Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Thursday, 8 January 2015

~ ~ हत्यारा ~ ~ भाग शेवटचा

~ ~ हत्यारा ~ ~ एक चित्तथरारक कथा

भाग शेवटचा

फोनच्या घंटीच्या आवाजाने संत्या झोपेतून धडपडत उठतो आणि फोने उचलतो... फोनवर अक्की होता... "हेल्लो... गुड मोर्निंग अक्की... काल संध्याकाळी कुठे गेला होतास...??" संत्या म्हणाला..


"गुड मोर्निंग... हो यार काल संध्याकाळी जरा काम होतं त्यामुळे बाहेर गेलो होतो आणि मला क्षमा कर तुला भेटू शकलो नाही..." अक्की म्हणाला...


"अरे ठीक आहे यार... मला पण काल काम आलं होतं त्यामुळे मी पण तुझ्या घरी आलो नव्हतो... पण मी तुझा मोबाइल किती वेळा लावण्याचा प्रयत्न केला पण तो तर बंद येत होता...  होतास कुठे तू...??" संत्या


"हो काल माझ्या मोबाइलची ब्याटरी संपली होती त्यामुळे तो बंद झाला होता... चल ठीक आहे आपण आज संध्याकाळी भेटू..." अक्की...


"ठीक आहे... भेटू..."


संत्या ने फोने कट केला... आणि तो त्या स्वप्ना विषयी विचार करायला लागला, ' किती भयानक स्वप्न होतं.. हा नियतीचा कुठला खेळ तर नाही ना... जे मला हे स्वप्न पडलं...?? ' संत्या विचार करता करता बेडवर उतरून बाथरूममध्ये घुसतो... आणि फ्रेश होवून, नाश्ता वैगेरे करून आणि तैय्यार होवून तो इस्पितळाकडे निघतो जिथे विजय भरती होता... तिथे जावून तो विजयला पाहतो... विजय अजूनही कोमामध्ये होता... संत्या लगेच तिथून पोलिस स्टेशनकडे निघतो...


स्टेशनमध्ये गेल्यावर कदम त्याच्या कॅबीनमध्ये येतो...


"गुड मोर्निंग साहेब..." कदम


"गुड मोर्निंग कदम, बोल काय बातमी आणलीत तुम्ही..." संत्या


"साहेब त्या सुऱ्यावर कोणाच्याच हाताचे ठसे सापडले नाहीत..."


"म्हणजे हा जो कोणी आहे ज्याने विजय वर हल्ला केला त्याने हातमोजे घातले असतील... विजयला ज्याने इस्पितळात आणलं त्याच्याकडून कुठली माहिती सापडली का...?"


"नाही साहेब... तो तर आपल्या गाडीतून घरी जात होता.... तेव्हा त्याला रस्त्यामध्ये विजय जखमी अवस्थेत सापडला आणि त्याने ताबडतोप त्याला इस्पितळात न्हेला.. आणि आम्हाला फोन करून ह्याची सूचना दिली..."


"कोण आहे तो त्याला कमीत कमीत धन्यवाद तरी बोललं पाहिजे... कारण आजच्या जमान्यात कोण कोणासाठी असं करत..."


"त्याचं नाव सचिन आहे... " कदम


"ठीक आहे तू जा..."


कदम गेल्यानंतर संत्या आपल्या जीपमध्ये बसून समता नगर परिसराचा एक राउंड मारायला निघतो...


---------------------------------


संध्याकाळी संत्या अक्कीच्या घरी पोहोचतो...


"कधी पासून मी तुझीच वाट पाहतो आहे... ये बस आतमध्ये मी तुझ्यासाठी कोल्डड्रिंक आणतो..." अक्की


संत्या सोफ्यावर बसून सकाळच्या स्वप्ना विषयी विचार करत असतो... तेवढ्यात अक्की कॉल्ड ड्रिंक घेवून येतो...


संत्या कॉल्ड ड्रिंक पिणार तेवढ्यातच त्याचा फोन वाजला जातो फोनवर कदम असतो...


