Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Wednesday, 27 January 2016

~ ना, री...! स्त्रीची विटंबना ~ भाग - १


NOTE:: १. (ही कथा पुर्णपणे काल्पनिक असून यातील घटना, स्थळ, प्रकाशचित्रे आणि व्यक्ती यांचा संबंध कोणत्याही मृत अथवा जिवित व्यक्तीशी नाही. याची कृपया नोंद घ्यावी. धन्यवाद!)
२. हि कथा माझी नसून... ह्या कथेचा मूळ लेखक माझा मित्र दीपक आहे... त्यानेच हि कथा मला मराठीत भाषांतर करून इथे पोस्ट करण्यासाठी सांगितली आहे...


~ ना, री...! स्त्रीची विटंबना ~

भाग - १

"मालक, रघु ची बायको खाली नाहीये... मी वाड्यात सगळीकडे पाहून आलोय..." हातामध्ये आपल्या उंचीच्या आकाराची एक जाड काठी घेवून सुबे दिवाणखानात चिंतातूर होवून येरझाऱ्या घालणाऱ्या ठाकूरच्या जवळ येवून म्हणाला...

"काय मुर्खासारखा बरळतोय बे...? आता अर्ध्या तासापूर्वीच राकेशला शिकवणी देवून गेली आहे... ती दिशाला झोपवायला गेली होती... इथे राकेशचं संपूर्ण अभ्यास अर्धवट राहिलं आहे... पुन्हा जावून व्यवस्थित पहा...!" ठाकूर उलट सुबे वरच डाफरत म्हणाले...

"मालक, हिंदीत ती म्हण आहे ना 'छोटा मुँह बडी बात...' मालक... तुम्ही म्हणलेलं खरं तर झालं नाही ना...??" सुबे थोडा जवळ येवून हळूच म्हणाला...

"काय...?" ठाकूर ने आतुरतेने सुबेकडे पाहत विचारले...

"हेच कि तिची वर्तणूक ठीक नाहीये... क्षमा करा मालक, पण राजूचा तर तिच्यावर कालपासूनच डोळा आहे... तो हि कुठे दिसत नाहीये... नवीन पोरगा आहे, गोड गोड बोलून कुठे घेवून तर...."

"बंद कर आपला मूर्खपणा, नाही तर तुझी जीभ छाटून टाकीन..." सुबेची गोष्ट ऐकताच ठाकूर साहेबांनी दात खात आपल्या एका हाताचा ठोसा दुसर्या हातावर दिला, "मी इथे असतांना वाड्यात कोणी हि हरकत केली तर जिवंत सोडणार नाही..."

"सुबे... ओ... सुबे...!" बाहेरून येणाऱ्या ह्या आवाजाने दोघांचंही लक्ष तिकडे केंद्रित झालं...

"मी लगेच आलो मालक..! कदाचित शेरा ने काही माहिती आणली असेल.."

"आत बोलाव त्याला..! आता मला चिंता व्हायला लागली आहे..." ठाकूर ची आतुरता त्याच्या सफेद पडलेल्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होती...

"जी मालक...!" एवढं बोलून सुबे बाहेर निघाला आणि शेराला आत घेवून आला...

"मालक, पहारेकरी सांगत होता कि रघुची बायको आपल्या मुलीला दाखवण्यासाठी डॉक्टरांच्या जवळ गेली आहे... मालक, ती सांगत होती कि तिला ताप आला आहे..." शेराने आतमध्ये येताच ठाकूर समोर डोकं झुकवून माहिती दिली...

त्याची गोष्ट ऐकून ठाकूरने आपल्या कपाळावर हात मारला... त्याच्या मनात कोणास ठावूक काय काय येत होतं... पण बाहेरून तो ते दाखवत नव्हता, "आता तर खेळत होती चांगली... अचानक ताप कसा आला...? अरे, मला म्हणाली असती तर डॉक्टरांना इथेच नाही का आणलं असतं... सुबे गाडी काढ, आपण आत्ताच्या आत्ता डॉक्टरांच्या इथे जावून येवूयात... रघु पण इथे नाहीये... रात्र झाली आहे, जर कुठे काही अघटीत झालं तर मी कोणाला तोंड देखील दाखवायच्या लायकीचा राहणार नाही..."

