Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ ~ ना, री..! स्त्रीची विटंबना ~ ~

Saturday, 6 February 2016

~ ना, री...! स्त्रीची विटंबना ~ भाग - २

~ ना, री...! स्त्रीची विटंबना ~ 

 भाग - २  
 
निर्मला हे सर्व आपल्या मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करतच होती कि दुर्दैवाने एक दुर्दैवी घटना घडलीच... लांबून कोणाच्या तरी पावलांच्या आवाजाने निर्मालाचे कान टवकारले गेले, "चल बिट्टू..." निर्मला तिला उचलत तिच्या कानात कुजबुजली, "कदाचित कोणी इथेच येत आहे... थोडावेळ शेतात लपून बसुयात..."


पण नियतीला तर कोणी रोखलं आहे का... जसेच निर्मला दिशाला कडेवर घेवून शेतात घुसली, उसाच्या झाडाचं टोकदार पान दिशाच्या डोळ्याच्या कडेला लागून तिथे थोडसं खरचटलं गेलं आणि तिने अचानक रडायला सुरुवात केली... निर्मलाने तिच्या तोंडावर हात ठेवून तिला गप्प तर केलं, पण तोपर्यंत तिथे येणाऱ्या व्यक्तीने तिथून आलेला आवाज ऐकला होता....

 

"ओय... कोण आहे तिकडे... आज नाही सोडणार तुला साल्या...!" आणि अचानक संथ गतीने चालत येणाऱ्या चपलांचा आवाज आता पळत येणाऱ्या आवाजात परावर्तीत झाला होता... लवकरच ती व्यक्ती शेताच्या बाहेर त्यांच्या जवळ येवून उभी राहिली होती... आत पर्यंत येणाऱ्या उजेडाने साफ कळत होतं कि त्या व्यक्ती जवळ टॉर्च होती...
 

"अच्छा हरामखोर, चोराच्या मनात चांदण्या...! माझ्याच शेतातून उस चोरी करून माझ्याच शेताच्या गवतावर बसून खात होतास व्हंय.. साल्या, हे उस तुझा बाप लावून गेला होता काय..? आता लवकर बाहेर निघ आणि आपल्या ढुंगणावर दोन काठी खा चल... नाहीतर मी आत आलो तर विचार कर मी तुझी काय हालत करेन... लवकर बाहेर निघ साल्या, तुझ्या तर..!"
 

शेताच्या बाहेर उभा असलेल्या व्यक्तीच्या खूप साऱ्या शिव्या ऐकल्या नंतर, शेवटी निर्मलाने बाहेर निघण्याचा निर्णय घेतला... ह्यापेक्षा तिच्याजवळ दुसरा पर्यायच नव्हता... जर तिने तिथून अजून आत जाण्याचा विचार केला असता तर पानाच्या आवाजामुळे ती पकडली गेली असती... आणि बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या हातात टॉर्च होती... त्यामुळे त्या व्यक्तीला तिला शोधायला वेळही लागला नसता...
 

सातत्याने सुरु असलेल्या शिव्यांच्या भडीमारामुळे आणि होणाऱ्या आवाजामुळे निर्मलाचा जीव भांड्यात अडकला होता... "साल्या लवकर बाहेर निघ... आत आलो तर खूप वाईट अवस्था करेन मी तुझी... १५ दिवसांपासून माझे उस चोरी करतोयस तू... आज मी तुला सोडणार नाहीये... बोल, तू बाहेर येतोयस का मी आत येवू...?" बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीने एकदा जोरात काठी जमिनीवर आपटत ओरडला...
 

"मssss मी... मी येते..." निर्मलाच्या तोंडून हळूच हे वाक्य निघालं... तिने दिशाला आणखीन जोरात आपल्या छातीशी लावलं आणि ती बाहेर निघायला लागली...
 

"साल्या हरामखोर... आता का फाटली तुझी...? लवकर ये साल्या, चोर साल्या...!"
 

चोर समोर येताच टॉर्चचा प्रकाश तिच्यावर पडताच आणि तिला सलवार ड्रेसमध्ये पाहून त्या व्यक्तीचं तोंड आश्चर्याने उघडच राहिलं, "आँ?... तू... तू... तर चोरनी आहेस..."
 

