Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Thursday, 12 February 2015

~ ~ प्यार वाली लव स्टोरी...{एक लघु प्रेम कथा...} ~ ~

प्यार वाली लव स्टोरी... {एक लघु प्रेम कथा...}
सन १९९२ - १९९३

"कोठे आहे मी...? मी तर माझ्या खोलीत झोपेची गोळी घेऊन झोपले होते. इथे आले कशी मी..? कोणाची खोली आहे हि...?" डोळे उघडताच अनघाच्या मनात असंख्य प्रश्नांनी घर केले, पण त्या घराला अनामिक भयाने व्यापले होते.

हळूच पलंगावरून उतरुन धडधडत्या ह्रदयाने खोलीतून ती बाहेर येते.... पाहते तर काय त्या खोलीसमोरच्या किचनमध्ये कोणीतरी आहे.

"अरे हा तर आदित्य..! ह्याने मला इथे का आणले आहे?" आदित्य तिचा क्लासमेट तर होताच व शेजारी सुद्दा. आदित्य आणी अनघाचे कुटूंब एकमेकांचे वैरी होते. दररोज त्यांच्या कुटूंबियांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरुन खडाजंगी व्हायची.. अनघा एक कोळी तर आदित्य ब्राह्मण परिवारातील एकुलता एक मुलगा होता. त्यांच्या कुटुंबातील भांडणे इतकी विकोपाला गेली होती कि ते दोघे एकमेकांना पाहून रस्ता बदलायचे.

"हा माझ्यावर सूड तर उगवत नाही ना...?" हा विचार येताक्षणी तिच्या मनातील भीतीवर संतापाने मात केली आणि कोणताही विचार न करता तिने समोरच्या टेबला वरील फ्लॉवरपॉटने पाठमोऱ्या आदित्यच्या डोक्यावर आघात केला... त्या आघाताने आदित्य धडपडत कोसळला कोसळलेल्या आदित्यकडे दुर्लक्ष करून अनघाने तिच्या घराकडे धाव घेतली. पण घरासमोरचे ते दृश्य पाहून भयाने थिजून ती जागच्या जागी उभी राहते.

अर्ध्या जळलेल्या घरासमोर तिच्या आई-बाबांचा मृतदेह तर दाराजवळ लहान बहिण स्नेहलचा निर्वस्त्र मृतदेह पडला होता. भांबावलेल्या अवस्थेत ती आजूबाजूला नजर टाकते. त्या नजरेच्या दृष्टीस पडते संपूर्ण चाळीतील तेच भयंकर दृश्य. पूर्ण चाळीत आक्रोशच आक्रोश. खूप विदारक दृश्य होतं ते तिच्यासाठी.... तिच्या पायातले त्राण गळून पडले अन तिथेच बसून हुंदके देत ती रडू लागली.

तेवढ्यात स्वतःला सावरून आणि आपलं डोकं एका हाताने पकडून आदित्य तेथे येतो. त्याला पाहताच ती पाळायला पाहते. पण आदित्य तिला पकडून पुन्हा खेचत घरात आणतो व आतून दरवाजा बंद करायला लागतो. अनघाचे लक्ष घराच्या कोपर्यात पडलेल्या हॉकी वर पडते.. ती पळत जावून हॉकी आणते अन दरवाजा बंद करून वळलेल्या आदित्यच्या पोटात मारून लगेच दरवाजा उघडायला लागते.. आदित्य पोटात होणाऱ्या वेदनेने कळवळतो तरीही त्या वेदनेकडे दुर्लक्ष करून तिला पुन्हा पकडतो.

"वेड लागलंय का तुला...? कोठे निघालीस...? बाहेर दंगली चालू आहेत. मानवरूपी पशूंनी थैमान घातले आहे... तुला पाहताच ते जनावरासारखे तुटून पडतील तुझ्यावर..." आदित्य आपलं पोट पकडत म्हणाला...

हैराण झालेल्या अनघाच्या तोंडातून शब्दच फुटत नाहीत... तरी कसेबसे ती उच्चारते, "द..द.. दंगल... कसली दंगल...?"