"जी मालक...!" एवढं बोलून सुबे मागे वळला आणि नजरेनेच शेराला हि आपल्यासोबत येण्याचा इशारा केला...

ठाकूर डॉक्टरांकडे हि निर्मलाला न पाहून आपले हात एकमेकांना चोळत बसला... त्याने तिथेच बेडवर पहुडून आपल्या एका नोकराला बोलावले आणि त्याला गावात रघूच्या घरी जावून तिची माहिती आणायला सांगितली... पण तो हि काही वीस-एक मिनिटांनी पुन्हा परतला होता...

"आपल्या घरीही नाही आहे ती मालक... तिथे तर कुलूप लागलं आहे... मी शेजाऱ्यांना देखील विचारून आलोय... तिला जवळपास देखील कोणी पाहिलं नाही..." नोकराने परत आल्या आल्या ठाकूरला माहिती पुरवली होती...

ठाकूरचा पारा चढला होता... स्वतः त्याला काहीच समजत नव्हते कि ती आपल्या हातून निसटली ह्या गोष्टीवर राग करायचा किंवा त्याला डच्चू देवून पळून जाणाऱ्या 'विश्वासघातकी' निर्मला वर..

"अबे साल्यांनो, हरामखोरांनो...! ती गावात डॉक्टरांकडे गेली नाही, आपल्या घरी हि गेली नाही... मग ती गेली कुठे...? ती एवढ्या रात्री शेवटी वाड्याच्या बाहेर गेली तरी कशी...? रघुला काय तोंड दाखवणार मी...! एवढ्या रात्री कुठे ती शहरात तर... ए सुबे, इथे ये लवकर...!" ठाकूरने उभं राहत सुबेला आवाज दिला आणि तो येण्या आधीच ते बाहेर निघाले...

"जी मालक...!"

"मालक वालक सोड आणि लवकर गाडी चालू कर.." एवढं बोलून ठाकूर साहेब गाडीत बसले, "वाड्यात पोहोचताच दोन माणसांना गाडी देवून शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाठवून दे... सालीला एवढ्या रात्री कोणतंच साधन मिळणार नाही.. चालतच जात असेल तर दोन किलोमीटर पेक्षा जास्त लांब गेली नसेल... आणि हो, दहा बारा लोकांना सांगून ठेव कि गावातील प्रत्येक घरात जावून तिला शोधून काढायचं... कोणास ठावूक साली कुठे लपून बसली असेल..."

एकाच श्वासात बोलून ठाकूरने एक दीर्घ श्वास घेतला आणि मग लगेच अचानक काहीतरी आठवल्यागत म्हणाला, "दोन चार लोकं जावून गावाच्या शेतांमध्ये हि चक्कर लावून येतील... असं वाटतंय काल रात्री रघूने मारहाण केल्यामुळे संतापून निघून गेली असेल..." ठाकूर पूर्ण रस्त्यात आपले हात चोळत, काही ना काही तरी बडबडत होता...

***************

"आपण एवढ्या रात्री मोठ्या आईच्या घरी का जातोय मम्मी...?" दिशाने मम्मीचं बोट पकडून, तिच्यासोबत पटपट चालत म्हणाली... खूप दूरपर्यंत तरी निर्मलाने तिला उचलून घेतलं होतं... पण आदल्या दिवशीच्या मारहाणी मुळे आणि आता शांत रात्रीत अजून कोणता प्रसंग होण्याच्या भीतीने तिच्यात हिम्मत उरली नव्हती कि ती तिला अजून उचलून घेवून जास्त लांब ती चालू शकली असती...