निर्मलाने काहीच उत्तर दिलं नाही... गपचूप मान खाली घालून ती बाहेर निघाली आणि घाबरलेल्या दिशाला आपल्या मागे लपवलं...
 

निर्मलाच्या समोर उभा असलेला तो बलदंड शाली व्यक्ती सत्तावीस अठावीस वर्षांचा कोणी युवक होता... हातामध्ये काठी घेवून तो काळोखात कोणी राक्षस दिसत होता, "अच्छा, आता समजलो...! मुलगी चोरून पळत होतीस ना, बोल..?"
 

"हssss हि... माझी मुलगी आहे...!" निर्मला कोणत्या तरी गुन्हेगारासारखी घाबरून थिजून उभी होती, "मी फक्त... एकच उस तोडलं होतं हिच्यासाठी..."
 

"मला काय तू कोणी आंधळा समजला आहे का...?" त्या व्यक्ती ने निर्मलाच्या चेहऱ्यावर टॉर्चचा प्रकाश मारला... "एवढी मोठी मुलगी आणि तुझी...? गपचूप सांग कोठून चोरून आणली आहेस ह्या मुलीला तू..? कोणत्या काळ्या जादू मध्ये हिचा बळी तर नाही ना द्यायचा इरादा आहे तुझा...?"
 

"देवाची शपथ, हि माझी मुलगी आहे...!" निर्मलाच्या आवाजात आता थोडा कमी रड्केपणा आणि थोडा जास्त साहस होता...
 

"थांब, मी तिलाच विचारतो... ए मुलगी, इकडे तर ये बेटा...! काय नाव आहे तुझं...?"
 

प्रतिउत्तरामध्ये दिशा आपल्या आईला आणखीनच बिलगत हळूच म्हणाली, "दिशा...!"
 

"अरे वाह...! तुझा आवाज तर खूप गोड आहे... चल आणखीन एक गोष्ट सांग कि तू कोणाची मुलगी आहेस बेटा...?"
 

"तुम्ही आम्हाला मारणार काय, काका..?"
 

दिशाच्या त्या गोड आवाजाने त्या अनोळखी व्यक्तीच्या उसाची परतफेड करून त्याचा राग कधीच हवा करून टाकला होता, "नाही बेटा...! मी भलं तुला का मारणार...? मी तर हिला मारणार जी तुला एवढ्या रात्री लाडीगोडी लावून, कोणास ठावूक कशासाठी तुला घेवून आली आहे.."
 

"तुम्ही मम्मीला पण नका मारू, काका...! माझी मम्मी खूप चांगली आहे..." दिशा घाबरून पुन्हा एकदा निर्मलाला बिलगली... ह्यावेळी कदाचित आपल्या आईला वाचवण्यासाठी...!
 

"ह्म्म्म... आहात तर तुम्ही मायलेकी... पण जरा मला हे तरी सांगा कि एवढ्या रात्री इथे काय करण्यासाठी आलात...? आणि हि काय वेळ आहे का एकट्या बाईने घरा बाहेर निघायची...?"
 

"आम्हाला प्लीज तुम्ही जावू द्या ना...!" निर्मलाने आपले हात जोडले...
 

"जावू देणार...! पण पहिले मला हे सांग तू एवढ्या रात्री इथे काय करतेस...? काही ना काही तरी गडबड जरूर आहे... तू मला वेडा नको समजूस... तू पूर्ण गोष्ट सांगितल्या शिवाय मी तुला इथून जावू देणार नाही..." त्या व्यक्तीने सांगितले...
 

"मी काहीच सांगू शकत नाही... प्लीज, तुम्ही आम्हाला इथून जावू द्या... मी खूप संकटात आहे...?" निर्मलाने पुन्हा एकदा हात जोडून विनंती केली..
 

"संकटात आहेस काय...?" त्या व्यक्तीने निर्मलाची गोष्ट रिपीट केली...
 

"हो, देवाची शपथ...! आपल्या मुलीची शपथ...!"
 

"सांगू शकत नाही...?" ती व्यक्ती अशा प्रकारे बोलत होती कि जसं त्याच्याजवळ खूप वेळ आहे...
 

"नाही सांगू शकत, प्लीज आता जावू द्या ना...! मी तुमच्या पुढे हात जोडते..."
 

"कुठे जावू देवू...?"
 

"इथून... कुठे हि...!"
 