"कसली काय...? जाती धर्मावरून चालली आहेत हि दंगल... दंगल करण्यासाठी अगदी लहान कारण हि पुरेसे आहे... एका ग्रुपने ट्रेन जाळली... आणि दुसऱ्या ग्रुपच्या लोकांनी लोकांची घरे जाळली... चहूकडे दहशतीचं वातावरण आहे... बाहेर रक्ताची होळी खेळली जात आहे..." आदित्य म्हणाला...

"माझ्या घरच्यांनी कोणाचं काय वाकडं केलं होतं...??" अनघा दाटून आलेल्या कंठाने म्हणते...

"वाकडं तर त्या लोकांनीही केले नव्हते जे ट्रेनमध्ये होते... बस येवढं समजून जा कि करतं कोणी आणि निस्तरत कोणी... सर्व काही राजकारणाचा खेळ आहे ग..." आदित्य म्हणाला...

"तू मला इथे का घेवून आला आहेस..? सूड घेण्यासाठी...?" अनघाने विचारले...

"जेव्हा मला माहित पडलं कि ट्रेन जाळली तेव्हा मीही खूप क्रोधीत झालो..." आदित्यचे बोलणे तोडत अनघा म्हणाली, "हो ना का नाही येणार तुला राग... रागीष्ट कुठला..."

"अनघा..." आदित्य तिच्यावर डाफरत म्हणाला, "माझे आई-बाबा त्या ट्रेनच्या आगीत जळून वारले..." या वाक्यासरशी डोळ्यात कोठेतरी दडून बसलेल्या अश्रूंना वाट सापडली अन ते अश्रू खळकन आदित्यच्या गालांवर ओघळले...

"तर तर माझे आई-बाबा हि कोठे जिवंत आहेत... आणि स्नेहलचा तर बलात्कार झालेला वाटतोय... तुझा हिशोब झाला ना बराबर... आता जाऊ दे मला..." अनघा रडत म्हणाली...

"हे सगळे मी नाही केलं समजलीस... तुला इथे उचलून आणलं कारण स्नेहल वर झालेला बलात्कार बघवला नाही गेला मला... रात्रीचे २ वाजलेत आता... बाहेर कर्फ्यू लागला आहे... सध्याची परिस्थिती खूप बिकट आहे... जेव्हा हे वातावरण निवळेल तेव्हा तु हवे तेथे जाऊ शकतेस..."

"तुझे उपकार घेण्यापेक्षा जीव देणे मान्य आहे मला..." एवढे बोलून ती किचनकडे धाव घेते... ओट्यावरचा सुरा उचलून ती आपली नस कापायला लागणार तर आदित्य धावत येवून तिच्या हातातील तो सुरा हिसकावून घेतो आणि तिच्या कानशीलाखाली लगावतो... त्या प्रहाराने अनघा धडपडत खाली कोसळते अन रडायला लागते...

"गप्प बस... बाहेर मनुष्य रुपी राक्षस फिरत आहेत... कोणाला शंका जरी आली कि आपण येथे आहोत तर गडबड होईल..." आदित्य...

"आता मी रडूही शकत नाही का..? माझ्याजवळ जगण्यासाठी उरलं तरी काय...? हे अश्रूच ना... त्यांना तरी वाहू दे..." अनघा स्फुंदत म्हणाली...

आदित्य काहीही न बोलता किचन मधून त्याच्या खोलीमध्ये येतो आणि अनघा पहिल्यांदा जिथे झोपलेली त्या खोलीत स्फुंदत स्फुंदत जाते...

तिकडे आदित्य हि त्याच्या खोलीमध्ये आई-बाबांच्या आठवणीने व्याकूळ होवून अश्रू ढाळत असतो...

त्याचवेळी दूरवरून गाण्याचे स्वर ऐकू येत होते,

"तेरा गम मेरा गम, एक जैसा सनम...
हम दोनो कि एक कहानी, आजा लग जा गले दिल जानी..."