"हा कदम बोल... काय...?? ते घर कोणाचं आहे... आता तो कुठे आहे... ठीक आहे मी आत्ता तिथे पोहोचतो..." संत्या लगेच फोन कट करतो आणि म्हणतो... "क्षमा कर यार... मला आत्ता जायला हवं... मी नंतर तुला भेटतो.."


"काय झालं कोणाचा फोन होता...??" अक्की


"कदमचा फोन होता... मला असं वाटतंय आत्ता आम्ही त्या सिरिअल किलरच्या खूप जवळ पोहोचलो आहोत...??" एवढं बोलून संत्या तिथून झपाझप पावलं टाकत निघून जातो...


जीप घेवून संत्या कदमने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचतो... घरात पोहोचल्यावर तेथील दृश्य पाहून संत्याचे डोळे विस्फारले जातात...


"हे पहा साहेब.. तो किलर इथे राहायचा... ते पहा जेवढ्या पण लोकांची त्यांनी हत्या केली आहे त्या सर्वांचे तुटलेले हात तिथे पडले आहे..." कदम एकीकडे इशारा करत म्हणाला...


"हे घर कोणाचं आहे...?? आणि कोण राहतं इथे...???" संत्याने विचारले...


"साहेब इथे कोणी टाकाल नावाचा व्यक्ती राहायचा... त्याचं खरं नाव कोणालाच माहित नव्हतं... आणि तो कोणाशीच जास्त वार्ता करायचा नाही... बस एवढंच माहित पडलं कि लग्न करून तो इथून गायब झाला त्या नंतर अजूनही परतला नाहीये... आणि तो गेल्यानंतर ह्या घराला कुलूप लागलं होतं त्याला कधीही कोणी येतांना पाहिले नाही आणि कोणी जातांना पाहिले नाही..." कदम


"अरे विचित्र गोष्ट आहे.. ह्या घरात कोणी राहत होतं आणि कोणालाच काहीच माहित नाही... त्या टाकालचा काही फोटो वैगेरे सापडला आहे कि नाही... इथे शेजाऱ्या-पाजाऱ्यांना विचारा कि कोणाकडे त्याचा फोटो आहे कि नाहे ते..." संत्या


"साहेब... इथल्या लोकांना जेवढं माहित होतं तेवढं त्यांनी सांगितली... अजून काहीच माहित नाही... आणि हो साहेब हा तोच आहे ज्याने विजयला इस्पितळात आणलं होतं..." कदम त्याला एका व्यक्तीची भेट करून देतो...


"हेल्लो सचिन... खूप खूप धन्यवाद तुम्ही माझ्या एका साथीदाराला इस्पितळात आणून... आणि त्याचा जीव वाचवल्या बद्दल..." संत्या हात मिळवत बोलला...


"साहेब... हे तर माझं कर्तव्य आहे..." सचिन म्हणाला...


"तू कधी कोणाला ह्या घरात येतांना किंवा जातांना पाहिलं आहेस...??" संत्याने त्याला प्रश्न केला...


"नाही साहेब... जेव्हा पासून टाकाल इथून गेला आहे तेव्हापासून ह्या घराला कुलूप लागलेलं आहे आणि त्याचं कोणीच इथे आलेलं नाहीये..."


"तुझ्याजवळ टाकालचा कोणता फोटो आहे का...??"


"नाही साहेब..."


"जर तुला तो टाकाल कुठे सापडला किंवा कुठे दिसला तर मला संपर्क कर ओके..."


"ठीक आहे साहेब..."


------------------------------------------


दुसर्या दिवशी जेव्हा संत्या पोलीसे स्टेशन मध्ये पोहोचतो तेव्हा गोडबोले त्याच्याजवळ येतो...


"गुड मोर्निंग साहेब..." संत्या म्हणतो...


"कसली गुड मोर्निंग... आता कमिश्नर साहेबांचा फोन आला होता... त्यांनी आपल्यांना बोलावले आहे... असं वाटतंय आज सकाळी सकाळी आपल्यांना ढोस मिळणार आहेत..."