"बडबड नको करूस बेटा... बस तू चालत राह..." पूर्णपणे घाबरलेल्या निर्मलाने तिचं बोट सोडून तिचा हात धरला...

"पण दिवसा गेलो असतो तर मस्तपैकी बसमध्ये बसून गेलो असतो ना..." दिशा निराश होत म्हणाली, "माझे पाय दुखायला लागले आहेत मम्मी..! आता अजून किती लांब आहे मोठ्या आईचं गाव...?"

"ये..." निर्मलाने दिशाला पुन्हा एकदा उचलून घेतलं... तिला स्वतःला देखील माहित नव्हतं कि शेताच्या पायवाटेने तिचं स्वतःचं गाव किती लांब असेल... तिला तर हेही माहित नव्हतं कि हि पायवाट तिला तिच्या गावाच्या जवळ आणत आहे कि उलट अजूनच लांब घेवून जात आहे... तिला तर बस फक्त आजची हि भयानक आणि अपशकुनी रात्र घालवायची होती... तिला जितकं होवू शकतं, तितकं लांब चालत जायचं होतं... ठाकूरच्या कैदेतून लांब, तिला त्याच्या अत्यंत दुष्ट हेतूपासून लांब जायचे होते...

आपला भूतकाळ आणि वर्तमान काळ आठवून तिच्या अंगावर दरवेळी शहारे यायचे... तिच्या निरुपयोगी नवर्यामध्ये तिची रक्षा करण्यासाठी काहीच आकांक्षा आणि सामर्थ्य हि नव्हतं...!

रात्री रघुने तिला केलेली शिवीगाळ आणि हाडंतोड मारहाण निर्मलासाठी काय हे नवीन नव्हते... ती पहिल्या रात्री पासूनच हे सहन करण्यासाठी लाचार होती... रघुने तेव्हापासूनच ह्या निरपराध अबलेला आपल्या क्रोधाचा शिकार बनवायला सुरुवात केली होती; जेव्हा वीस वर्षांच्या निर्मलाला आपल्या कॉलेजचा अभ्यास अर्धवट सोडून तीस वर्षांच्या रघुच्या घरी आपल्या मोठ्या बहिणीची जागा घेण्यासाठी यावं लागलं होतं... त्याच दिवसांपासून तिच्या छोट्याश्या मनाने, कोणास ठावूक किती तरी आशेला आणि भावी स्वप्नांना तिने तिच्या स्वप्नामध्ये तुडवल्या होत्या आणि पाश्विक क्रूरतेने नवीन गोष्टी तिच्यावर थोपवल्या जात होत्या... रघुच्या घृणास्पद जीवनात, पहिल्यापासूनच तडकलेल्या निर्मलाच्या भावना, त्याच दिवशी विखुरल्या गेल्या होत्या...

पण निर्मला करणार तरी काय...? जेव्हा तिने ह्याविषयी तिच्या आईला सांगण्याचा प्रयत्न केला तर तिच्या आईने दरवेळी प्रमाणे, तिलाच ना,री असल्याचा धडा शिकवायला सुरुवात केली, "तर काय झालं पागल..! तुझ्या नवर्यानेच तर तुला मारलं आहे... जर हात उचलला तर कोणता मोठा डोंगर कोसळला... मी पण तर तुझ्या बाबांचा मार खावून खावूनच तर हुशार झाली आहे... तुला तर त्याच्या खालीच राहायचं आहे ना...! हि ह्या समाजाची परंपरा आहे बेटा...!"

आणि त्याच दिवसापासून तिने कधीच कोणा समोर रघूच्या दुष्कर्माचं रडगाणं गायलं नाही... दररोज रात्री मार खाल्ल्यानंतर 'ना,री' होण्याच्या शिक्षेवर स्फुंदत स्फुंदत उपाशी पोटी झोपण्याची तिची सवयच बनली होती... पण तरीही तिने कधीच रघुला उपाशी पोट झोपू दिलं नाही; तो कसा हि असला तरी त्यासाठी तिला, त्याच्या लाथा-बुक्क्या किंवा शिवीगाळ अजून मिळाले तरी चालेल...