-------------------------------------------------

दुसऱ्या दिवशी सकाळी कसल्यातरी आवाजाने अनघाचे डोळे उघडले.. नुकत्याच उघडलेल्या त्या डोळ्यांमध्ये साखर झोपे ऐवजी भीतीचे भाव तरळले.. आणि रात्रीचे भयानक क्षण डोळ्यांसमोरून सरकू लागले... कसल्याशा आवाजाने ती भानावर आली... गालावरील अश्रू पुसून त्या आवाजाच्या दिशेने ती निघाली... तो आवाज किचन मधून येत होता... किचनमध्ये डोकावून पाहते तर काय आदित्य नाश्ता बनवत होता... त्याची ती धडपड पाहून अनघाच्या चेहऱ्यावर क्षणभर का होईना पण हसू आले... तिच्या त्या हसण्याच्या आवाजाने... आदित्यचे लक्ष अनघाकडे जातं...

आदित्य विचारतो, "काय खाणारेस...?"

"विष असेल तर दे मला..."

"ते असते तर तुला न विचारताच दिले असते जोक्स अपार्ट... हे बघ चपात्या जरा विचित्र आकाराच्या बनल्या आहेत... हेच खावे लागेल... शिट... ईईईई... फु..फु.."

"काय झालं...?"

"अगं काहीच नाही बोट भाजलं...?" आदित्य...

"पहिल्यांदाच स्वयंपाक करतोयस तू...??"

"हो... कधी वाटले नव्हते अशी वेळ येईल पण आता शिकावे लागणार..."

काही वेळ विचार करून अनघा म्हणते, "सरक बाजूला, मी बनवते..."

"नको कशाला उगाच त्रास घेतेस तू.. बनवेन ना मी..."

"अररे... सरक तरी... जर तुला बनवता येत नसेल तर कसे काय जेवण बनवणार तू...??"

"बाजूला होईन पण एका अटीवर..."

"कोणती अट...??"

"तुलाही खावं लागणार..."

"मला भूक नाहीये..."

"थोडं तरी खा..."

"नको..."

"अगं पण..."

"आदित्य तुला कळत नाही का.... मी एकदा नाही म्हणाले ना... मग का विचारतोय पुन्हा पुन्हा..."

"मला कळतंय पण तुला कळत नाही... मी समजू शकतो अनघा, तुझ्याच प्रमाणे मी हि माझ्या कुटुंबाला हरवून बसलो.... जे हरवले आहे ते परत मिळणे अशक्य आहे... हीच वास्तुस्थिती आहे... ह्या वस्तुस्थितीचा स्वीकार करून आपल्याला जगायलाच हवे... आणि जगण्यासाठी खावे तर लागतेच ना..."

"अरे पण... माझी तर जगण्याची इच्छाच संपली आहे... का आणि कोणासाठी जिवंत राहू मी...?"

"अरे मी हि हाच विचार करत होतो... पण जेव्हा तुला इथे आणले तेव्हा असे वाटले कि जणू काही मला माझ्या जगण्याचा उद्देश मिळाला...."

"पण माझा तर असा काहीच उद्देश हि नाही..."

"का नाही...? आहे ना एक... तू मला चांगले जेवण बनवायला शिकव... हे बघ... बाहेरचे वातावरण अजूनही धुसमुसत आहे... पण हि वेळ हि निघून जाइल... कर्फ्यू निघाला कि मी तुला तू सांगशील त्या तुझ्या सुरक्षित ठिकाणी पोहोचवेल..." आदित्य हलकेच हासत हासत म्हणाला...

अनघा हि कसेबसे हासत म्हणाली, "चल सरक बाजूला आणि मला जेवण बनवू दे..."

स्वयंपाक आटोपल्यावर अनघा आदित्यला जेवायला बोलावते... तर आदित्य म्हणाला, "तू कबूल केले होते थोडेसे खाशील म्हणून..."

अनघा, "अरे हो रे, पण मी अजून फ्रेश हि नाही झाले... आमच्याकडे स्नान केल्यानंतरच किचनमध्ये यायची परवानगी मिळते... तुझी धडपड पाहिली त्यात तुझे बोट देखील भाजले म्हणून मग........"