"साहेब... असं काहीच होणार नाही... आपण किलरच्या ठिकाणा पर्यंत पोहोचलो आहोत... बस काही क्लू मिळाल्यावर आपण लवकरच किलरला पकडू..."


गोडबोले आणि संत्या कमिश्नर साहेबांच्या कॅबीनमध्ये उभे असतात...


"गोडबोले अजूनही तो माथेफिरू पकडला का नाही गेला... तुम्हाला माहितीये मला वरून किती ऐकायला पडतंय ते... मला सर्वांना उत्तरं द्यावी लागतात... वरून हे पत्रकार लोकं आपलं जगणं कठीण करत आहेत..." कमिश्नर...


"साहेब... आम्ही किलरच्या ठिकाणा पर्यंत पोहोचलो आहोत... बस काही क्लू मिळाल्यावर आम्ही लवकरच किलरला पकडू..." संत्या कमिश्नर साहेबांना पूर्ण गोष्ट सांगतो...


"गुड... लवकरात लवकर त्या टाकालचा पत्ता काढा आणि त्या किलरला पण पकडा... आता तुम्ही जावू शकता..." कमिश्नर...


गोडबोले आणि संत्या तिथून पुन्हा पोलिस स्टेशनमध्ये परततात...


------------------------------------


संध्याकाळी संत्या अक्कीकडे जातो... आणि आजची पूर्ण हकीकत त्याला सांगतो...


"हा टाकाल कोण आहे...?? मला तर वाटतंय हा टाकालच किलर आहे...??" अक्की...


"असू शकतो..!!"


"आणि हो तू सांगितलं नाही त्या दिवशी तू घाईत का होतास... कोणाचा पाठलाग करत होतास...??"


"त्या दिवशी मी सुचीताला पाहिलं आणि तिचाच पाठलाग करत होतो..."


"हे कसं असू शकतं ती तर हे शहर सोडून गेली होती... नक्कीच तुला भास झाला असेल..."


"नाही यार... मी सुचीताला तर आपले डोळे बंद करूनही ओळखू शकतो... हा भास नसू शकतो..."


"तू तिला विसर आणि मेघना विषयी विचार कर... ती चांगली मुलगी आहे ती तुला सुचीता सारखा दगा नाही देणार..."


"यार आता मला कसलीच घाई करायची नाहीये... प्रेमात एकदा धोका खाल्ला आहे... दुसर्यांदा मला ते सहन होणार नाही..."


"बघ जर वेळ झाली तर काहीच होवू शकत नाही... मी सांगतो ते कर तिला प्रपोज कर..."


"बघूया... चल मी निघतो..."


"ठीक आहे... पण जे काही सांगितले आहे त्यावर विचार कर..."


संत्या त्याला काहीच न बोलता जीप आपल्या घराकडे वळवतो...


----------------------


संध्याकाळी थकून आलेला संत्या जेवण झाल्यावर जेवून लगेच झोपी गेला...


दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश होवून तो पोलिए स्टेशनला निघतो... पोलिस स्टेशन जवळ त्याला पत्रकारांची गर्दी दिसते... संत्याला पाहताच त्यांचा गलका त्याच्याकडे येतो...


"पवार साहेब... त्या सिरिअल किलरच्या ठिकाणाचा पत्ता लागल्यावरही तुम्ही अजूनही किलरला पकडू
शकला नाही...?" पत्रकार...

एक जळजळीत कटाक्ष त्या पत्रकारावर टाकून संत्या म्हणाला... "अजूनही आमचा तपास सुरु आहे... पूर्ण माहिती मिल्यावर मी स्वतः येवून तुम्हाला सर्व हकीकत सांगेन..." एवढं बोलून संत्या लगेच पोलिस स्टेशनमध्ये घुसतो...

आपल्या कॅबीनमध्ये संत्या निवांत बसून काहीतरी विचार करत असतो कि तेवढ्यात त्याच्यासमोर गोडबोले येतात...

"काय विचार करतोयस...??" गोडबोले ने प्रश्न केला...

"अ...! काहीच नाही सर..." गोडबोलेचा आवाज येताच संत्या ताडकन आपल्या जागेवरून उठतो...