कॉलेजमध्ये निर्मलाला 'आजची भारतीय नारी' ह्या विषयावर तिने दिलेल्या क्रांतिकारी भाषणाला प्रथम पारीतोशिका सोबतच मिळालेल्या प्रमाण-पत्रकावर रघूने काळा चष्मा घालून स्टुडिओमध्ये काढलेला आपला फोटो लावून एका तुटलेल्या काचेच्या फोटो फ्रेम मध्ये फिट करून ठेवला होता.... स्वतः निर्मालानेच रघुला ते प्रमाणपत्र हाच विचार करून दिला कि 'चला कमीत कमीत त्याचा उपयोग कश्यासाठी तरी झाला'

आता निर्मला 'नारी' ह्या शब्दाला, आणि त्याच्या वास्तविक अर्थाला समजून चुकली होती... नारी, म्हणजे ह्या पृथ्वीतलावरचा एकमात्र भाषाशील निष्पाप जीव, ज्याच्या वाटेत प्रत्येक पावलावर फक्त दुखः आणि समाजाच्या बेड्याच येतात... स्वप्न पाहायला ना..! आपल्या जीवनातला महात्वाहून महत्वाचा निर्णय स्वतः घेण्यासाठी ना...! अत्याचाराचा विरोध करण्यासाठी ना...! 'ना' करण्यासाठी हि ना...! ह्याचा अर्थ " ना,री...! "

"मला भूक लागली आहे मम्मी... आज तु मला जेवण पण दिलं नाहीस..." आईच्या कुशीत असलेल्या दिशाला कोठे माहित होतं कि आज तिची भूक संपण्याच्याही कतीतरी जास्त निर्मलासाठी स्वतःला एका निर्दयी रानटी, आणि हवशि जनावराच्या शिकारीपासून वाचवणं जरुरी होतं... निर्मलाच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि तिने दिशाला आणखीन जोरात आपल्या छातीशी लावून घेतलं, "बस सोनू... झोपून जा... मी...."

बोलता बोलता अचानक निर्मलाला आठवलं कि ती एका उसाच्या शेतातून चालत आहे... दिशाची भूक भागवण्यासाठी ह्याही पेक्षा अजून सोप्पा उपाय तिच्या जवळ नव्हता... ह्याच निमित्ताने ती थोडावेळ आरामही करेल... निर्मलाने विचार केला आणि दिशाला खाली उतरवलं, "उस खाणार बेटा...?"

"होय, पण घर आणखीन किती लांब आहे मम्मी...? मला काळोखात भीती वाटतेय..." दिशा आजूबाजूला पाहत म्हणाली...

"भीती...! कसली भीती बेटा...?" निर्मलाने जवळच्याच एका शेतातून एक उस तोडून आणून तिथेच सुकलेल्या गवतावर बसून ती त्याला सोलायला लागली, "चांदणं आहे ना उजेडासाठी, आणि मी पण तर आहे तुझ्यासोबत... ये माझ्या कुशीत बस आणि हे घे गोड गोड उस खा... आणि मला सांग कसा वाटला उस...?"

दिशाला समजावता समजावता निर्मलाचं स्वतःच मन कोणत्या तरी अघटीत भयाने व्यापलं गेलं होतं... कोणास ठावूक इथल्या निर्जन ठिकाणी कधी कोणत्या क्षणी, कोणतं नवीन वादळ दोघांवर येवून तुटून पडेल...

तिचं दुर्दैव म्हणा निर्मला हे सर्व आपल्या मनात काढून टाकण्याचा प्रयत्न करतच होती कि दुर्दैवाने एक दुर्दैवी घटना घडलीच....

[ क्रमशः ]

0 comments:

Post a Comment