आदित्य, "ठीक आहे... तू फ्रेश होवून ये... मी वाट पाहतो तोपर्यंत..."

थोड्यावेळाने अनघा तिचे आवरून किचन मध्ये येते तर आदित्यने किचन एकदम स्वच्छ करून ठेवले होते...

अनघा, "तर हे हि गुण आहेत तुझ्याकडे..."
आदित्य, "चल जेवूया... खूप भूक लागली आहे..."

जेवतांना दोघेही खूप शांत होते... अनघा मनातल्या मनात विचार करते कि ज्या माणसाचे तोंड हि पाहणे पसंत नव्हते आज त्याच्यासाठी मी स्वयंपाक करेल असे स्वप्नात हि आले नव्हते कधी... त्याच वेळी आदित्याच्याही मनात हेच विचार होते, 'काय खेळ आहे नियतीचा ज्या मुलीचा तिरस्कार करायचो तिच्यासाठी काय काय करावे लागत आहे... कदाचित यालाच माणुसकी म्हणत असतील...' तेवढ्यात आदित्याची नजर अनघाच्या नजरेस मिळाली... हि नजरानजर टाळण्यासाठी तो खाली मान घालून जेवू लागतो... दोघांमध्ये निर्माण झालेल्या शांततेचा भंग करत अनघाने आदित्यला विचारले,

"तू मला माझ्या पुण्यात कोथरूडमध्ये राहणाऱ्या मावशीकडे पाठवू शकतो...???"

"काळजी करू नको परिस्थिती ठीक झाल्यावर सर्वात आधी हेच काम करेन मी..."

दिवसामागून दिवस जावू लागले... एकमेकांच्या साथीत त्यांच्या मनातील दुखाचा पूर ओसरू लागला... तिरस्कार गळून पडला होता आणि त्याची जागा मैत्रीने घेतली होती... त्या घरात त्या दोघांशिवाय दुसरे कोणीच नव्हते... त्या घरावरील अबोल्याचे ढग सारून मैत्रीचे मोकळे निळे स्वच्छ आकाश दिसत होते... कधी लाडीगोडीने तर कधी एकमेकांचे रुसवे फुगवे काढण्यात वेळ कसा जात होता कळतच नव्हते... घरच्यांच्या आठवणींमुळे नयनाच्या कोपर्यातून बरसणारे अश्रू एकमेकांच्या सहवासात विरून जात होते... ऐके दिवशी मस्ती-मस्ती मध्ये आदित्य अनघाला म्हणाला, "तू इथून गेल्यावर माझे कसे होणार...?? माझ्यासाठी चांगले जेवण कोण बनवणार...?? सवय झाली आहे तुझी आता..."

"तू लग्न कर... सर्व काही ठीक होईल..."

"तरीही तुझी आठवण आल्यावर...??"

"पत्र लिहित जा ना तू मला..."

आज मस्करीत झालेल्या विषयावर दोघेही विचार करत होते... अनाघालाही आदित्यच्या सोबतीची सवय झाली होती... एकमेकांपासून वेगळे होण्याचा आणि विरहाचा विचार हि दोघांना सहन होत नव्हता... त्या विचाराने कोठेतरी दुखत होते पण त्या दुखण्याचा अर्थ त्यांना उमजत नव्हता...

-------------------------------------------------

एका महिन्या नंतर......

सकाळी अनघा किचन आवरत होती तेवढ्यात आदित्य तिथे आला व तिला म्हणाला, "कर्फ्यू निघाला आहे... मी तिकीट बुक करून येतो... काळजी नको करू... मी लवकर येतो..."

"आदित्य काळजी घे रे..."

आदित्य तिकीट आणायला जातो... अनघा किचन आवरून खोलीमध्ये येते... मावशीकडे जाण्याचा आनंद तर होता... पण या आनंदावर आदित्य पासून दूर जाण्याचे दुख मात करत होते... या विचारांमध्ये ती उदास होते व कधी तरी झोपेच्या आधीन होते...