"त्या टाकाल विषयी काही माहित पडलं का...??" गोडबोले...

"नाही सर अजूनही काहीच माहिती नाही मिळाली...!! कोणालाही त्याच्या विषयी काहीच माहित नाही...??"

"आता तर सध्या तो किलर शांत बसला आहे... जेव्हा पासून विजय वर हल्ला झाला आहे तेव्हा पासून खुनाची बातमी देणार एकही फोन आलेला नाहीये...!!"

"हो सर... विजय सोबत झालेल्या घटनेपासून काहीच झालेलं नाही..."

"ठीक आहे.. कमीत कमी काही दिवस तरी शांत जातील..." एवढं बोलून गोडबोले तिथून निघून जातात...

--------------------------------------

संध्याकाळी घरी परततांना संत्याला गोडबोलेचा फोन येतो... संत्या पटकन आपली जीप वळवून गोडबोले ने जिथे बोलावले होते तिथे जातो.. तिथे पोहोचून तो गोडबोले जवळ जातो...

"किलर आत्तापर्यंत फक्त गुन्हेगारांनाच मारायचा पण आज तर ह्याने सामान्य लोकांना पण मारायला सुरुवात केली आहे... ते बघ तिथे..." गोडबोले म्हणाले... मृतदेह जसे पहिल्यांचे होते तसेच आजही हा मृतदेह तसाच होता... डावा हात तुटलेला आणि दोरीने गळा आवळून मृत्यू...

संत्या त्या मृतदेहाला पाहून विचारात पडतो... ' अरे ह्या माणसाला मी कुठे तरी पाहिलं आहे पण लक्षात येत नाहीये...'

"काय विचार करतोयस संत्या...?" गोडबोलेने विचारले...

"सर... मी ह्या माणसाला कुठेतरी पाहिलं आहे...!! पण आठवत नाहीये कि कुठे पाहिलंय ते...!!" संत्या

"आपण पोलिसवाले आहोत... दिवसभरात आपण कितीतरी लोकांना पाहतो... त्यात पत्रकार हि असतात... हाही त्यापैकीच कोणी असणार... आणि हाही एक पत्रकारच होता..." गोडबोले...

"असू शकतं सर..."

एवढं बोलून संत्या आणि कदम त्या घराची झडती घेत असतात... पण त्यांच्या हाती निराशाच सापडते... लोकांकडून माहित पडतं कि हि व्यक्ती इथे एकटीच राहायची... त्या ठिकाणाची झडती घेतल्यानंतर संत्या आणि गोडबोले जीपमध्ये बसून निघून जातात... गोडबोलेला त्याच्या घरापर्यंत सोडून संत्या आपल्या घरी वळणारच तेवढ्यातच त्याला बंदुकीच्या गोळीचा आवाज येतो... संत्या पटकन गोळीच्या आवाजाच्या दिशेने पाळायला लागतो...

थोडं पुढे गेल्यावर त्याला गोडबोले भेटतात...

"काय झालं सर...? मी आत्ता गोळीचा आवाज ऐकला...??" संत्या...

"आता मी जात होतो तेव्हा मी एका व्यक्तीला पाहिलं त्याने काळे कपडे परिधान केले होते... मी त्याला थांबायला सांगितले... पण तो माझं काहीच न ऐकता पळायला लागला... मी त्याला थांबवण्यासाठी त्याच्यावर गोळी चालवली पण माहिती नाही तो कुठे गायब झाला तो..??" गोडबोले...

संत्या आणि गोडबोले त्याला सर्वीकडे शोधत असतात... शोधत शोधत ते खूप लांबवर येतात... तेवढ्यात गोडबोले म्हणतात, "चल संत्या आपण खूप लांब आलो आहोत...!!"

संत्या गोडबोलेंना घराजवळ सोडून पुन्हा आपल्या जीप जवळ येतो तेव्हा त्याला जाणीव होते कि कोणीतरी त्याला पाहत आहे... तो मागे वळून पाहतो तर त्याला तिथे कोणीच दिसत नाही... पण त्याच्या जीपच्या आरश्यात त्याला ती व्यक्ती कोण आहे ती दिसते... तो जीप घेवून निघून जातो...