"असं तर मी नाही जावू देवू शकत... माझं मन सांगतं..." ती व्यक्ती आपल्या शब्दावर ठाम होती...
 

"क..का...?" निर्मला त्याच्या ह्या व्यवहारामुळे आणखीनच घाबरली...
 

"का.. वा.. सगळं माहिती पडेल... गपचूप माझ्या मागे चल... उद्या सकाळी मी विचार करेन कि काय करायचं आहे तुझं.." त्या युवकाने एवढं बोलून दिशाचा हात पकडून तिला आपल्या जवळ खेचलं...
 

"प्लीज... आम्हाला जावू द्या प्लीज, मी तुमच्या पाया पडते..." कदाचित ह्या सामसूम ठिकाणी एका संकटाच्या स्वरुपात निर्मलाला अजून एक ठाकूर भेटला होता...
 

"असं कसं जावू देवू तुला...? देव जाणो एवढ्या रात्री काय गडबड घोटाळा करून माझ्या शेतात लपायला आली आहेस... उलट देवाचे आभार मान कि तुम्हा मायलेकी वर दया करून मी पोलिसांना फोन नाही केला तो... सकाळ पर्यंत माझं समाधान झालं तर ठीक, नाही तर सरळ पोलिसांकडे... बोललो ना गपचूप माझ्या मागे चल..." निर्मलाला आपल्या जागेवरून न हलताना पाहून त्या व्यक्तीने दिशाला उचलून घेवून पुढे चालण्यास सुरुवात केली, दिशा तर एवढी घाबरली होती कि त्या व्यक्तीला ती आपल्या आईकडे जायचे आहे हे सांगायला हि घाबरत होती...

निर्मला जवळ अजून काहीच पर्याय उरला नव्हता... शिवाय गपचूप त्या व्यक्तीच्या मागे विनंती करत चालत राहण्याचे...!


"इथे...!" जवळ जवळ वीस मिनिटं चालल्यावर दिशाला कडेवर घेवून निर्मलाच्या पुढे पुढे चालणारा तो युवक कोणत्या तरी गावाच्या बाहेर बनलेल्या एका घराच्या समोर उभा राहून निर्मलाकडे वळला, "चल, आतमध्ये ये..."


निर्मलाचं हृदय खूप वेळेपासून खूप जोरात धडधडत होतं... तिला समजत नव्हतं कि दरवेळी देव तिच्यासोबतच असलं घाणेरडं खेळ का खेळतोय... कसं बसं करून ठाकूरच्या कैदेतून निसटून पळाली तर इथे येवून फसली... "देवाच्या पायी... मला माझी मुलगी द्या... आणि आम्हाला जावू द्या..."


"वेडा समजतेस का मला...? तुला जावू दिलं असतं तर तिथूनच नाही का पळवून लावलं असतं... चुपचाप आतमध्ये ये..." त्या व्यक्तीच्या आवाजात थोडा राग आणि थोडं सहानुभूती दिसत होती...

 

"मी तुमच्यासमोर हात जोडते...! मी..." निर्मला अजून काही तरी बोलायला पाहत होती कि घरातून येणाऱ्या एका आवाजाने ति शांत राहिली...

"आता कोणाशी बोलत बसले आहेत दादा...? लवकर आतमध्ये येवून जेवून घ्या... मला मग झोपायचं पण आहे... सकाळी ट्युशनसाठी रोज लेट होते..."


"तू अजून झोपली नाहीस छोटी...? बाहेर तर ये जरा एकदा..."


"आली दादा..." आतमधून पुन्हा एकदा एक गोड आवाज आला आणि थोड्याच वेळानंतर ती दारा जवळ आली, "हे काय...? अरे...! दादा, हि ताई कोण आहे तुमच्यासोबत...?" त्या मुलीची नजर पहिले त्याच्या कडेवर असलेल्या दिशावर आणि मग त्याच्या मागे थिजून उभ्या असलेल्या निर्मलावर पडली...


निर्मलाने घरात एक मुलगी आहे हि गोष्ट जाणून एक दीर्घ श्वास घेवून आपल्या हृदयावर हात ठेवला... ती आता खूप आश्वस्त झाली होती...