इकडे आदित्यच्या मनातही खळबळ माजली होती... 'आपण तिला पाठवतोय ते खरे... पण... मी... कसा राहू शकतो.... सवय झाली आहे तिची... सगळा गोंधळ माजलाय मनात भावनांचा... जाउदे.. तिकीट तर बुक करूयात नंतरचे नंतर पाहूया...'

आदित्य परततो व तिकीट कपाटात ठेवून अनघाला शोधतो... तर ती तिच्या रूममध्ये झोपली होती... आज प्रथमच आदित्य तिच्या चेहऱ्याकडे निरखून पाहत होता.... तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट त्याला मोहात पाडत होती... त्या मोहाला बाजूला सारून आदित्य पाणी पिण्यासाठी किचनमध्ये जातो... तेवढ्यात त्याला अनघाच्या किंचाळण्याचा आवाज येतो... त्या आवाजासरशी आदित्यने अनघाच्या रूमकडे धाव घेतली... तिच्याजवळ पोहोचतो न पोहोचतो तेच ती त्याला घट्ट मिठी मारते... तिच्या मिठीने बावरलेल्या आदित्यला जेव्हा तिच्या भीतीची जाणीव होते तेव्हा तो मायेने तिच्या केसांवरून हात फिरवत विचारतो, "काय झाले...? काय झाले अनु...? अगं बोल ना... वाईट स्वप्न पडले का...??"

अनघा, "हून..."

"अगं स्वप्न होते ते... काही नाही होत... मी आहे ना इथे..."

अनघाला किती सुरक्षित वाटत होते... आपण आदित्यच्या मिठीत असल्याचे कळताच ती लाजेने झटकन त्याच्यापासून दूर झाली... हृदयात प्रेमाची फुटलेली पालवी दोघांच्याही मनात स्पष्ट दिसत होती... आदित्यच्या डोळ्यांसमोरून ती त्याच्या मिठीत असल्याचे दृश्य सरायलाच तयार नव्हते... इकडे आदित्यच्या मिठीचे स्पर्श अन त्याने मारलेली हाक अनघाच्या गालांवर लाली पसरवत होती...

काहीतरी बोलायचे म्हणून आदित्य म्हणाला, "अजून ५ दिवस फक्त... मग तू तुझ्या मावशीच्या घरी असशील..."

"५ दिवसांचा काही अर्थ आहे का..? मला इथे कोणती भीती कोणता त्रास आहे का...??"

आपल्या भावनांना आवर घालत आदित्य म्हणाला, "मग थांबना... जर कोणतीच भीती नाही तर..."

अनघा विचारते, "तुला वाटत असेल तर थांबते मी इथे..."

"नाही नाही... मी थट्टा करत होतो... असे असते तर मी तिकीट बुक केली असती का...??" हे बोलतांना आपले पाणावलेले डोळे तिला दिसू नये म्हणून तिथून तो निघून जातो...

त्याच्या त्या जाणाऱ्या पाठमोर्या आकृतीकडे पाहून दुखणे अक्रांधणारे अनघाचे मन म्हणत असते, 'आदित्य एकदा थांबवून बघ... मी तुला सोडून कोठे हि जाणार नाही... प्लीज एकदा म्हण तरी..."

या पाच दिवसांमध्ये, त्यांच्या जीवाची नुसती घालमेल सुरु होती... एकमेकांसमोर आले तर नजर चुकवून बोलायचे... हृदयातील भावना ओठांवर होत्या परंतु त्या व्यक्त होत नव्हत्या... प्रेम व्यक्त करण्यास निघणारे शब्द घशातच अडकत होते... चिवचिवाट करणारे पक्षी विरहाच्या जाणीवेने जणू मूक झाले होते...