--------------------------------------

सकाळी पोलिसस्टेशन मध्ये संत्या गोडबोलेच्या कॅबीनमध्ये जातो... ते सिरिअल किलर विषयीच चर्चा करायला लागतात...

"साहेब... ह्या माथेफिरू सिरिअल किलर विषयी अजूनही काहीच पुरावा सापडत नाहीये... अश्यात आपल्यांना काय करायला पाहिजे...??" संत्याने प्रश्न केला...

दोघांमध्ये काही गुप्त वार्ता होते आणि संत्या तिथून निघून जातो...

--------------------------------------

संध्याकाळी संत्या घरी परत जात असतांना त्याला तीच काळे कपडे वाली व्यक्ती दिसते तो त्याचा पाठलाग करतो... ती व्यक्ती एका अंधाऱ्या खोलीत घुसते... वायरलेस वर संत्या सर्वांना आधीच सूचना देवून टाकतो...

खोलीत घुसताच संत्याही दबक्या पावलांनी तिच्या मागे मागे त्या अंधाऱ्या खोलीत घुसतो... ती खोली तीच असते जिथे माणसांचे तुटलेले हात सापडतात.... घरात घुसून संत्याला ती व्यक्ती त्याच्याकडे पाठमोरी उभी असलेली दिसते... मग संत्या त्या व्यक्तीला मागून पकडतो... त्यांच्यात झटापट होते... पण संत्या त्या व्यक्तीचा तो मुखवटा काढण्यात यशस्वी ठरतो ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून सुचिता असते...

"सुचिता तू...?? का करतेस तू हे सर्व...?? आणि एवढ्या सहजासहजी तू अशी कशी माझ्या हाती आलीस...?? तरीही मला तुझ्यावर संशय आलाच होता कारण काल मी तुला जीपच्या आरश्यातून पाहिलं होतं..." संत्या म्हणाला...

"ते मलाही नाही माहित कि मी कशी तुझ्या हाती आली... पण मी हे सर्व माझ्या मृत नवऱ्यासाठी करते ज्यांनी ज्यांनी माझ्या नवऱ्याला मारलं आणि ज्यांनी ज्यांनी मला हे सर्व करतांना पाहिलं त्या सर्वांनाहि मीच मारलं..." सुचिता शस्त्र टाकत म्हणाली...

"पण तुझ्या नवऱ्याने असं काय केलं जे ह्या लोकांनी तुझ्या नवऱ्याला मारलं...?" संत्याने प्रश्न केला...

"जसं तुझं माझ्यावर प्रेम होतं तसंच माझंही दुसर्यावर प्रेम होतं... त्यांचं नाव सुरेश होतं... आम्ही दोघांनी पळून लग्न केलं... नंतर नंतर मला सुरेश बद्दल सर्व माहिती माहित पडायला लागली कि तो एक ड्रग्स डीलर आहे... मी त्याला हे सर्व सोडून द्यायला सांगितले, नाही तर मी तुला सोडून जाईन ह्याची धमकी दिली... पण तो ह्यात एवढा गुरफटलेला होता कि त्याच्या साथीदारांना शंका होती कि हा कोणाला तरी सांगून आपला धंदा बंद करू शकतो म्हणून त्यांनी त्याला मारून टाकलं..." सुचिता स्फुंदत म्हणाली...

"मग हे शाकाल आणि टाकाल कोण आहेत...?? आणि तू इथेच राहतेस का...?" संत्याने विचारले...

"हो मी इथेच ह्या खाली पडलेल्या घरात राहते.... शाकाल आणि टाकाल हे सुरेशचे टोपण नावे आहेत..." सुचिता...

तेवढ्यात संत्याची पूर्ण टीम तिथे येते आणि सुचीताला अटक करून घेवून जाते... आणि त्या घराची झडती घेतल्यावर तिथे पोलिसांना तो सुरा आणि एक रक्ताने माखलेली दोरी सापडते... 


समाप्त...

0 comments:

Post a Comment