सावली तिच्या घरात घुसते आणि ती सरळ तिच्या बेडरूममध्ये जाते... त्या सावलीच्या हातात एक दोरी आहे आणि तो हळू हळू करून मेघनाच्या उशीजवळ पोहोचतो... आणि दोरीला तिच्या गळया भोवती गुंडाळून तिचा गळा आवळायला लागतो, मेघना तडफडायला लागते, हात पाय मारून ती ह्याच्यातून आपली मुक्तता करायला पाहते... पण त्या सावलीने ती दोरी एकदम घटत पकडून ती दोरी पलंगाला बाधत असते आणि आपल्या हातात एक सुरा घेवून ती सावली मेघनाचा हात कापायला लागते कि अचानक फोनच्या घंटीचा आवाज घुमला जातो...


क्रमशः...

0 comments:

Post a Comment