अखेर ती रात्र येवून ठेपली... ती रात्र आदित्य आणि अनघाच्या सोबतीची शेवटची साक्षीदार ठरणार होती... या ५ दिवसांत एकमेकांपासून दूर पळणारे आज सोबत बसून गप्पा मारत होते... कॉलेज, मूवी, क्रिकेट, सापडेल त्या विषयावर बोलून एक-दुसऱ्याच्या सानिध्यात राहण्याचा आनंद लुटत होते... मनात उफाळून येणाऱ्या प्रेमाबद्दल मात्र कोणीही पुढाकार घेवून बोलेना... जगभराच्या वार्ता करता करता कधी तरी दोघे झोपेच्या आधीन झाले....

अचानक पायाजवळ होणाऱ्या कसल्या तरी स्पर्शाने आदित्यचे डोळे उघडतात...

"अगं...! हे काय करतेस...??"

"माझ्या देवाच्या पाया पडत आहे... तू नसता तर कदाचित आज मी जिवंतही नसते..."

"मी कोण आहे...??? हि सर्व देवाची कृपा..." घड्याळाकडे पाहत तो म्हणाला, "५ वाजले आहे... लवकर तयार हो.... ६ ची ट्रेन आहे... आपल्यांना उशीर झाला तर..."

अनघा उठून तिथून निघते आणि मनातल्या मनात म्हणते, ' मला थांबव आदित्य...'

'तू थांबू शकत नाही का, अनघा...??" आदित्य हि मनातल्या मनात म्हणतो...

नक्की काय चाललय त्यांच्या मनात. हे कसलं द्वंद्व आहे. एका नवीन प्रेमाचं अंकुर त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं असतं....

--------------------------------------------------

५.३० वाजता आदित्य, अनघाला आपल्या बाईकवर रेल्वे स्टेशनकडे आणतो...

अनघाला तिच्या ट्रेनमध्ये बसवून आदित्य म्हणतो, "एक सर्प्राइज देवू का...??"

"काय..??"

"मी पण तुझ्या सोबत येत आहे..."

"खरंच...!!!"

"नाही तर काय... मी काय असल्या परीस्थित तुला एकटीला पुण्याला पाठवणार आहे..."

"तू माणूस आहेस कि देव...?? कोण आहेस तू...??.. मला काहीच समजत नाहीये..."

"मी एक सर्वसामान्य माणूस आहे जो तुझ्यावर......"

"तुझ्यावर..... काय...??" अनघा अधीर होते ते ऐकण्यासाठी...

"काहीच नाही..."

आदित्य मनात ती गोष्ट पूर्ण करतो, ..... ' जो तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो... '

जी गोष्ट अनघा ऐकण्यासाठी उतावीळ झालेली असते... ती गोष्ट आदित्य आपल्या मनात म्हणत असतो...

ट्रेन चालायला सुरुवात होते... आदित्य आणि अनघा ट्रेनमध्ये हि खूप बोलत असतात... बोलता बोलता ते कधी पुण्याला पोहोचतात त्यांनाच माहित पडत नाही....

ट्रेनमधून उतरते वेळी अनघाचं मन खूप जड झालेलं असतं.... ती विचार करत असते, ' माहित नाही आता कधी आदित्यशी भेटायला मिळेल... '

"अरे विचार काय करत बसली आहेस... उतर लवकर...."

त्याच्या आवाजाने ती विचाराच्या दुनियेतून बाहेर येते आणि जड पावलांनी ती ट्रेनमधून उतरते...

"चल आता कोथरूडसाठी रिक्षा करूयात..."

"तू मला मावशीच्या घरापर्यंत सोडायला येतोयस का...??"

"मग काय... ह्याच बहाण्याने तुझी संगत आणखीन वाढेल..."

हे ऐकून अनघा स्मित हास्य देते...

आदित्य रिक्षा घेवून येतो आणि ते दोघे रिक्षात बसून कोथरूडकडे निघतात...

अनघा पूर्ण रस्त्यात कोणत्या तरी विचारात बुडालेली असते... आदित्य देखील गप्पच असतो...

एक तासाने रिक्षावाला कोथरूडला रिक्षा थांबवून विचारतो, "कुठे जायचे आहे... कोणता पत्ता आहे काय...??"