"मला तर काहीच सांगितलं नाही हिने... तुला सांगते का ते विचार... एवढ्या रात्री आपल्या उसाच्या शेतात लपून बसली होती आपल्या मुलीला घेवून... येड्यावानी करते बघ... स्त्रियांसाठी एकट्याने शेतामध्ये हि वेळ येण्या-जाण्यासाठी असते काय..? दोघीही चेहऱ्यावरून भुक्या दिसतायत... तू असं कर, माझं जेवण ह्यांना दे... मी दूध जास्त पिईन... आणि हो... आता ह्यांना कुठे जावू नको देवूस... सकाळी निघून जाइल, हिला जिथे हि जायचं आहे तिथे... ठीक आहे ना...?" युवकने निर्मलाकडे पाहून समजावले, आणि तो आपल्या बहिणीकडे वळला, "मी आंघोळ करून घेतो..." एवढं बोलून त्याने दिशाला आपल्या बहिणीकडे दिलं आणि तो आतमध्ये आपले कपडे घेण्यासाठी गेला...


"ये ना ताई, आत ये..!" त्या मुलीने खूप प्रेमाने निर्मलाला निवेदन केलं...


"हा... हा तुझा भाऊ आहे..?" निर्मलाने दीर्घ श्वास घेत विचारले...


"हो.. तुम्हाला घरी आणून मनीष दादाने खूप चांगलं काम केलं... या ना आत...!" त्या मुलीने निर्मलाचा हात पकडून तिला आतमध्ये खेचलं तर निर्मलाने हि तिला काहीच विरोध केला नाही... उलट ती मनातल्या मनात देवाचे आभार मानत होती... तिला रात्र घालवण्यासाठी आणि आधार देण्यासाठीच तर देवाने त्याला पाठवले होते..!


"खर सांगू.. नेहा...! मी घरात तुझा आवाज ऐकण्याआधी एवढी घाबरलेली होती कि... आता तर कोणाच्या कपाळावर तर हे लिहिलेलं नसतं ना कि कोणता माणूस कसा असेल...! ह्याने एकदाही हे नाही सांगितले कि हा मला आपल्याच घरी घेवून जात आहे आणि तिथे माझी एक बहिण पण आहे... मी तर उगाचच... तुला माहित नाही मी पूर्ण रस्त्यामध्ये काय काय विचार करून घाबरत होते..." निर्मला तिच्या ह्या प्रेमळ स्वभावामुळे एकदम आनंदी आणि ऋणी झाली होती.. जेवण झाल्यावर दिशाला झोपवून नेहाच्याच बाजूच्या पलंगावर झोपून दोघेही बोलत होते...


"पूर्ण पागलचा पागल आहे हा पागल..!" नेहा आपल्या भावाची टिंगल करत हासत म्हणाली, "पहलवान आहे ना...! त्यामुळे त्याच्यात एवढंसही डोकं नाही... हे तर त्याला स्वतःला विचार करायला हवं होतं कि एका परस्त्रीला दम भरून जबरदस्ती आपल्या घरी घेवून येशील तर ती भलं काय विचार करणार..! सांगितलं पाहिजे होतं ना ह्याने... पण तुम्ही एवढ्या रात्री तिथे काय करत होता...? सांग ना, ताई...? आणि जर दादाने तुम्हाला इथे आणलं नसतं मग तुम्ही गेला तरी कुठे असता..?"


"आता झोपून जा तू.. सकाळी लवकर उठायचे आहे ना...?" निर्मला त्या गोष्टीला टाळत म्हणाली आणि दुसरीकडे कूस बदलून झोपली... वाड्यातून पळून आल्यावर सुद्धा त्या विचारानेच ती शहारत होती... तिच्या दयनीय जीवनात ठाकूरच्या अचानक अतिक्रमणामुळे तिच्या जीवनाला तीन दिवसातच नरकासारखं बनवलं होतं... निर्मला आपल्या भूतकाळाच्या गेल्या दोन दिवसाला आठवून शहारली.......... दूरवर कोठेतरी एक गाणं चालू होतं जसं ते तिच्याचसाठी आहे आणि त्या गाण्याच्या बोल असे होते.......


दुनिया, छूना, चाहें मुझको यूँ
जैसे उनकी सारी की सारी, मैं
दुनिया देखे रूप मेरा, कोई ना जाने बेचारी मैं

 

[ क्रमशः ]

0 comments:

Post a Comment