"हो... काका इथेच उतरवा.... आदित्य, माझ्या मावशीचं घर समोरच्या चाळीत आहे..."

दोघेही रिक्षा तून उतरतात....

थोडावेळ दोघेही तिथेच थिजून शांत उभे राहतात...

"आदित्य, आता काय बोलू... तुझे हे उपकार फेडू तरी कसे...?"

"उपकार तू देवाचे फेड... ज्याने आपल्याला हे जग पाहण्याची अजून एक संधी दिली... यात माझे कसले उपकार...?"

"कधी जेवण खराब झाले असेल, कधी तुला चुकून दुखावले असेल तर माफ कर..." भरलेल्या गळ्याने काळजावर दगड ठेवून तिने पुढचे शब्द उच्चारले, "आणि लवकर लग्न कर... एकटा राहू नकोस.... तसंही तुला जेवण बनवता कोठे येतं...?" कसनुस हासत ती म्हणाली...

"ठीक आहे... ठीक आहे... आता रडवणार आहेस का...? चल जा... तुझ्या मावशीच्या घरी..."

"तू घरी नाही येणार..."

"नाही... नको... तू जा..."

"आदित्य काळजी घे..." ती जाण्यासाठी निघाली आणि पुन्हा वळून म्हणाली, "त्या दिवशी फ्लॉवरपॉट मारला त्याबद्दल क्षमा कर..."

"आणि त्या हॉकीचे काय...??"

हसून अनघा म्हणाली, "हो हो... त्यासाठी देखील..."

"ठीक आहे... तू जा आता..."

अनघा दुखी मनाने चालू लागली... अन आदित्य तिथेच उभा राहून तिच्या दूर जाणाऱ्या आकृतीला न्याहाळत उभा असतो... त्या दुकानाच्या मागे जाताना, एक नजर वळून ती आदित्यला पाहते... दोघांनीही एकमेकांना वेदनादायक निरोप दिला....

अनघा जेव्हा त्याच्या दृष्टीआड होते तेव्हा आदित्य मागे वळून आपले डोळे पुसत तिथून निघतो...

'माहित नाही मी कसा जगू शकतो अनघा शिवाय...?? काश...! एकदा तिला बोललो असतो... ती पण माझ्यावर प्रेम करते काय...?? असं वाटतं खरं... पण काहीच बोलू शकत नाही... तिच्या शिवाय माझे पुढचे आयुष्य हे असंच काळोखाने भरलेले असणार होते का? मी जणु आधुनिक काळातला देवदास झालो होतो. ' आदित्य चालता चालता विचार करत असतो...

अचानक त्याला मागून आवाज येतो....

"आदित्य...!!! थांब..."

आदित्य मागे वळून पाहतो...

"अरे तू रडतेस का... तुला तर आपल्यांकडे जातेवेळी खुश व्हायला पाहिजे..."

"तुझ्या पेक्षा जास्त माझं आपलं कोणी असू शकतं का... आदित्य... मला स्वतः पासून प्लीज दूर नको करूस आदित्य..."

आदित्यच्या डोळ्यातून सुद्धा अश्रूंच्या धारा वाहायला लागतात आणि तो पळत जावून अनघाला मिठीत घेवून म्हणतो, "मग का जात होतीस तू मला सोडून...??"

"तू मला थांबवू शकत नव्हतास का...??" अनघा त्याच्या छातीवर एक प्रेमाने मुक्का मारत म्हणते...

"थांबवलं असतं पण मला काय माहित तू थांबनारेस कि नाही...ते.."

"तू विचारून तरी पाहिलं पाहिजे होतं..."

"ओह्ह.... अनघा.... आय लव्ह यु सो मच..."

"आय लव्ह यु टू... आदित्य..."

"मला काहीच समजत नव्हते कि मी मुंबईला परतणार तरी कसा..."

"आणि मी विचार करत होते कि मी तुझ्याविना कशी जगणार..."

"बरं झालं तू परतली नाही तर पुण्यातून माझा मृतदेहच गेला असता मुंबईला..."

"असं नको बोलूस प्लीज... मी का नाही आली असती... आई, बाबा आणि स्नेहलला तर हरवून बसली आहे... तुला नाही हरवून बसायचं होतं आदित्य..."

किती क्षण.. किती वेळ .. ते दोघं एकमेकांच्या मिठीत होते काय माहीत.... जणु त्यांना स्वभोवतालचा पुर्ण विसर पडला होता.... जणु आजुबाजुला काही नव्हतेच.. कदाचीत ते ह्या दुनियेत.. ह्या पृथ्वीवरच नव्हतेच.. बेफिकीर होवून ते एकमेकांना आलिंगण देवून उभे होते... कदाचित हेच प्रेम असतं....

"तुला माहित आहे... मी तुला मुळीच लाईक करायचो नाही..."

"मी पण तुझ्यावर खूप घृणा करायची..."

"असं कसं झालं...? असं वाटतंय हे सर्व स्वप्नच आहे... आता मागे वळून बघतो तर पश्चाताप होतो, वाटते जे घडले ते घडायला नको होते, तर आज हे दुःखाचे, विरहाचे क्षण नशिबी आलेच नसते..." आदित्यने  हलक्याच हाताने चेहर्यावर पसरलेले तिचे केस तिच्या कानामागे सरकवले....

"हे तर माहित नाही... पण मला आपल्यापासून दूर नको करूस आदित्य... तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही..."

खुपच इंटेन्स क्षण होता तो.... अनघाच्या घरापासुन ती लोकं फक्त काही पावलं दुर होते... तिच्या घरातुन कोणीही बाहेर येऊ शकलं असतं, किंवा तिच्याघरी जाणार्या कुणीही त्यांना पाहीलं असतं.... पण त्या लव्ह-बर्ड्स ना कसलीच चिंता नव्हती, कश्याचेच भान नव्हते....

आदित्यने त्याचा चेहरा तिच्या चेहर्याच्या अजुन जवळ न्हेला.... इतक्या जवळ की तिच्या डोळ्यांची होणारी हालचाल त्याला जाणवत होती, तिच्या ओठांवरच्या लिप्स्टीकचा सुगंध त्याला मोहवत होता.... त्याला कसलीच घाई करायची नव्हती....

किती क्षण उलटुन गेले कुणास ठाऊक, कदाचीत फक्त १ सेकंद कदाचीत कितीतरी मिनिट्स.. शेवटी तो वेट सहनशक्तीच्या पार गेला, कुणी कुणाला पहील्यांदा किस केलं माहीत नाही, पण पुढेचे कित्तेक क्षण ते दोघे एकमेकांवर चुंबनांचा वर्षाव करत राहिले…

"तू माझ्या जगण्याची एक आस आहेस... अनघा... तू माझ्या जवळ नाही तर आणखीन कुठे राहणार आहेस..." थोड्या वेळाने आदित्य म्हणाला...

"पण आत्ता आपण जाणार तरी कुठे आहोत... मला नाहीत वाटत कि आपण त्या घृणास्पद वातावरणात पुन्हा राहू शकतो...?"

"काळजी करू नकोस... आपल्यांना प्रेम झालंय ना... तर ह्या प्रेमी जोडप्यांसाठी कोणतं ना कोणतं तरी एक झोपडं नक्कीच भेटेल..."

दोघेही हातात हात गुरफटून तिथून निघतात कोणत्यातरी अनोळखी दुनियेत पण कुठे अजून तरी त्यांना माहित नाही... प्रेमच्या वाटेत नाही तरी कोण कोणाची फिकीर करतं...

ज्या प्रकारे नदी डोंगराला भेदून आपला रस्ता बनवते... त्याचप्रमाणे प्रेम हि आपला मार्ग शोधून काढतो... तेव्हाच कदाचित एवढी घृणा असूनही ह्या जगात आजही प्रेम जिवंत आहे...


T  H  E        B  E  G  I  N  N  I  N  G


NOTE:  WISHING  YOU  ALL  HAPPY   VALENTINE  DAY

0 comments:

Post a Comment